https://goodworld.in A website by Madhav Bhope

Emotional Intelligence in simple words

Emotional Intelligence किंवा भावनिक बुद्धिमत्ता हा शब्द जरी बोजड वाटत असला, तरी तसे वाटायचे कारण नाही. साध्या शब्दात सांगायचे झाल्यास, ज्याला आपण व्यवहारात परिपक्वता maturity म्हणतो, ती जर डोळ्यासमोर आणली, तर आपल्याला नेमके काय अपेक्षित आहे हे लक्षात येईल.

Five components of Emotional Intelligence

पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी E.I.( किंवा यालाच E.Q.- Emotional Intelligence Quotient असेही म्हणतात) चे ढोबळमानाने 5 आधारस्तंभ कल्पिले आहेत.

5 components of emotional intelligence
5 components of emotional intelligence

Self awareness, Self Regulation, Motivation, Empathy आणि Social skills. यातील पहिले 3 स्वतःशी संबंधित आहेत तर नंतरचे 2 हे समाजाशी संबंधित आहेत.

  1. पहिला म्हणजे, स्वतःचा स्वभाव ओळखणे ( याच्यात SWOT analysis आले- म्हणजे Strengths, Weaknesses, Opportunities and Threats ओळखणे )  म्हणजेच आपल्या स्वभावातील बलस्थाने, कमजोरी, इत्यादि ओळखणे.
  2. नुसते ओळखून न थांबता, मनाला प्रयत्नपूर्वक वळण लावणे ( Self Regulation),
  3. स्वतःला कायम motivated म्हणजेच प्रेरित ठेवणे,
  4. दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणे. ( Empathy- ही पेक्षा वेगळी आहे. Sympathy मध्ये एक प्रकारचा दयेचा भाव आहे- तर Empathy म्हणजे मी जर त्याच्या जागी असतो तर- Stepping into the others’ shoes – हा विचार आहे)
  5. आणि, Social skills.अर्थात, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी, त्यातील प्रत्येक घटकाशी चांगले संबंध ठेवणे

वरील सर्व विवेचन हे ढोबळमानाने झाले, आणि यात अनेक शंका काढता येऊ शकतील- उदा.- माझा शेजारी माझ्या दारात कचरा टाकीत असेल, तर मी त्याच्याशी चांगले संबंध कसे ठेवू? आणि मी जर दुसऱ्यांच्याच विचार करायला लागलो, तर माझे काय? अशाने तर झालेच कल्याण! लोकांना काय, ते तर टपलेलेच आहेत गैरफायदा घ्यायला! लोकांचा विचार करायला लागलो तर लवकरच भिकेला लागून जाईन ना मी!

वरील विचार लगेचच मनात येणे साहजिक आहे.

हे विचार सध्या बाजूला ठेवूत. आपल्याला स्वतःवर काम करायचे आहे. वरीलपैकी पहिला घटक म्हणजे स्वतःला ओळखणे.

Indian philosophy on Emotional Intelligence.

“ मी देह नाही, आत्मा आहे”- ही फार वरची पायरी झाली! तिथपर्यंत पोंचायचेच आहे- पण एखाद्या वेळेस आपण एका कागदावर, एका बाजूला आपली बलस्थाने, आणि दुसऱ्या बाजूला कमजोर बाजू, लिहून काढल्या, तर आपले आपल्यालाच काही गोष्टींबद्दल विचार करणे भाग पडेल. बलस्थाने काय असू शकतात-उदा .- “मी सहनशील आहे, कुठल्याही वातावरणाशी adjust करून घेऊ शकतो, मला एखादी गोष्ट इतरांपेक्षा चट्कन लक्षात येते, माझी स्मरणशक्ती चांगली आहे”-इत्यादि- असे अनेक plus points असतील ते लिहीत जायचे. नंतर दुसऱ्या बाजूला, आपले weak points लिहीत जायचे- जसे की “मला राग फार पट्कन येतो, मला खायची वस्तू समोर दिसल्यावर मनावर ताबा राहत नाही, मला नियमितपणे एखादी गोष्ट करायची म्हटले तर फार कंटाळा येतो” इत्यादि.

Behavioral Science च्या ट्रेनिंग मध्ये या प्रकारची एक activity असते. आणि ती खूप उपयुक्त असते.

त्याने काय होईल?

कुठे तरी आत्मभान येईल. सिंहावलोकन होईल.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः|| भगवद्गीता ॥ ६-५॥

अर्थात, स्वतःचा उद्धार स्वतःलाच करायचा आहे, (दुसरे कोणी येणार नाहीये!)।

स्वतःच स्वतःचा मित्र किंवा शत्रू असतो!

Self Assessment

आपण कधी स्वतःचे प्रामाणिक मूल्यमापन करतच नाही. In fact, “ मी आहे हा असा आहे!” Take it or leave it! अशी आपण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल एक उगीचच अहंभावना करून घेतली असते. आपल्या हेकेखोर स्वभावालाच आपण आपली identity- ओळख म्हणून अभिमानाने मिरवीत असतो. त्याच न्यायाने पाहू गेल्यास एक दारुडा, दारू पिण्याच्या आपल्या सवयीलाच आपली identity मानून, ती कधीच सोडू शकणार नाही!

मनाचा हा हेकेखोर स्वभाव आपल्या संतांनी चांगलाच ओळखला होता, आणि म्हणून त्याला चुचकारत, समजावत, एक प्रकारचा self talk करत, समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहिले आहेत. गीतेमध्ये तर मनाच्या विविध अवस्था, त्यांचे परिणाम, आणि मनाला कसे ताब्यात आणायचे, याबद्दल ठिकठिकाणी उल्लेख आला आहे. महर्षि पतंजलीनी “योगश्चित्तवृत्तिर्निरोध:” असे सांगून, वेगवेगळ्या प्रसंगांना कसे सामोरे जावे याबद्दल सूत्ररूपात मार्गदर्शन केले आहे.

वरील सर्व चर्चा ही खूप interesting होणार आहे.

पुढील काही भागांत याबद्दल चर्चा करूयात. Stay tuned!


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading