https://goodworld.in A website by Madhav Bhope

The story of the 10th Man- दहाव्या माणसाची गोष्ट

वेद आणि उपनिषदांत त्रिकालाबाधित सिद्धांत सांगितले आहेत. काही काही सिद्धांताना “ महावाक्य” असे म्हणतात. त्यातील छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसि अर्थात, “तूच ते ब्रम्ह आहेस” हे खूप प्रसिद्ध आहे. 

उपनिषदांतील हे सिद्धांत आपल्या आचार्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टींद्वारे खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत. 

चौदाव्या शतकात विद्यारण्य  स्वामी हे तत्त्वचिंतक होऊन गेले. त्यांनी उपनिषदांतील सिद्धांतावर “पंचदशी” ही टीका लिहिली. त्यात त्यांनी एका मजेदार गोष्टीद्वारे एक मोठे तत्व विषद करून सांगितले आहे.

एकदा दहा मित्र जंगल भ्रमणासाठी निघाले होते. जंगलातून जाता जाता एके ठिकाणी त्यांना एक नदी लागली. नदी चांगलीच खोल होती. त्या नदीतून आपण सर्वजण पलीकडच्या तीरावर सुरक्षित पोंचू की नाही, याविषयी त्या सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली.  तरी सगळे मित्र एकमेकांचे हात धरून कसेबसे नदीच्या पैलतीरावर पोंचले. 

पैलतीरावर आल्यानंतर त्या सर्वांनी ठरवले, की आपण सगळे आलोत की नाही हे एकदा मोजून पाहू. 

ते सर्व गोल करून उभे राहिले. मग त्यातील एकाने त्याच्या डाव्या बाजूपासून मोजायला सुरूवात केली- एक-दोन-तीन- चार..असे करत करत त्याने नऊ पर्यंत मोजले आणि त्याच्या उजव्या हाताच्या मित्रापर्यंत येऊन थांबला. तो एकदम चमकून म्हणाला, “अरे देवा, आपण निघालो तेंव्हा दहा होतो. आणि आता फक्त नऊच आहोत. एक जण कमी आहे! हाय रे दैवा! आपल्यापैकी एक जण बुडाला वाटते.” 

त्याच्या बाजूचा मित्र म्हणाला “ अरे, थांब, थांब. तू नीट मोजले नसशील. मी मोजतो.” असें म्हणून त्यानेही त्याच पद्धतीने मोजले, आणि अर्थातच ते नऊच भरले. आता त्याची खात्री झाली. मग एकेक करत बाकीच्या सर्व मित्रांनी त्याच पद्धतीने मोजले आणि सर्वांची गणती नऊच भरली. तेंव्हा ते सर्व खाली बसून मोठमोठ्याने रडू लागले आणि आपल्यातील एकजण बुडाला म्हणून शोक करू लागले. 

तिकडून एक पांथस्थ चालला होता. त्यांचे रडणे ऐकून तो थांबला, आणि काय झाले म्हणून विचारू लागला. 

तेंव्हा सर्व मित्रांनी त्यांचे रडण्याचे कारण सांगितले. तो वाटसरू हुशार होता. त्याने पट्कन मोजून पाहिले तेंव्हा त्याला दहा लोक दिसले. मग तो त्या सर्वांना म्हणाला, “ शांत व्हा, शोक करू नका. तुमच्यातील कोणीही बुडाले नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा.” 

तेंव्हा ते मित्र त्याला म्हणाले, “तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? तुम्ही आम्हाला दहावा मित्र दाखवा, तर आम्ही विश्वास ठेवू”. 

मग त्या वाटसरूने त्यातील पहिल्या मित्राचा हात धरून त्याला पुन्हा मोजायला सांगितले. एक- दोन करीत तो जेंव्हा नवव्या पर्यंत आला, तेंव्हा मग त्या वाटसरूने त्याचा हात धरून त्या मित्राकडे स्वतः कडे वळविला, आणि म्हणाला, “ त्वं दशमस्ति” तूच तो दहावा आहेस. त्याबरोबर त्या मित्राला परम आनंद झाला आणि  “सापडला, सापडला, दहावा सापडला!” असे म्हणून तो आनंदाने नाचू लागला. त्या वाटसरूने एकेक करीत त्या दहाही मित्रांना अशा प्रकारे त्यांच्यातील कोणी हरवला नसल्याची खात्री करून दिली. 

वरील उदाहरणात, वास्तविक, दहावा कुठे गेलेलाच नव्हता, आणि मोजणारा स्वतःच तो होता. पण तो स्वतः ला सोडून सगळ्यांना मोजत होता. 

 

वरील उदाहरणात मनुष्याच्या अध्यात्मिक वाटचालीतील 7 टप्पे आहेत.

  1. Ignorance- अज्ञान- नदीच्या अलीकडील तीरावर असतांना, पुढील मार्गाबद्दल काहीच माहीत नसणे.
  2. Covering of the truth- आवरण. दुसऱ्या टप्प्यात नदीच्या दुसऱ्या तीरावर आल्यावर, एकजण कमी आहे असे वाटणे. म्हणजेच, खरे तर सत्यावर आलेले आवरण.
  3. Suffering- -born out of the first 2 विक्षेप: म्हणजेच पहिल्या 2 टप्प्यांमुळे निर्माण झालेले दुःख.
  4. Indirect knowledge- परोक्षज्ञान. जेंव्हा त्याला इतर कुणी( अर्थात गुरु किंवा तत्सम ज्ञानी पुरुष) सत्य परिस्थिती सांगतो, तेंव्हा त्यावर तो विश्वास ठेवतो. पण त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो.
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान. म्हणजे जेंव्हा त्याला स्वतःला त्या सत्याचा अनुभव येतो.
  6. Removal of sufferning/sorrow-दुःख निवृत्ती. सत्याचा अनुभव आल्यानंतर दुःख नाहीसे होते.
  7. Bliss- – happiness- तृप्ति- त्यानंतर त्याला करण्यासारखे काही राहत नाही. तो कृतकृत्य होतो.

वरील उदाहरण रामकृष्ण मठाचे  स्वामी सर्वप्रियानंद यांच्या प्रवचनातून वेचून, इथे प्रस्तुत केले आहेत. तसेच इतर काही स्रोतांचा इथे वापर केला आहे. 

काहीतरी सकस वाचूयात.
उन्नतीच्या मार्गावर चालूयात!

The story of the 10th Man.

In the Vedas and Upanishads, some eternal principles are stated. These are are called  “Mahavakyas”, meaning the “great phrases.” Of these, the “Tattvamsi” of the Chhandogya Upanishad, which means “You are that Brahma”, is very famous.

These principles in the Upanishads have been explained by various scholars in the ancient times in a very simple manner through some stories.

The 14th century scholar Vidyaranya swami had written a book called “Panchadashi” in which he explains the principle very lucidly with the help of an interesting story.

Once ten friends were passing through a forest.  On their way through the forest, at one point they came across a river. The river was quite deep. They all doubted whether all of them would be able to reach the other end safely.  So all the friends held each other’s hands and somehow reached the other end of the river.

After coming to the other end, they all decided to count their numbers to ensure that none of them was left out.

They all stood in a circle. Then one of them started counting from his left side—  one-two-three, four..In doing so, he counted upto nine and reached for his right-hand friend. Then he stopped as there were no more to be counted. He was terrifed and said, “Oh my God, we were ten when we started. And now we’re only nine. One less!  One of us seems to have drowned!.”

The friend next to him said ” Oh, wait, wait. Perhaps you have not counted properly. Let me count.”  So he counted the same way, and to his horror, it was nine again! So he was also convinced and joined the first friend and started yelling. Then, one by one, all the other friends counted in the same way, and all counted nine. Then they all sat down and started crying loudly and mourning the death of one of them. 

There was a passerby walking from there. Hearing them cry, he paused, and began to ask what had happened.

Then all the friends told him the reason for their grief.  The passerby was a normal person and he could clearly see that there were 10 of them.. Then he said to them, ” Calm down, don’t mourn. None of you have drowned, trust me.”

Then the friend said to him, how can I trust you? If you show us the tenth friend, we’ll believe it.

Then the passerby grabbed the hand of his first friend and asked him to count again. When he came to the ninth, counting from one, two etc,  then the passerby took his hand and turned it to the friend himself, and said, “You are the tenth.” It suddenly dawned on to the first friend that no one was lost and he himself was the 10th one.  With that, the friend was overjoyed and said, “Found, found, tenth found!” So he started dancing with joy. One by one, the passerby convinced all ten friends that none of them had been lost and in fact they were the 10th friend.

The above story depicts 7 stages in the spiritual life of a person.

7 stages in the story of the 10th man

  1. Ignorance- अज्ञान 
  2. Covering of the truth-आवरण 
  3. Suffering- विक्षेप -born out of the first 2. projection of imagined tragedy
  4. Indirect knowledge-परोक्ष ज्ञान 
  5. Direct realization- अपरोक्ष ज्ञान 
  6. Removal of suffering/sorrow-दुःखनिवृत्ती 
  7. Bliss- – happiness-तृप्ति 

The above story and its explanation is sourced from the discourses of Swami Sarvapriyananda of Ramkrishna Math and some other sources.

Let us read something healthy and walk on the path of self realization.

Cycle brand Pure Gavi Cow Dung Sambrani Dhoop cups for Pooja. Click to buy on Amazon

amazon product 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading