https://goodworld.in A website by Madhav Bhope

Laughter the best medicine थोडे हसूया!

laughter

Laughter the best medicine

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?

😀😀😀

जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत

😀😀😀

बायका फार नशीबवान असतात कारण

त्यांना बायका नसतात

😀😀😀

मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता

😀😀😀

आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”

😀😀😀

हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच

😀😀😞

अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….

😀😀😀

बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?

मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?

😀😀😀

लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते

😀😀😀

I-Phone 14 हा लगातार 14 वा  असा फोन आहे जो आपल्याकडं नाहीय

😀😀😀

मुलगी : तुझी आठवण येतेय

मुलगा : अजून पगार झाला नाही

मुलगी : अच्छा चल बाय

😀😀😀

तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका

कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते

😀😀😀

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?

😀😀😀

भारत सरकारचा नवीन नियम

ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल

😀😀😀

एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का?

मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही

😀😀😀

बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे

पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात

😀😀😀

ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…

😀😀😀

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस

😀😀😀

news
READ LATEST NEWS HERE