आम्ही मतदान केले. तुम्ही ? We have voted for Indian democracy. Have You?
लोकशाहीचा उत्सव- मतदान
आमचे मतदान केंद्र यावेळीही, जय भवानी विद्या मंदिर होते. पण तिथे शालेय आणि महाविद्यालयीन असे दोन भाग आहेत याची माहिती कुठेच नव्हती. हा पूर्ण पणे मध्यम तसेच उच्च वर्गीय भाग असल्यामुळे की काय, इथे पोलिंग एजंटही अगदी तुरळक दिसतात. आम्ही सुरुवातीला रूम नंबर 3 पाहून रांगेत लागलो. पण थोडे पुढे गेल्यावर कुणीतरी सांगितले, की तुमचे मतदान पलीकडे आहे.. ही रूम नंबर 3 शालेय विभागातील.. पलीकडे महाविद्यालयीन विभागातील मतदान कक्ष आहेत-मग तिकडे गेलो. तिथे छोटीशीच रांग होती. पण 7.40 झाले होते तरी अजून तिथे मतदान सुरूच झाले नव्हते. काय समस्या आहे म्हणून विचारले असता कळाले की काही तांत्रिक समस्या आहे.. ती सोडवणे चालू होते.. तिथे कर्तव्यावरील लोकांनी खरे तर किमान अर्धा तास आधी येऊन सर्व व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा करणे अपेक्षित आहे. कदाचित तसे ते आले ही असतील. इतक्यात जमलेल्या लोकांपैकी एकाने तिथल्या जबाबदार व्यक्तीला खडसावणे सुरू केले.. वरपर्यंत फोन लावण्याची तयारी सुरू केली. इतक्यात सुदैवाने काय समस्या असेल ती सुटली, आणि एकदाचे मतदान सुरू झाले.
मतदान प्रक्रिया अजून कार्यक्षम होऊ शकेल.
आपल्या इथे लवकर लवकर मतदान होण्यासाठी, सर्वच प्रक्रिया अजून कार्यक्षम होण्याची गरज आहे असे प्रत्येक वेळी वाटते. अर्थात तरीही, इतर देशांच्या तुलनेत, आणि आपल्या येथील कामाची प्रचंड व्याप्ती, प्रचंड लोकसंख्या, इत्यादि पाहता, तसेच मतदान कर्मचाऱ्यांवर असणारा ताण पाहता, आपल्या येथील व्यवस्था खूप चांगली आहे, असेच म्हणावे लागते.. त्याबद्दल निश्चितच त्यांचे कौतुक आहे.
आणि काहीही असले, तरी, एक नागरिक म्हणून आपल्या हातात असलेले मतदान हे एकमेव शस्त्र आहे. त्याचा वापर करणे हे अगत्याचे आहे.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.