Shraddha Ayurved Clinic, Chhatrapati Sambhajinagar

Shraddha Ayurved Clinic, Chhatrapati Sambhajinagar (formerly Aurangabad)

Introduction

वैद्य सोहन भीमाशंकर पाठक
शिक्षण;BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine & Surgery)
[आयुर्वेदाचार्य-(पुणे)]Astang Ayurved College Pune in 1998

 and DHMM (Diploma in Herbal Medicine Management) from Pune University in 2000

Registration-I-32810-A-Maharashtra Council Of Indian Medicine

सुवर्णपदक
एम ए (संस्कृत) पुणे
एम ए (मानसशास्त्र)
पीएचडी (मानसशास्त्र)
डिप्लोमा इन योग आणि आयुर्वेद

कार्य व सन्मान

1) 26 वर्षांपासून छत्रपती संभाजी नगर व पुणे येथे शुद्ध आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत
2)आयुर्वेद व्यासपीठ
सहकार्यवाह, केंद्रीय समिती

3)2004 पासून आयुर्वेदिक डायबिटिक क्लबची स्थापना त्यात प्रमेह चिकित्सक म्हणून कार्यरत

4)CSMSS आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजी नगर येथे चार वर्षे संहिता(अष्टांग संग्रह व चरक) विषयात मानद अध्यापन

5)निरामय आरोग्यासाठी पंचकर्म या पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखन
निरामय आरोग्यासाठी पंचकर्म या पुस्तकासाठी २००३ साली उत्कृष्ट आयुर्वेदीय ग्रंथ म्हणून पुरस्कार

6)’चालत्याबोलत्या शुगर फॅक्टरीज’ या मधुमेहावरील पुस्तकाचे कै .वैद्य दिलीप गाडगीळ सरांसोबत लेखन

7)खडीवाले वैद्यक संशोधन संस्था, पुणे यांचा 2018 चा रचनात्मक कार्य पुरस्कार

8)कै. बिंदूमाधव कट्टी आयुर्वेदिय प्रश्नमंजुषा या अभिनव उपक्रमाचे आयुर्वेद व्यासपीठ छत्रपती संभाजी नगर तर्फे 19 वर्ष संचलन

9)मराठी विश्वकोष च्या विज्ञान मंडळातील आयुर्वेद विभागाचे सभासद म्हणून निवड
मराठी विश्वकोषातील आयुर्वेदाच्या विविध विषयांवर लेखन व समीक्षक म्हणून काम

10) आयुर्वेदिक वैद्यांसाठी साठी उपयुक्त अशा आयुर्वेदीय मनोविज्ञान’
आयुर्वेदिक मानसशास्त्रावर प्रकाश टाकणार्या कोर्सचे इ इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद गेली ५ वर्ष यांच्यातर्फे संचालन

11)आंतरराष्ट्रीय परिषदेत डायबेटीस व वत्सकादि कषाय या संदर्भात पेपरवाचन

12)अनेक राष्ट्रीय परिसंवादात वक्ता म्हणून सहभाग

13)’आयुर्वेद पत्रिका’ या मासिकाचा सर्वोत्कृष्ट संशोधनपर लेख हा पुरस्कार प्राप्त

14)भोपाळ व दिल्ली येथे भरलेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये वृक्क विकार आणि डायबिटीस या विषयावर सन्माननीय चिकित्सक म्हणून सेवा

15)मानसशास्त्र विभाग, डॉ. बामु मराठवाडा विद्यापीठ येथे विविध विषयावर व्याख्याने

16) मनोरुग्णांसाठी
१)तद्विद मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र
२)अमृतनाद ध्यान केंद्र संचलन

17)ताणतणाव जनित मधुमेह या विषयावर मानसशास्त्रीय मान्यताप्राप्त नियतकालिकात संशोधनपर लेख

18)आयुर्वेद टीचर्स असोसिएशन तर्फे
उत्कृष्ट राष्ट्रीय आयुर्वेदिक चिकित्सक
हा पुरस्कार प्राप्त

19) नोव्हेंबर २५ च्या आयुर्वेद पत्रिका या संशोधन पत्रिकेचा *आत्महत्या आयुर्वेदीय दृष्टिकोन * या लेखाला उत्कृष्ट संशोधन लेख म्हणून पारितोषिक

Introduction

वैद्य सौ. अश्विनी सोहन पाठक
शिक्षण;BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine & Surgery)
[आयुर्वेदाचार्य-(पुणे)]Astang Ayurved College Pune 

वैद्य अश्विनी पाठक या जनरल आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. 

Address:

Address
  • Flat No. 1, Chetan Plaza, Near Renuka Motor Driving School, Opposite Of ICICI, Samrat Nagar, Ropalekar Heart Clinic, New Sbh Colony, Aurangabad-Maharashtra-431005, Maharashtra
  • फ्लॅट क्रमांक १, चेतन प्लाझा, रेणुका मोटर ड्रायव्हिंग स्कूलजवळ, आयसीआयसीआय बँकेसमोर, सम्राट नगर, रोपाळेकर हार्ट क्लिनिकच्या समोर,  न्यू एसबीएच कॉलनी, औरंगाबाद-महाराष्ट्र-४३१००५ , महाराष्ट्र
  • Phone : 95525 61079

    0240-2344854

  • email:

Location Map at Chh. Sambhajinagar

उपलब्ध सुविधा

  • पंचकर्म चिकित्सा-
    • वमन 
    • विरेचन 
    • बस्ती 
    • रक्तमोक्षण 
  • अग्निकर्म 
  • विद्धकर्म 

Ayurvedic counselling for psychological problems, psychosomatic disorders.

  • सत्त्वावजय चिकित्सा 
  • समुपदेशन 
  •  

Clinic timings at Chhatrapati Sambhajinagar (formerly Aurangabad)

Monday to Saturday- 10 A.M. to 2 p.m.,

Evening: 5.30  p.m. to 8.30 p.m.

Sunday closed

Doctor is available at his clinic at Laxmi Road, Pune on 1st Sunday of every month, by appointment.

Address at Pune

Address at Pune:

Shriram Smruti Apartment, 561, Shaniwar Peth, Opp. HDFC Bank, above Vrundavan Fresh, Raman Baug Chowk, Pune, 411030

Location map at Pune

Gallery

Calender
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

पंचकर्म- Panchakarma

पंचकर्म म्हणजे काय

आयुर्वेदामध्ये प्रमुखतः दोन पद्धतीची चिकित्सा आहे- दोषांचे शमन आणि शोधन. शमन चिकित्सा म्हणजे औषध, आहार, विहार इत्यादि  उपायांनी  शरीरातील वाढलेले दोष सम-स्थितीत आणणे.  दोष जर थोड्या प्रमाणात असतील आणि जास्त खोलवर गेलेले नसतील तर औषधि देऊन त्यांचे शमन करण्यात येते. आणि दोष जर खोलवर गेले असतील, तसेच वारंवार त्रास होऊ नये म्हणून खोलवर गेलेल्या दोषांना युक्तीने बाहेर काढणे याला शोधन म्हणतात.

शोधन म्हणजे शरीरात वाढलेले वात, पित्त, कफादि  दोष पंचकर्म उपचाराद्वारे शरीराबाहेर काढणे. वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य आणि बस्ति हे प्रमुख पाच शोधनाचे प्रकार आहेत, यांना एकत्रितपणे पंचकर्म म्हणतात.  पंचकर्म उपचाराने व्याधीचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होते. कुठलेही पंचकर्म करण्यापूर्वी त्यासाठी तयारी करून घ्यावी लागते, ती खालीलप्रमाणे-

पूर्व कर्म

स्नेहन व स्वेदन

कोणतेही पंचकर्म करण्यापूर्वी पूर्व कर्म म्हणून स्नेहन आणि स्वेदन केल्या जाते. स्नेहन म्हणजे पूर्ण शरीराला किंवा त्याच्या ठराविक भागाला, योग्य त्या औषधी तेलाने अभ्यंग करणे-म्हणजे थोडक्यात- ते तेल कोमट करून, त्वचेद्वारे शरीरात जिरविणे, जेणे करून शरीरातील ‘दोष’ जिथे साचले आहेत तिथून सुटे होऊन, पक्वाशयात येतील.  वाताच्या विकारांमध्ये स्नेहन, स्वेदन  केल्याने  शरीराला स्निग्धत्व येऊन, वातामुळे होणारी वेदना कमी होणे, शरीराच्या मांसधातूला बल मिळणे असे अनेक फायदे होतात.

स्वेदन कर्म

आयुर्वेदामध्ये अभ्यंग केल्यानंतर शेकण्याचे(steam bath) वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत यालाच स्वेदन असे म्हणतात स्वेदनामुळे, शरीरातील दोष सुटे होण्यास मदत होते, आणि त्वचेवरील रंध्रें मोकळी होतात,  वात विकार कमी होण्यासाठी मदत होते.

वमन कर्म

वमन म्हणजे औषधाने शरीरातील मुख्यतः कफ दोष, आणि इतर दोष  बाहेर काढण्यासाठी नियंत्रित उलट्या करवणे. या मुळे शरीरातील विशेषतः  कफ पित्त दोष बाहेर काढले जातात. पंचकर्माची तयारी करून घेण्यासाठी आधी काही दिवस पेशंटला आवश्यक तेवढे औषधी घृतपान केले जाते, आणि त्या कालावधीत स्नेहन आणि  स्वेदन नित्य केले जाते. नंतर वैद्यांच्या देखरेखीखाली औषधी द्रव्य देवून वमन करविल्या जाते.  हा उपचार वारंवार होणारी सर्दी ,श्वास विकार, खोकला, त्वचा विकार, स्थौल्य, मानस विकार इत्यादींवर भरपूर उपयोगी पडतो. वसंत ऋतूमध्ये वमन पंचकर्म विशेषतः  केल्या जाते.

विरेचन कर्म

औषधी द्वारे नियंत्रित जुलाब करवण्याच्या चिकित्सेला विरेचन असे म्हणतात. यासाठी पण आधी काही दिवस वरीलप्रमाणे घृतपान करविल्या जाते. आणि स्नेहन स्वेदन केल्या जाते.  नंतर रोग्याला त्याच्या अवस्थेनुसार विरेचक औषधि दिली जाते.  त्यामुळे वाढलेला पित्तदोष शरीराच्या बाहेर जातो त्वचा विकार ,पित्त  विकार मलावरोध, कावीळ व उष्णतेचे आजार विरेचनाने बरे होतात.

बस्ति चिकित्सा

हा  उपचार विशेषतः वाताच्या विकारासाठी केला जातो.  यामध्ये औषधी सिद्धतेल व काढा याचा गुदद्वारातून बस्ति दिल्या जातो. बस्ति पंचकर्मोपचार सर्वात उपयोगी असलेला उपचार आहे.  विशेषतः वाताचे आजार, पक्षघात, ऑटो इम्युन डिसीजेस, मूत्राशयाचे विकार, पचनाचे विकार अशा अनेक विकारांवर बस्ति चिकित्सा अत्यंत उपयोगी ठरते. बस्तीचे अनेक प्रकार आहेत आणि रोग्याच्या गरजेनुसार आणि अवस्थेनुसार ते ठरविले जाते.

वरील प्रकारची पंचकर्मे करून झाल्यावरसुद्धा रोग्याला काही दिवस योग्य आहार विहार करावा लागतो, ज्याला संसर्जन म्हणतात, जेणे करून केलेल्या पंचकर्मांचा कायम स्वरूपी फायदा होतो.

नस्य चिकित्सा

नस्य म्हणजे नाकात औषधि तेल  टाकून दोषांना बाहेर काढणे.  नाकात टाकलेली औषधि ही शरीरातील ऊर्ध्व भागात, म्हणजे डोळ्यापासून ते मेंदूपर्यन्तच्या अवयवांना उपकारक असते आणि अनेक रोग नाश करते. नस्यचकित्सा ही डोक्याचे आजार, केसांचे विका,र डोळ्यांचे विकार जुनाट सर्दी , इत्यादीसाठी उपयोगी पडते, तसेच सौंदर्य चिकित्सेचा ही एक भाग म्हणून वापरली जाते.

रक्त मोक्षण

शरीरातील दूषित झालेले रक्त नियंत्रित मार्गाने बाहेर काढणे म्हणजे रक्तमोक्षण होय.  ही चिकित्सा विशेषतः त्वचा विकार, पित्ताचे विकार, तीव्र वेदना, नागिणी सारखे आजार, डायबेटिस मुळे झालेल्या जखमा, जुनाट जखमा इत्यादीसाठी उपयोगी पडते यामध्ये दोन प्रकार असतात स्थानिक रक्तमोक्षण म्हणजे जळवांचा, फासण्यांचा उपयोग करून शरीरातील दूषित रक्त काढणे व सार्वदेहिक रक्त मोक्षन म्हणजे सिरींज द्वारे शरीरातील रक्त काढणे. हा उपाय ही अत्यंत परिणामकारक आहे.

कटि बस्ती

हा स्नेहन प्रक्रिये चा एक प्रकार आहे. कंबर दुखणे , lumbar spondylosis, lumbar stenosis, degenerative changes, disc herniation इत्यादि कंबरदुखीच्या प्रकारांवर हा उपाय फायदेशीर ठरतो.

मन्या बस्ती

Cervical spondylosis, मानदुखी, मानदुखीमुळे चक्कर येणे, हाडांची झीज यावर हा उपाय केल्या जातो.

मानस रोग, सत्वावजय चिकित्सा

सत्वावजय चिकित्सा (Satvavajaya Chikitsa) म्हणजे आयुर्वेदातील एक उपचार पद्धती आहे, जी मनावर आधारित असून मानसिक आणि भावनिक विकारांवर उपचार करते; यामध्ये मनःशुद्धी (mind purification), समुपदेशन (counseling) आणि योग-ध्यान (Yog-Dhyan) यांसारख्या तंत्रांचा वापर करून मन आणि बुद्धी (सत्व) यांना संतुलित केले जाते, जसे की आधुनिक वैद्यकशास्त्रात मनोचिकित्सा (Psychotherapy) किंवा CBT (Cognitive Behavioral Therapy) असते. 

यामध्ये औषधांऐवजी खालील गोष्टींचा वापर होतो:

  • समुपदेशन (Counseling): रुग्णाशी बोलून, त्यांचे विचार समजून घेऊन मार्गदर्शन करणे.
  • यम-नियम, प्राणायाम, ध्यान (Yoga & Meditation): मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी.
  • नीतिशास्त्र (Ethics): चांगल्या विचारांना प्रोत्साहन देणे.

समुपदेशन

आयुर्वेद हा मनोकायिक विकारांचा अत्यंत सखोल विचार करतो. शरीरातील अनेक दुखण्यांचे मूळ हे मनात असते असे मानतो. त्यामुळे मानसिक ताण-तणावजन्य विकारांमध्ये औषधांसोबत आयुर्वेदिक सिद्धांतावर आधारित समुपदेशन (counselling) केले जाते, जे रोगाचे मुळापासून उच्चाटन करायला अत्यंत प्रभावी ठरते.

ध्यान चिकित्सा

मानसिक विकार, जुनाट शारिरीक विकार, श्वासाचे विकार, वेदना सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान प्रक्रिया, योगनिद्रा इत्यादी यौगिक प्रक्रियांचा खूप चांगला उपयोग होतो. यासाठी श्रद्धा आयुर्वेद चिकित्सालयात एक अत्यंत उपयुक्त अशी ध्यानाची खोली बनवली आहे, जिथे  की तुम्ही ओंकार ध्यान आणि इतर प्रकारचे ध्यान शांत वातावरणात करू शकतात.

श्रद्धा आयुर्वेद चिकित्सालयात वरील सर्व उपचार उपलब्ध आहेत.