https://goodworld.in A website by Madhav Bhope

बीमा सखी योजना- 18 ते 70 वयोगटातील महिलांना एलआयसी एजंट बनण्याची सुवर्णसंधी- सोबत महिना 7000 रूपये स्टायपेण्ड!

दि. 9 डिसेंबर च्या वर्तमानपत्रात “बीमा सखी योजना” या नांवाची, LIC India(भारतीय जीवन बीमा  निगम)ची एक योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आल्याची बातमी वाचण्यात आली. या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी हरियानातील पानिपत या शहरी केल्याचे वाचण्यात आले. तसेच वर्तमानपत्रात याबद्दल त्या दिवशी LIC तर्फे देण्यात आलेली जाहिरातही वाचण्यात आली.

कुतूहलाने त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, त्यातील एका वैशिष्ट्याने लक्ष वेधून घेतले- ते म्हणजे यासाठी 18 ते 70 वयापर्यंतच्या, कमीत कमी 10 वी पास असलेल्या महिला पात्र आहेत. LIC अशा प्रकारे 2 लाख महिलांना एक उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणार आहे असे म्हटले आहे. त्यासाठी निवडलेल्या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा रु. 7000 चा स्टायपेण्ड देण्यात आहे- म्हणजे वर्षाचा रु. 84000- दुसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 6000- म्हणजे वर्षाचा रु. 72000 आणि तिसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 5000-म्हणजे वर्षाचा रु. 60000- असा 3 वर्षांचा एकूण रु. 2,16,000 स्टायपेण्ड देण्यात येणार असल्याचे लिहिले आहे- आणि हा 3 वर्षांचा कालावधी हा प्रशिक्षण काळ राहील असे सांगितले आहे. या कालावधीच्या पूर्ततेनंतर संबंधित महिलांना LIC Agent म्हणून काम करता येणार आहे( LIC चे कर्मचारी नव्हे), आणि त्यातील ग्रॅजुएट असलेल्यांना विकास अधिकारी (Development Officer) म्हणून काम करण्याचीही संधी मिळू शकते असे लिहिले आहे.

अजून या योजनेचे पूर्ण तपशील कळू शकले नाहीत. जसे की- या कालावधीत कसे प्रशिक्षण दिले जाईल? आणि कुठे? तसेच LIC च्या संबंधित वेबसाइट वर वरील स्टायपेण्डच्या समोर वर्षभरात 24 पॉलिसीज- म्हणजे साधारण महिन्याला 2 पॉलिसीज कराव्या लागतील असा उल्लेख आहे. त्यामुळे अशा पॉलिसीज जर पूर्ण नाही होऊ शकल्या तर काय, याबद्दल उल्लेख नाही. मात्र केलेल्या पॉलिसीज वर कमिशन वेगळे मिळेल असा उल्लेख आहे. त्यामुळे ज्या महिलांना अशा प्रकारच्या कामात रस आहे, थोडे अधिकचे काम करून उत्पन्न मिळविण्याची इच्छा आहे, त्यांनी यासंदर्भात apply करून बघायला काही हरकत नाही, असे वाटते. आणि त्यासाठी जास्त काहीच कागदपत्र देण्याची गरज नाहीये. त्यामुळे आपल्या महितीतील कोणी अशा महिला असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोंचवावी असे वाटते. तसेच  इच्छुक महिलांनी LIC च्या वेबसाइट वर जाऊन apply करावे.

या संदर्भातील सगळे तपशील खाली दिले आहेत.

सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये, google search वर जाऊन, bima sakhi(इंग्लिश मध्ये) किंवा बीमा सखी (मराठीमध्ये) टाइप करावे. त्यानंतर जे रिजल्ट येतील, त्यात खालील वेबसाइट दिसेल (अगदी पहिल्याच क्रमांकावर नाही, पण वरून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर) https://licindia.in/lic-s-bima-sakhi

त्यावर क्लिक करावे. त्यानंतर खालील स्क्रीन येईल-

 

lic-1 स्क्रीन वर अजून खाली गेल्यानंतर Click here for Bima Sakhi असे एक बटन येईल. त्यावर क्लिक करायचे-lic-3

 

 

त्यांनंतर अर्जाचा खालील स्क्रीन येईल.lic-5

 

त्यात आपली माहिती भरायची. जन्मतारीख टाकतांना ती MM/DD/YYYY या फॉरमॅट मध्ये टाकायची आहे, म्हणजे जन्माचा महिना पहिल्यांदा, नंतर जन्मतारीख, आणि नंतर वर्ष. आपल्या मोबाईल नंबरच्या कॉलम मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. ई -मेल अॅड्रेस असल्यास टाका, नसल्यास ती जागा रिकामी सोडा. त्यानंतरच्या कॉलम मध्ये- Are you related–… इत्यादि मध्ये मात्र No वरती क्लिक करणे आवश्यक आहे- अर्थात त्यासाठी तुम्ही LIC ह्या कुठल्याही एजंट, डेव्ह. ऑफिसर, कर्मचारी, इत्यादींच्या नात्यात येत नसले पाहिजे. 

त्यानंतरच्या कॉलम मध्ये तिथे दिलेला Captcha भरायचा, आणि नंतर सबमिट करायचे.  सबमिट केल्यावर खालील मेसेज येईल- अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकेल.

LIC-6 (1)

 

 

 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading