https://goodworld.in A website by Madhav Bhope

माझी नात सौम्या हिने तिचे यू ट्यूब चॅनेल Saumyas Corner सुरू करून आता 2 वर्षांपेक्षा जास्त झाले. या कालावधीत, तिने तिच्या आईच्या मदतीने आतापर्यंत 75 videos टाकले आहेत. त्यातील ‘संध्याकाळचे श्लोक’ हा तिचा व व्हिडिओ खूप जणांनी पाहिला आणि आतापर्यंत त्याचे 1 लाख views झाले आहेत. तसेच दूसरा एक व्हिडिओ ‘गणपतीचे श्लोक आणि स्तोत्र’ हा व्हिडिओही 6.2k वेळेला पाहिला गेला आहे. तसेच आजपर्यंत तिच्या चॅनेलचे 497 subscribers झाले आहेत. 500 subscribers चा टप्पा गाठायला फक्त 3 कमी! तिने टाकलेल्या व्हीडिओज मध्ये मुख्यतः

  1. श्लोक, स्तोत्रे, व इतर,
  2. भगवद्गीता अध्याय
  3. माझ्या आवाजातील गाणी
  4. My drawing
  5. Art and Craft
  6. Games
  7. My dance videos

इत्यादींचा समावेश आहे.

नुकतेच तिने “Science Experiments with Saumya”, “I got selected for the final round of dance competition”,

 

 

 

“ ये ग ये ग रखुमाई Song with lyrics” इत्यादि व्हीडिओज तसेच पुण्याच्या पावसात “ए आई, मला पावसात जाऊ दे”  इत्यादि short videos टाकले आहेत. ते  अवश्य पाहण्यासारखे झाले आहेत. तसेच पुण्यातील (पिंपरी चिंचवड) येथील एका सुप्रसिद्ध गार्डन मध्ये dinosaur सोबत काढलेला व्हिडिओ हे बघण्यासारखे झाले आहेत.

सौम्याचे व्हीडिओज पाहण्यासाठी तिच्या चॅनेल ला खाली दिलेल्या लिंकवर जाऊन, बघू शकता, आणि Subscribe चे बटन दाबून Subscribe  करून तिला 500 चा टप्पा पार करायला मदत करू शकता.

Saumyas Corner subscribe

वरील सर्व व्हीडिओजच्या लिंक्सला क्लिक करून वरील व्हीडिओज आणि shorts बघू शकता.


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.