touch-quiz-gita-adhyaya-mobile-addiction
तुम्ही क्विझ सुरू केल्यावर, पहिला स्क्रीन तुम्हाला येईल- Bhagvad Gita Chapter 12 Quiz- Shloka-1 या नांवाने. त्यात पहिल्यांदा फिक्या अक्षरांत त्या श्लोकातील शब्द random म्हणजेच कुठलाही क्रम नसलेले, येतील. उदाहरणार्थ- पहिला श्लोक ‘अर्जुन उवाच’ पासून सुरू होतो. “अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः
यातील सर्व १२ शब्द वर दिलेले आहेत. तुम्हाला ते शब्द योग्य क्रमाने तुमच्या बोटाने ओढून त्यांच्या योग्य जागी बसवायचे आहेत. शब्दाची जागा योग्य असेल तर तो तिथे फिट बसेल, अन्यथा बसणार नाही. वरील श्लोकाचे सगळे शब्द योग्य जागी बसले, की तुम्हाला अभिनंदनपर मेसेज येईल, पूर्ण श्लोक पुन्हा लिहून येईल, आणि पुढील श्लोकाला जाण्यासाठी Next Shloka असे एक बटन येईल
Bhagavad Gita Chapter 12 Quiz
मोबाईल चा सदुपयोग
आजकाल जो पहावा त्याच्या हातात मोबाईल दिसतो. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे क्षणा क्षणा ला मोबाईल मध्ये बघत असतांना दिसतात. आणि त्यात आणखी वाईट म्हणजे, त्यातील ९९ टक्के लोक काय बघत असतात? तर कुठल्यातरी रील्स, किंवा शॉर्ट व्हिडिओ, किंवा तत्सम काही. आणि बोटांनी त्या मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करीत जातात, करीत जातात.. ज्याला की काही अंत नसतो. एकानंतर दुसरी रील किंवा व्हिडिओ येतच जातात. तुम्ही एका प्रकारची रील किंवा व्हिडिओ एकदा पाहिला, की तसेच असंख्य व्हिडिओ येत राहतात. त्यांच्या बघण्यात काही उद्देश असतो का? तर नाही. सुरुवातीला काही तरी बघण्यासाठी किंवा एखादा whatsapp मेसेज बघण्यासाठी, किंवा गूगल वर काही तरी सर्च करण्यासाठी मोबाईल उघडलेला असतो. पण एकदा मोबाईल उघडला, की आपण आधी whatsapp वर जातो, आणि मग मोबाईल कशाकरिता उघडला होता तेच विसरून जातो. जे सर्च करायला मोबाईल उघडला होता, ते विसरून आणि राहूनच जाते. तुमच्यापैकी किती जणांचे असे होते? माझे तर बऱ्याच वेळा असे होते.
बरं आपल्यासारख्यांचे म्हणजे सीनियर लोकांचे जाऊ द्या, (मी माझ्यासारख्या निवृत्त लोकांबद्दल बोलतो आहे). आपण आता पक्के झालो आहेत, आणि आता आपले होऊन होऊन काय नुकसान होणार? असा काही जण विचार करतात. पण लहान मुलांचे काय हो? प्रत्येक घरात, अगदी १ वर्षापासून ते कितीही वर्षांपर्यंतची जी लहान मुलें आहेत, त्यांना या मोबाईल पासून कसे आवरणार, वाचवणार, दूर ठेवणार? घरात लहान मुलांसमोर कुणीही मोबाईल बघायचा नाही- असा नियम करण्याची आहे कुणाची तयारी? एवढेच काय पण त्यांच्यासमोर टीव्ही ही पहायचा नाही.. आहे अशी कोणाची तयारी? त्यांना सतत एंगेज ठेवण्याइतकी, त्यांच्याशी त्यांच्याएवढे होऊन खेळण्याची आहे कोणाची तयारी? तितका वेळ, एनर्जी, इच्छाशक्ति, सहनशक्ति आणि स्किल आहे कोणाकडे? मुलांना हे स्क्रीन पाहण्याची मुळात खरंच आवड नसते हो. त्यांना खेळायला, धावायला, नाचायला, हसायला, उड्या मारायला, मोकळ्या मैदानात जायला, त्यांच्या वयाच्या मित्र मैत्रिणींबरोबर खेळायला खरे तर आवडते. पण आज मुलांना एकटे बाहेर पाठविण्याची कोणाची हिम्मत होत नाही, इतके वातावरण असुरक्षित आहे. मग त्यांना घरातच राहण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग त्यांच्याजवळ असणाऱ्या वेळेचे आणि अमर्याद उत्साहाचे, शक्तीचे काय करायचे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. कंटाळून जातात मुलें.
मग सुरुवातीला कौतुकाने, नंतर सवयीने आणि नंतर नंतर अपरिहार्यपणे, त्यांना मोबाईल दिला जातो. मग ते त्यातील कार्टून्स आणि जिंगल्स बघत बसतात. आणि नंतर नंतर त्यातील गेम्स शिकून घेतात. हे सर्व त्यांच्या युजर्स ने जास्तीत जास्त वेळेपर्यंत ते बघावे, खेळावे, याच उद्देशाने बनवलेले असतात. आवडीची गोष्ट मिळाली, विषय मिळाला, की मनुष्यप्राण्याच्या मेंदूत dopamine (डोपामाईन) harmone secrete होते आणि त्याला आनंदाची अनुभूति होते. मग ही अनुभूति सारखी सारखी घ्यावीशी वाटते. हे मोठ्या माणसांनाही लागू होते. एखाद्या गोष्टीतून आनंद मिळतो असे समजले की ती गोष्ट वारंवार करावीशी वाटते. Dopamine हे Pleasure harmones पैकी एक आहे. आपल्या शरीराला त्याची काही प्रमाणात गरज निश्चितच आहे. पण ते habit forming -सवय लावणारे आहे. त्यामुळे मनुष्य आपल्या आवश्यक कर्तव्यांनाही सोडायला मागे पुढे पाहत नाही.
मोठ्या माणसांची ही परिस्थिति- तर लहान मुलांचे काय हो? ती बिचारी निष्पाप असतात- चांगले वाईट कळण्याची शक्ति नसते (आपल्याला तरी कुठे असते म्हणा!).
आमच्या लहानपणी लहान मुलें माती खाऊ लागली, तर त्यांना गेरू खायला देत. मग त्यांची काही तरी मातीसारखे तोंडात टाकायची खुमखुमी भागत असे, आणि मातीचे दुष्परिणाम होत नसत.
तसेंच काही मोबाईलच्या बाबतीत करता येईल का? हा विचार गेले अनेक दिवस चालू होता. मुलांना मोबाईलपासून पूर्ण वंचित किंवा दूर ठेवणे हे जवळ जवळ अशक्य आहे.
मुलांना गेम्स खेळायला आवडतात.
आपल्याला वाटते, मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. मुलांनी शुभम् करोति म्हटले पाहिजे, गणेश स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र म्हटले पाहिजे, झालेच तर गीतेचा एखादा अध्यायही त्यांना यायला पाहिजे- हे तुमच्या आमच्या सारख्या घरातल्या पालकांचे स्वप्न असते. हो की नाही?
मग जर एखादा गेम किंवा क्विज असा तयार केला- तयार केले, ज्यामध्ये एखादे चांगले स्तोत्र किंवा अध्याय मुलांना पाठ होईल, आणि त्यांचे मोबाईल सोबत खेळणेही होईल, तर? ड्रॅग अँड ड्रॉप करून स्तोत्राचे योग्य शब्द जुळवता आले तर? याच दृष्टीने आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायावर आधारित हे एक क्विझ तयार केले आहे. हे क्विझ ए. आय. चा वापर करून अनेक दिवसांच्या प्रयत्नाने, ए. आय. ला अनेक प्रकारे commands आणि prompts देऊन, trial and error method ने बनवले आहे.
तुम्ही क्विझ सुरू केल्यावर, पहिला स्क्रीन तुम्हाला येईल- Bhagvad Gita Chapter 12 Quiz- Shloka-1 या नांवाने. त्यात पहिल्यांदा फिक्या अक्षरांत त्या श्लोकातील शब्द random म्हणजेच कुठलाही क्रम नसलेले, येतील. उदाहरणार्थ- पहिला श्लोक ‘अर्जुन उवाच’ पासून सुरू होतो. “अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः
यातील सर्व १२ शब्द वर दिलेले आहेत. तुम्हाला ते शब्द योग्य क्रमाने तुमच्या बोटाने ओढून त्यांच्या योग्य जागी बसवायचे आहेत. शब्दाची जागा योग्य असेल तर तो तिथे फिट बसेल, अन्यथा बसणार नाही. वरील श्लोकाचे सगळे शब्द योग्य जागी बसले, की तुम्हाला अभिनंदनपर मेसेज येईल, पूर्ण श्लोक पुन्हा लिहून येईल, आणि पुढील श्लोकाला जाण्यासाठी Next Shloka असे एक बटन येईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढील श्लोकावर गेले, की पुन्हा पुढील श्लोकाचे शब्द त्याच प्रकारे तुमच्यासमोर येतील. अशा प्रकारे तुम्ही १२ व्या अध्यायातील एकूण २० श्लोक पूर्ण करू शकता. शेवटी “ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः”
हा मेसेज येईल आणि तुम्ही बारावा अध्याय पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनपर मेसेज येईल. तसेच पूर्ण अध्याय एका ठिकाणी वाचण्यासाठी एक बटन येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण अध्याय एके ठिकाणी वाचू शकता.
आता हा गेम म्हणा किंवा क्विझ म्हणा- कोण कोण खेळू शकते? तर ज्यांना वाचता येते अशा लहान मुलांपासून ते मोठ्या आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हे क्विझ उपयोगी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना बारावा अध्याय येत असेल. पण काही जणांना तो पाठ करायचा आहे पण अजून काही कारणांमुळे जमले नाही असे असेल. त्यांनी काय करायचे? चक्क कॉपी करायची! म्हणजे असे, की गीतेचे छोटे पुस्तक समोर घेऊन बसायचे, आणि त्यातील बारावा अध्याय बघून, त्याप्रमाणे शब्द जोडायचे. अनेक वेळा हे क्विझ सोडवून सोडवून बारावा अध्याय केंव्हा पाठ होऊन जाईल ते कळणार पण नाही!
आपण हळू हळू अशा प्रकारे बरीच स्तोत्रें, अध्याय, श्लोक इत्यादि घेऊन येणार आहोत. अशा प्रकारे स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधली जातील!
तर घ्या मोबाईल आणि करा सुरू! आपल्या नातवांनाही द्या!
Bhagavad Gita Chapter 12 Quiz
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.