https://goodworld.in A website by Madhav Bhope

Health and Wellness category

गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्र खूप बदलले आहे. उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी वाढते आहे. यावर्षी तर फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच उन्हाळा जाणवायला लागला, आणि आता मार्चच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच, मे महिन्यासारखे ऊन्ह पडते आहे. तापमान 40 डिग्री च्या जवळपास पोचले आहे.

उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागणे, कितीही पाणी पिले तरी तहान न भागणे, डोळे जळजळ करणे, अंगातील शक्ति कमी होणे, पाय दुखणे, लघवीला जळजळ होणे, अन्न पचन नीट न होणे, असे अनेक त्रास या दिवसांमध्ये आपल्यापैकी काही जणांना होतात.

काही दिवसांपूर्वी मीही अशाच काहीश्या त्रासाकरिता आमच्या नेहमीच्या वैद्यांकडे गेलो होतो. त्यांनी एक अत्यंत साधे घरगुती औषध सांगितले. त्याचे नांव षडंगपानीय. त्यात कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात किंवा जडीबूटीच्या दुकानात मिळणारी नेहमीच्या ओळखीची द्रव्ये आहेत.

  1. मुस्ता, म्हणजेच नागरमोथा
  2. पर्पटक म्हणजेच पित्तपापडा
  3. वाळा किंवा ज्याला उशीर असेही म्हणतात (जो आपण थंड पाण्याच्या माठात पूर्वी टाकायचो, ज्याचा सुवास येतो आणि पाण्याला छान चव येते व तहान भागते)
  4. रक्तचंदन (लाल रंगाचे चंदन)
  5. उदीच्य- पांढरे चंदन
  6. सुंठ पावडर

मुस्तपर्पटकोशीरचन्दनोदीच्यनागरै :
शृतशीतं जलं देयं पिपासा ज्वर शान्तये

भैषज्य रत्नावली . . ज्वराधिकार

वरील सर्व चूर्ण प्रत्येकी 20 ग्रॅम घेऊन, साधारण 1200 ml पाण्यामध्ये स्टीलच्या पातेल्यात उकळायचे. उकळून साधारण अर्धे झाले, की खाली काढून, गाळून थंड करून ठेवायचे.

वरील पाणी हे पित्त आणि कफ यांच्या विकारांवर उपयोगी आहे. तसेच वरील कारणामुळे आलेला ज्वर (ताप) ही यामुळे कमी होतो.

वरील पाणी जेंव्हा जेंव्हा तहान लागेल तेंव्हा, किंवा थोड्या थोड्या वेळाने, थोडे थोडे, म्हणजे घोट  घोट पीत राहायचे. मात्र रोज नवीन पाणी तयार करायचे.

मी वरील सर्व पावडर आणून असे पाणी घेतल्यावर खूप छान वाटले. थोड्याश्या पाण्यानेही, उष्णतेमुळे होणारे त्रास लगेच दूर झाले. वरील पाणी हे पाचक ही आहे. शरीरातील आम दोष, म्हणजे न पचलेला किंवा अर्धवट पचलेला जो भाग असतो, तो पचवला जातो.

काही वेळेला, अशा छोट्या छोट्या त्रासाकरिता, आपल्या family vaidya चा सल्ला सहजपणे खूप काम करून जातो. अर्थात त्यासाठी असे family vaidya प्रत्येक कुटुंबासाठी असले पाहिजेत.

अर्थात, वरील माहिती, ही कुठलाही वैद्यकीय सल्ला नाही. आणि मी कुणी जाणकार वैद्यही नाही. पण सोपा उपाय शेअर करावा म्हणून हा प्रपंच केला आहे.

वरील सर्व घटक असलेली तयार पावडरही काही ठिकाणी मिळते. त्यात Amazon वर काही उपलब्ध आहेत. 

पण त्यापेक्षा सर्व पावडर आपल्या जवळच्या दुकानातून आणून त्या एकत्र करून वापरणे जास्त चांगले असे मला वाटते. 

 

Ganesha idol
Ganesha idol
Stepped Stool
Stepping stool
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.