https://goodworld.in A website by Madhav Bhope

Guest article by vaidya Sohan Pathak

संभाजी नगरातील बिबट्याचे पुराण!

 
अहो काय वैताग! गेले तीन दिवस संभाजीनगरच्या सो कॉल्ड कोथरूडमध्ये म्हणजेच उल्कनगरीमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याने अक्षरशः थैमान घातले आहे. 
 
वनविभागाचे कर्मचारी सोडून बाकी तमाम जनतेला त्या अजब प्राण्याने सीसीटीव्हीतून दर्शन दिले आहे. कदाचित त्या बिबट्याचा मागचा जन्म कॅमेरा समोर वावरणाऱ्या एखाद्या सराईत कलाकाराचा असावा. या बिबट्याच्या भीतीपोटी मात्र आधीचेच सहनशील संभाजीनगर कर अजूनच त्रस्त झाले आहेत पण महानगरपालिकेचे कर्मचारी मात्र पाण्याची चर्चा दुसरीकडे वळाली म्हणून खूप आनंदी झाले आहेत असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका मनपा कर्मचाऱ्याने सांगितले.Leopard
बऱ्याच  ऑर्थोपेडिक सर्जन कडे-अचानक वर कुठे बिबट्या झाडावर बसलेला आहे का या चिंतेपोटी वर बघून चालण्यामुळे,  धपकन रस्त्यात, खड्ड्यात ,पाण्यात पडल्यामुळे जखमी झालेले बिचारे संभाजीनगर कर चकरा मारत आहे असेही कळाले . 
 
अचानक मफलर च्या विक्रीत वाढ झाल्याचे सुद्धा कळाले, कारण बिबट्याने आपल्या गळ्याला धरल्यावर, त्याचे दात लागू नये म्हणून काहीतरी आवरण हवे म्हणून बरेच जण मफलर घालून फिरत आहेत!  दिवसभर बिबट्याच्या चर्चा ऐकून रात्री स्वप्नात सुद्धा बिबट्या आल्यामुळे झोपेत बेड वरून खाली पडणे, तसेच जोरात ओरडणे,  व नवरा बायकोने एकमेकाला बिबट्या समजून हाणामारी करणे अशा अनेक घटना सुद्धा होत आहेत!
 
बायकोच्या बडबडीला कंटाळून संध्याकाळी, रात्री “जरा बाहेर चक्कर मारून येतो” असे म्हणून बाहेर पडणारे बिचारे पुरुष सध्या बिबट्या पेक्षा बायको बरी! म्हणून घरीच श्रवणीय आनंद घेत आहेत. 
 
आता निवडणुका ,मॅचेस सगळं काही संपल्यामुळे तरुण वर्गाला सुद्धा बिबट्याची चर्चा करत अनेक जणांशी, जणींशी जवळीक साधता येत आहे. जनरल प्रॅक्टिशनर मात्र या बिबट्यामुळे जरा नाराज आहेत. कारण या बिबट्याच्या भीतीपोटी अनेक जणांचा कॉन्स्टिपेशन चा त्रास आपोआपच बरा झाला आहे त्यामुळे त्या औषधासाठी येणारे रुग्ण खूप कमी झाले आहेत. 
 
आजोबा मंडळी जंगलातले प्राणी आता शहरात यायला लागले म्हणजे आता कलियुगाचा अंत आला ,काहीतरी भयंकर होणार अशा चिंता करत संध्याकाळी कट्ट्यावर भेटण्याचे ऐवजी एकमेकाना ज्येष्ठ नागरिकांच्या व्हाट्सअप ग्रुप वरून कॉल करून संपर्क करत आहेत. 
 
या बिबट्याच्या निमित्ताने आमच्या काळात तर… असे म्हणत किती वाघ पाहिले किती जंगली प्राणी पाहिले अशी पण चर्चा करत मनाचे समाधान करताना दिसत आहेत. अचानक शाळेला सुट्टी मिळाल्यामुळे मुलं-मुली आनंदातच आहेत त्यांच्या घरातल्या दंग्यामुळे आयांना येणाऱ्या रागामुळे बहुदा बिबट्या शहरातून पळून गेल्याची पण शक्यता नाकारता येत नाही.
 
हा बिबट्या पण खूप हुशार दिसतोय सगळ्या सीसीटीव्ही कॅमेर्यात व्यवस्थित पोज देत आहे यामुळे अफवा पसरवणाऱ्यांना दहा-दहा वर्षाचे जुने बिबट्यांचे व्हिडिओ सुद्धा प्रसारमाध्यमात पसरवायला भरपूर वाव मिळत आहे. मला तर वाटते की या सगळ्या प्रकाराला कंटाळून वनविभागाच्या पिंजऱ्यांमध्ये बिबट्या स्वतःहूनच येऊन बसेल आणि संभाजीनगर कर सुटकेचा श्वास घेऊन कुठे जलवाहिनी फुटली याची चर्चा करत बसतील.
मी सो…पा…
May be an image of cheetah, big cat and snow leopard
 
 

 बिबट्या कुठे आढळून आल्यास टोल फ्री नंबर 1926 

24*7 नंबर- 95792 71552

c6d568ad b7d1 44a2 9f31 734d0cfc0fa1

dr sohan pathakसदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक  आणि समुपदेशक वैद्य  सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे. 

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading