पावसाळ्यात फिरायला जाण्यासारखी पुण्याच्या जवळील नेहमीपेक्षा वेगळी पर्यटन स्थळे
यावर्षी पुणे आणि परिसरात पाऊस अगदी मनासारखा झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस जवळ जवळ रोज हजरी लावत होता. मध्यंतरी तर अति पावसामुळे काही सखल भागात पाणी साचल्यामुळे तसेच खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे पुण्यात बरीच धावपळ ही झाली होती आणि नुकसान ही झाले होते. तसेच काही जणांना अति उत्साहामुळे जीवही गमवावा लागला होता.
आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. पुण्याच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळे निसर्ग सौंदर्य बघण्यासारखे आहे. आणि अशा वातावरणात बाहेर पडून निसर्गाच्या हिरवाईचा आस्वाद घेण्यात एक वेगळाच आनंद आहे.
नेहमीच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी होत असल्यामुळे, अशा वेळी पर्यटकांचा हिरमोड होतो. अशा वेळी तितक्याच सुंदर, पण तुलनेने कमी गर्दी असणारी पर्यटन स्थळे असली तर किती छान असे वाटते.
पुण्याच्या आसपास असणाऱ्या अशाच 11 पर्यटन स्थळांविषयी माहिती वाचा.
यात अजून अधिकाधिक माहिती add करण्याचा प्रयत्न राहील. तेंव्हा या पोस्टला पुन्हा पुन्हा विजिट देत रहा.
पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या राजगड तालुक्यातील केळद गावातील मढे घाट धबधबा म्हणजे जणू मिनी महाबळेश्वर म्हणता येईल असे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हिरव्यागार वनश्री ने नटलेला हा परिसर आहे.
पुण्यापासून अंतर- 68 ते 80 किमी
कसे जाणार- पुणे-खडकवासला -पाबे घाटमार्गे वेल्हे-केळद (68 किमी) किंवा पुणे-नरसापूर-मार्गासनी-वेल्हे–केळद (80 किमी)
आंदर मावळ भागातील हा धबधबा दुर्गम भागात असला तरी सध्या या भागाची ओळख बनला आहे.
पुण्यापासून अंतर- 70 किमी
कसे जाणार- पुणे-कान्हेफाटा-टाकवे बुद्रुक-वडेश्वर-डाहूली-बेंदेवाडी धबधबा
दाऱ्या घाट- आंबोली

Click this image to watch video
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असणार्या. असणार्या. दाऱ्या घाटाचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात पहाण्यासारखे असते पायथ्याशी असलेले निसर्गसौंदर्याने नटलेले आंबोली गाव परिसरातील मुख्य सांडेदरा व वर्जंड धबधबा, मीना नदीचा उगमस्थान असलेले श्री क्षेत्र मीनेशवर, ढाकोबा व मारुती मंदिर, खळखळून वाहणारे ओढे, पावसाळ्यात डोंगरावरून फेसाळत वाहत येणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
पुण्यापासून अंतर- 112 किमी
कसे जाणार- पुणे-जुन्नर- दाऱ्या घाट
जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील आंबे हातवीज परिसरात कांचन धबधबा, दुर्गादेवी मंदिर, कोकण कडा, देवराई, खुटादरा व डोनीदरा आदि परिसरात विविध प्रकारची जैव विविधता आहे.
पुण्यापासून अंतर-135 किमी
कसे जाणार- पुणे-जुन्नर – आंबे हातवीज
आंबेगाव तालुक्यातील डिंभे येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशय परिसर हा हिरवाईने नटला असून श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जातांना पोखरी घाटातून डिंभे धरणाचे मनमोहक स्वरूप पाहावयास मिळते.
पुण्यापासून अंतर-97 किमी
कसे जाणार- पुणे-मंचर-घोडेगाव-शिनोली- डिंभे
भोर तालुक्यातील वरंधा घाट परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे श्रावणात ऊन पावसाचा खेळ बघणण्यास एक वेगळीच मजा असते. घाटात, पाऊस सुरू होताच धबधबे दिसायला लागतात.
पुण्यापासून अंतर-110 किमी
कसे जाणार- पुणे-भोर- वरंधा घाट
सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी नटलेले, भीमाशंकर अभयारण्यातले आहुपे हे पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोकाचे गाव आहे. सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण, डोंगर दऱ्यातून वाहणारे लहान मोठे धबधबे, धुके, इत्यादि येथील मुख्य आकर्षण आहे.
पुण्यापासून अंतर-137 किमी
कसे जाणार- पुणे-मंचर-घोडेगाव- डिंभे-फुलवडे-अडीवरे-तिरपाड-आहुपे
नाणेघाट परिसरात पश्चिम घाट रांगेतील एक पर्वतीय खिंड, सातवाहन कालीन प्राचीन व्यापारी मार्ग, ब्राह्मी लिपी आणि मध्य इंडो-आर्यन बोलीतील संस्कृत शिलालेख असलेली प्रमुख गुहा, जकातीचा दगडी रांजण, खळखळणारे ओढे, धबधबे व निसर्ग सौदर्य आकर्षक ठरते.
पुण्यापासून अंतर-125 किमी
कसे जाणार- पुणे-जुन्नर- नाणेघाट
बारामती तालुक्यातील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात विविध आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने हे ठिकाण पर्यटकांच्या आवडीचे ठरत आहे. सुमारे 514 हेक्टर परिसरात हे अभयारण्य पसरलेले आहे. हे चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध असून, विविध पक्षी आणि प्राण्यांचेही इथे दर्शन घडते.
पुण्यापासून अंतर-75 किमी
कसे जाणार- पुणे-चौफुला(ता. दौंड)-सुपे- किंवा हडपसर-सासवड-जेजुरी -मोरगाव-सुपे
श्रावण महिन्यात श्री शंकराचे दर्शन घ्यायचे असेल तर पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर येथे यादवकालीन शंकराचे जागृत देवस्थान आहे. या मंदिरावर शिल्पात कोरलेल्या मूर्ती आहेत. याची रचना वेरूळच्या मंदिरासारखी आहे. पुरातत्त्व विभागाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे.
पुण्यापासून अंतर= 55 ते 60 किमी
कसे जाणार-पुणे-यवत- भुलेश्वर, किंवा, पुणे-सासवड-भुलेश्वर
बारामती तालुक्यातील कऱ्हा व नीरा नदीच्या संगमावर वसलेले सोनगावचे ‘सोनेश्वर मंदिर’ हे धार्मिक स्थळाबरोबर पर्यटन स्थळ ही आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. या काळात इथे युरोपातून ‘भोरड्या’ पक्षी मोठ्या संख्येने येतात. पक्षी निरीक्षकांसाठी ही एक पर्वणीच असते.
पुण्यापासून अंतर- 116 किमी.
कसे जाणार-पुणे-बारामती-सोनगाव.















































