https://goodworld.in A website by Madhav Bhope

Unsung Heroes of Indian Independence.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा सहभागindependenceday 1723561798347

आज आपण भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. पण दुर्दैवाने 1947 साली आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, त्याला फाळणीच्या दुःखाची किनार होती आणि लक्षावधी निर्वासितांच्या आणि जे मारले गेले त्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाचे आवरण होते.

भारतीयांचे स्वातंत्र्य युद्ध अनेक वर्षे चालले. त्याची सुरुवात 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामापासून झाली.( त्याला 1857 चे बंड असे इंग्रजांच्या प्रभावामुळे आपण कित्येक वर्ष म्हणत आलो होतोत). आज आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आपल्या प्राणाची आहुति देणाऱ्या तसेच अनन्वित अत्याचार सहन करणाऱ्या योद्ध्यांचा विसर पडल्यासारखे झाले आहे. म्हणून आजच्या या दिवशी, स्वातंत्र्य लढ्यातील या योद्ध्यांचे स्मरण करून त्यांना नमन करूयात .images 1

1 160

Unsung Heroes of Indian Independence.

कवि बा. भ. बोरकर यांच्या कवितेत थोडासा बदल करून असे म्हणावेसे वाटते:

यज्ञी ज्यांनी देऊनी निजशीर

घडिले स्वातंत्र्याचे मंदिर

परी तयांच्या दहनभूमीवर

नाही चिरा नाही पणती

तेथे कर माझे जुळती

इ.स. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, उमाजी नाईक,नानासाहेब पेशवे, शेवटचा मुघल बादशाहा बहादूरशाह जफर इत्यादी स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी:Indian Freedom Fighters

  1. अनंत लक्ष्मण कान्हेरे
  2. उमाजी नाईक
  3. चंद्रशेखर आझाद
  4. मंगल पांडे
  5. दामोदर हरी चाफेकर
  6. नाना पाटील
  7. बाळकृष्ण हरी चाफेकर
  8. भगतसिंग
  9. मदनलाल धिंग्रा
  10. राजगुरू
  11. लहुजी राघोजी साळवे
  12. हरी मकाजी नाईक
  13. वासुदेव बळवंत फडके
  14. वासुदेव हरी चाफेकर
  15. विष्णू गणेश पिंगळे
  16. विनायक दामोदर सावरकर
  17. हेमू कलानी
  18. बिरसा मुंडा
  19. बेगम हजरत महल
  20. कुंवरसिंह
  21. राणी चेन्नमा
  22. बहादूरशाह जफर
  23. खुदीराम बोस
  24. प्रितीलता वड्डेदार
  25. बुधू भगत
  26. शंभुधन फुंगलोसा
  27. शंकर शहा
  28. दर्यावसिंह ठाकूर
  29. सुरेंद्र साए
  30. चारुचंद्र बोस
  31. रंगो बापूजी गुप्ते
  32. गोमाजी रामा पाटील
  33. हिराजी गोमाजी पाटील
  34. झिपरु चांगो गवळी
  35. आनंदीबाई झिपरु गवळी
  36. नारायण नागो पाटील
  37. दिनकर बाळु पाटील
  38. गौतम पोशा भोईर
  39. विश्राम घोले
  40. यशवंतराव होळकर
  41. राणी गाइदिनल्यू
  42. राघोजी भांगरे
  43. डाॅ. सदाशिव खानखोजे
  44. कोंडाजी नवले
  45. रामजी किरवे
  46. बिरसा मुंडा
  47. खाज्या नाईक
  48. झलकारी बाई
  49. त्रंबक डेंगळे
  50. जयनाथ सिंह
  51. राजा नंदकुमार
  52. राजा चेतसिंह
  53. तिलाका मांझी
  54. पझसी राजा –केरल वर्मा
  55. मुधोजीराजे भोसले
  56. घानासिंह
  57. युवराज चैनसिंह
  58. राणी चेन्नमा
  59. तीरथसिंह
  60. आत्माराम चौकेकर
  61. फोंड सावंत
  62. सुई मुंडा
  63. चिमासाहेब भोसले
  64. गंगानारायण
  65. फकुन आणि बरुआ
  66. चक्र बिष्णोई
  67. शम्भूदान
  68. राणी जिंदान कौर
  69. मूलराज
  70. सिदो कान्हू
  71. ईश्वरी पांडे
  72. कुमारी मैना
  73. अजिदुल्ला खाँ
  74. मुहंमद अली
  75. भीमाबाई
  76. राणा बेनो माधोसिंह
  77. फिरोजशहा
  78. वाजिद अली शहा
  79. बेगम हजरत महल
  80. मौलवी अहमदुल्ला शहा
  81. कुंवरसिंह

याशियाय असे असंख्य स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांची आपल्याला माहित नसतील. 2022 सालच्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या वेळी, भारत सरकारने अशा अजून काही खूप कमी माहिती असलेल्या स्वातंत्र्य योद्ध्यांची माहिती प्रसिद्ध केली होती. ती या ठिकाणी प्रस्तुत करीत आहोत.

येथे क्लिक करा 

Capture 14 aug

Watch Live telecast of Independence day celebrations and flag hoisting here:

 

 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.