Tip: Drag the text on the image to reposition it!
Uncategorized
गणेश सरस्वती वंदन 💃 ganesh-saraswati-vandan-classical-dance
ganesh-saraswati-vandan-classical-dance
A new you tube channel by the name GoodWorld Moments has been started by us for featuring vidos and photos of various forms of Art including dance, singing, acting etc by close family and friends.
This will faclitate the sharing of such moments within family groups and friends, as you need to just share the link for the youtube video instead of sending the big files over whatsapp which also consumes data and occupies space on your mobile.
Hope you will like this new initiative. You can subscribe to the you tube channel and also hit the like button if you like the video. You can also post your comments on you tube, which will help us in making improvements in future.
आम्ही ‘गुडवर्ल्ड मोमेंट्स’ नावाचे एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केले आहे, ज्यावर जवळचे कुटुंबीय आणि मित्रांनी सादर केलेले नृत्य, गायन, अभिनय इत्यादी विविध कला प्रकारांचे व्हिडिओ आणि फोटो असतील.
यामुळे कौटुंबिक गटांमध्ये आणि मित्रांमध्ये असे क्षण शेअर करणे सोपे होईल, कारण तुम्हाला व्हॉट्सॲपवर मोठ्या फाईल्स पाठवण्याऐवजी ज्यामुळे डेटा खर्च होतो आणि तुमच्या मोबाईलमध्ये जागाही व्यापली जाते, फक्त यूट्यूब व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे,
आशा आहे की तुम्हाला हा नवीन उपक्रम आवडेल. तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक बटणही दाबू शकता. तुम्ही यूट्यूबवर तुमच्या प्रतिक्रिया (comments) देखील देऊ शकता, ज्यामुळे आम्हाला भविष्यात सुधारणा करण्यास मदत होईल.
google-pay-story- पेमेंटचा रहस्यमय किस्सा
google-pay-story
Google Pay पेमेंट झाले… पण पैसे गेले कुठे? – QR कोडमुळे घडलेला खरा अनुभव
गेल्या काही वर्षांत, विशेषतः करोना नंतर, डिजिटल पेमेंट हे आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. गूगल पे, फोन पे, पेटीएम यासारखी अनेक ऍप्स आपण अगदी सहजपणे वापरीत आहोत. मोठ्या दुकानांपासून, मॉल पासून ते छोट्या दुकानदारांपर्यंत आणि वडा पाव वाल्यापासून, छोट्याशा भाजीवाली पर्यंत, भारताच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येकजणासाठी डिजीटल पेमेंट अत्यंत सोयीचे झाले आहे.
मात्र आपण मधून मधून या माध्यमातून होणारे तुरळक फसवणुकीचे प्रकारही ऐकतो आणि वाचतो. असे प्रकार वाचल्यामुळे, “ते गूगल पे फोन पे आपण वापरतच नाही बाबा!” असे म्हणणारेही बरेच आहेत, आणि माझ्या पाहण्यात यांत वयस्करच नाही तर काही तरूण मंडळीही आहेत. असो. आज तो विषय नाही.
पण हे वापरत असतांना, अभावितपणेच कधी कधी कशी चूक होऊ शकते, त्याबद्दल एक किस्सा आज सांगायचा आहे!
मी, जेंव्हा पासून हे डिजिटल पेमेंट सुरू झाले, तेंव्हापासून वापरतो आहे. त्यामुळे एटीएमच्या चकरा कमी झाल्या आहेत. वर्षातून जास्तीतजास्त 2-4 वेळेला एटीएम ला जायचे काम पडते. त्यामुळे पूर्वी, एटीएमला कॅश नसणे, एटीएम बंद असणे, विशेषतः आपल्या बँकेच्या एटीएम्स ची दुरवस्था, तसेंच पाहिजे त्या नोटा न मिळणे, इत्यादि असंख्य गैरसोयीं पासून सुटका मिळाली आहे. आता खिशात पाकीट, एटीएम कार्ड असण्याची आवश्यकता भासत नाही, फक्त मोबाईल असला की पुरे!
असो. तरीही आपल्या यू पी आय ऍप ( गूगल पे, इत्यादि) चा वापर करतांना कधी कधी अभावितपणे कशी चूक होऊ शकते याचा हा किस्सा!
साधारण दोन महिन्यांपूर्वी, मी आणि सौ, आम्ही दोघे बाहेर खरेदी करायला निघालो होतो. काही किरकोळ वस्तू आणायच्या होत्या आणि मुख्य म्हणजे रोज वापरायच्या काही साड्या खरेदी करायच्या होत्या.
आम्ही दोघे, गाडीने बाहेर पडलो. त्रिमूर्ती चौकातल्या एका दुकानात, काही स्टेशनरी, दोऱ्या वगैरे असे काही सामान घ्यायचे होते. वेळ संध्याकाळची होती. आम्ही त्या दुकानातून 110 रुपयांचे सामान घेतले, आणि सवयीप्रमाणे, समोर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन केला आणि त्यात रक्कम टाकणार, इतक्यात, दुकानाचा राजस्थानी वाटणारा मालक, , जो वयस्कर होता, म्हणाला, की तो क्यू आर कोड खराब आहे, तुम्ही कॅशच पेमेंट करा. रक्कम थोडी होती, आणि आमच्याजवळ तेवढी कॅश होती, त्यामुळे मी 110 रुपये त्याला नगदी दिले.
तिथून आम्ही साड्यांची दुकाने शोधत शोधत, गजानन मंदिरापासून, रिलायन्स कडे निघालो. या रस्त्यावर काही साड्यांची दुकाने रोज रस्त्याने येता जातांना दिसतात. त्यांच्यापैकीच एका चांगल्या दिसणाऱ्या साड्यांच्या दुकानात आम्ही शिरलो.
तिथे बऱ्याच वेळ निरनिराळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्यानंतर, शेवटी 4 साड्या पसंत झाल्या. मनासारख्या साड्या मिळाल्यामुळे आम्ही खुश होतो. साड्यांचे बिल ₹2850 इतके झाले. सेल्समन ने साड्या पॅक करून काउंटरवर दिल्या. पण त्या साड्या काही ठिकाणी चुरगळल्या सारख्या असल्यामुळे साधारण अशा दुकानांमधून, त्या आपल्याला फ्री रोल प्रेस करून देतात. त्याप्रमाणे बिल काउंटर वरचा कॅशियर म्हणाला की रोल प्रेस करून तुम्हाला साड्या परवा मिळतील. अर्थात पेमेंट आपल्याला आधी करावे लागते. त्या प्रमाणे तो कॅशियर बिल बनवू लागला. त्याने बिल बनवले, आणि आम्ही काउंटर वर असणाऱ्या क्यू आर कोडवर माझ्या गूगल पे अँप ने स्कॅन केले, त्याच्यात रक्कम टाकली- ₹.2850. मी पिन टाकला, पेमेंट केले, कॅशियर ला स्क्रीनशॉट दाखवला, त्यानेही ओके म्हणून बिल मला सोपवले आणि आम्ही रोल प्रेस साठी साड्या तिथेच ठेवून, निघालो.
आम्ही घराच्या वाटेवर असतांनाच,गाडी चालवत असतांना, मला अनोळखी नंबर वरून फोन आला. आता आजकाल कोणत्या नंबरवरून कंपन्यांचे कॉल येतात, कोणत्या नंबरवरून फ्रॉड कॉल येतात, ते साधारण माहिती झाले आहे. हा नंबर त्यापैकी वाटत नव्हता. म्हणून मी गाडी बाजूला घेऊन, थांबवून, फोन घेतला. तर तो दुकानदाराचा फोन होता. “ साब, मैं … साडी सेंटर से बोल रहा हूँ. आपका पेमेंट अभी जमा नही हुवा है!”
मला थोड़े आश्चर्य वाटले. मी म्हटले, “ ऐसा कैसे हो सकता है? पेमेंट तो मैंने आपको किया, और आपको बताया भी था. एक मिनिट रुको. में चेक करता हूँ।” असे म्हणून मी गूगल पे वर transaction history वर जाऊन पाहिले. पेमेंट सक्सेस दाखवीत होते. मी त्याला सांगितले, “आप फिरसे चेक करो, मेरे पास तो पेमेंट सक्सेस बता रहा है। चाहे तो मैं आपको स्क्रीन शॉट भेजता हूँ” असे म्हणून मी त्याला माझ्या पेमेंट चा स्क्रीन शॉट पाठविला. तो स्क्रीनशॉट पाठवताना मी त्यावरील नांव पुन्हा एकदा पाहिले. MADANLALPOPATLALCHUTTAR असे सलग नाव त्याच्यात दिसत होते.
बऱ्याच वेळा दुकानदार हे त्यांच्या वैयक्तिक नांवाचा पण क्यू आर कोड तिथे ठेवतात. ते फोनपे चे बिझनेस अकाउंट दिसत होतं. नांव मारवाडी होते, नक्कीच त्या दुकानदाराचे असणार, यामुळे मी आश्वस्त होतो.
मी त्याला नीट बघायला सांगितले. पण तो म्हणू लागला पेमेंट आमच्या खात्यात जमा झाले नाही.
शेवटी मी ठरवले आत्ताच जाऊन काय मामला आहे ते पहावे, म्हणून मी गाडी मागे फिरविली आणि थोड्याच वेळात त्या दुकानासमोर गाडी घेतली.
आत गेल्यावर मी त्याला पुन्हा माझा स्क्रीनशॉट दाखविला. तर तो म्हणतो, हे आमच्या दुकानाचे नांव नाहीच!.
मग मी तिथे उपलब्ध असणाऱ्या क्यू आर कोड वर स्कॅन करून पाहिले, तर त्याच्यावर देविका सारीज असे लिहून येत होते!
त्याला म्हटले तुझ्याकडे अजून कोणता क्यू आर कोड आहे का?
तेंव्हा त्याने खाली ठेवलेला अजून एक क्यू आर कोड काढून दाखविला.
मी तोही स्कॅन करून पाहिला, त्याच्यावर ही, देविका सारीज असेच लिहून येत होते.
आता मला वेगळीच शंका यायला लागली होती. अलीकडे बरेच किस्से असे वाचण्यात आले होते, की काही लोकांनी काही दुकानांत, हात गाड्यांच्या ठेल्यांवर, काही फ्रॉडंस्टर्स, तिथल्या क्यू आर कोडच्या वर आपला कोड चिकटवून देतात (दुकानदारांच्या नकळत). आणि बरेच पेमेंट सरळ त्यांच्या खात्यात जमा होतात.
मला नक्की हा असाच प्रकार आहे असे वाटू लागले. आम्ही पेमेंट करीत होतो तेंव्हा तिथे काही व्यक्ती बाहेरच्या होत्या. मी कॅशियर ला सांगितले, आजकाल असे प्रकार होत आहेत. त्यावेळी दुकानात कोण कोण होते ते पहा. तेंव्हा तोही म्हणाला, की ठीक आहे, आपण cctv footage काढून पाहू.
पण cctv footage बघण्यासाठी त्याने लॅपटॉप ऑन केला, आणि त्याच्या लक्षात आले की cctv camera चालू नव्हता. त्याने तसे आम्हाला सांगितले.
आता आम्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला. मी त्याला सांगितले की पेमेंट तर मी केले आहे. आणि तुमच्या दुकानातील कोड वरून केले आहे. तुम्ही तसे व्हेरिफाय करून मला बिल ही दिले आहे. त्यामुळे मला माझी वस्तू मिळालीच पाहिजे. त्यावर तो म्हणू लागला, मला पेमेंट मिळाले नाही, मी कशी वस्तू देणार? मी म्हणत होतो, तो प्रॉब्लेम माझा नाही, तुमचा आहे. तुम्ही Upi ची कम्प्लेन्ट लॉज करा, किंवा काहीही करा!
आम्ही दोघेही बराच वेळ वाद घालत राहिलो. मी त्याला हेही म्हटले, की मी साड्या इथे ठेवून गेलो नसतो, तर तुम्ही काय केले असते? या प्रश्नाचे त्याच्या कडेही उत्तर नव्हते. शेवटी मी ठरवले की आपण घरी जाऊन नीट शोध घेऊ आणि पुढे काय करायचे ते ठरवू. असे ठरवून मी घरी परतलो.
घरी परतल्यावर मी ती व्यक्ती (जिला पेमेन्ट केले गेले होते) कोण आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण त्या नावावरून काहीच शोध लागेना.
मला याआधीच, गेल्याच महिन्यात jio fiber च्या बाबतीत failed payment चा अनुभव आला होता आणि याबाबतीतील सगळी प्रोसिजर माहिती झाली होती. त्यामुळे मी लगेच गूगल पे च्या प्लॅटफॉर्मवर dispute raise केला, तसेच फोनपे ला ही मेल टाकला, माझ्या बँकेला म्हणजे sbi ला पण मेल टाकला, आणि NPCI च्या वेबसाईटवर पण complaint lodge केली. असे सर्व केल्यानंतर मग मी, शांतपणे झोपलो.आता उद्याचे उद्या पाहू, जे करायचे ते सर्व केले आहे म्हणून.
मग दुसऱ्या दिवशी, दुपारच्या नंतर आणि संध्याकाळच्या आत, म्हणजे गर्दी होण्याच्या आत पुन्हा त्या दुकानात गेलो. आणि पुन्हा आमच्या दोघांचे तेच मुद्दे एकमेकांना पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मी त्या कॅशियर ला आजकाल असे किस्से कसे होत आहेत ते सांगितले, आणि जर तुमच्या दुकानातील cctv सुरू असता तर एखाद्या गिऱ्हाईकाच्या मिषाने आलेल्या कोणी तो कोड ऐनवेळी बदलला असेल ते समजले असते. ही तुमची चूक आहे, मी तुमच्या दुकानातील कोड वर पेमेंट केले आहे, त्यामुळे तुम्हाला माल द्यावाच लागेल असे पुन्हा पुन्हा सांगू लागलो.
त्यावर cashier चे म्हणणे असे होते की मला मालकाला रोज हिशेब द्यावा लागतो. मी बिना पेमेंट चा, तुम्हाला माल दिला तर माझ्या पगारातून कपात होईल. तुम्ही सुध्दा, devika sarees बघून पेमेंट करायला हवे होते. तुम्ही माझे पेमेंट द्या, मी माल देतो.
दुकानातील इतर कर्मचारीही अर्थात, त्याची बाजू घेत होते. तेथील एक कर्मचारी मला काही समजावून सांगत होता. आधी मी बराच वेळ त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पण थोड्या वेळाने मला त्याच्या म्हणण्यात काही तथ्य वाटू लागले. तो म्हणत होता, साहेब, तुम्ही नीट आठवून पहा, याआधी तुम्ही कुठे कुठे गेला होतात, आणि गूगल पे ने कुठे कुठे पेमेंट केले. मी त्याला माझी transaction history काढून दाखवली. त्यादिवशी मी गूगल पे ने एकूण ४ पेमेन्ट केले होते. त्यातील २ पेमेन्ट भाजीवाल्याचे होते, रु. १० आणि २० चे, एक टाटा चे होते २०० रु. चे आणि एक चप्पलच्या दुकानाचे ४४० रुपयांचे.
तो म्हणू लागला, साहेब, तुम्ही अजून नीट आठवून पहा: अजून कोणाला पेमेन्ट केले होते का?
मला एकदम त्याच्या म्हणण्यातून एक धागा मिळाला. अरे हो!. मी या साडीच्या दुकानात यायच्या आधी त्रिमूर्ती चौकातील स्टेशनरी सामानाच्या दुकानात गेलो होतो!
पण तिथे तर मी गूगल पे ने पेमेन्ट केले नव्हते!
आणि एकदम माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! मला आठवले- मी तिथे पेमेन्ट करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन केला होता. नंतर तो दुकानदार मला कॅश द्या म्हणून म्हणाला होता. मी मोबाईल चा फक्त डिस्प्ले ऑफ केला होता, आणि मोबाईल खिशात टाकला होता. पण गूगल पे मधून बॅक करून, बाहेर पडलो नव्हतो!
आणि साडीच्या दुकानात आल्यावर, मी मोबाईल ऑन केला, स्कॅनर समोर धरला. पण त्यात आधीच्याच स्क्रीन वर असल्यामुळे, तिथे पेयी हा आधीचाच होता. मी त्यात रक्कम टाकली- २८५० रुपये, आणि पेमेन्ट केले! नक्की असेच झाले असणार!
मी त्या साडीच्या दुकानातील नोकराला म्हटले, चल माझ्यासोबत. बहुतेक हे पेमेन्ट दुसऱ्याला गेले असावे- तसे असेल तर, नशिबाने, ते दुकान जवळच आहे.
आम्ही गजानन मंदिराजवळील साडीच्या दुकानातून, त्रिमूर्ती चौकातील त्या स्टेशनरीच्या दुकानात गेलो.
मी दुकानात कोण आहे ते पाहिले. दुकानात कालचा तो वृद्ध मालक नव्हता, पण त्याचा मध्यम वयाचा, मुलगा तिथे होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला थोडक्यात परिस्थिति समजावून सांगितली, आणि माझ्या मोबाईल मधील गूगल पे च्या हिस्टरी मध्ये त्या नावाने झालेले पेमेन्ट दाखवले. ते तुमचेच नाव आहे ना, हे विचारले.
सुदैवाने, त्याच्या लक्षात लगेच सर्व परिस्थिति आली. त्याने लगेच त्याच्या वडिलांना फोन लावून कालच्या transaction बद्दल खातरजमा करून घेतली.
आणि काहीही आढेवेढे न घेता, शांतपणे, त्याने, त्याचा मोबाईल काढला, मला माझा मोबाईल नंबर विचारला, आणि गूगल पे ने माझ्या खात्यावर ताबडतोब २८५० रुपये ट्रान्सफर करून टाकले! मी त्याचे मनापासून आभार मानले! तिथून मी आणि तो कर्मचारी, आनंदाने बाहेर पडलो.
याठिकाणी एका छोट्याशा negligence मुळे, ही सर्व धावपळ मला करावी लागली होती! ते negligence म्हणजे, मी गूगल पे उघडल्यावर, त्यातून बाहेर न पडता मोबाईल तसाच बंद केला होता. पुन्हा गूगल पे एप उघडल्यावर आधीचाच स्क्रीन माझ्यासमोर आला होता! अजून दुसरे negligence म्हणता येईल ते, पेमेन्ट करतांना, पेयी चे नांव त्या दुकानदाराला दाखवून खात्री करून घेतली नव्हती. यात दुकानदाराचीही चूक होती, की त्याने त्याला पेमेन्ट मिळाले की नाही, हे लगेच confirm केले नव्हते.
नशिबाने, ही घटना अगदी जवळच घडली होती. ज्या दुकानदाराच्या बाबतीत घडली होती, तो एक प्रतिष्ठित आणि समजदार दुकानदार होता, त्यामुळे त्याने आढेवेढे न घेता मला लगेच पैसे वापस दिले. हेच जर दूरवर कुठे तरी घडले असते, किंवा एखाद्या छोट्याशा अनोळखी किंवा तितकासा समजदार नसलेला कोणी हातगाडीवाला किंवा अन्य कोणी असता, तर त्याला हे समजायलाही वेळ लागला असता, आणि त्याने याबाबतीत आढेवेढे ही घेतले असते.
असो, तर अशा या नाट्याच्या सुखकारक शेवट झाल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला! आणि मी त्या साडीच्या दुकानातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन वापस त्या दुकानात आलो. तेथील cashier चा ही जीव भांड्यात पडला. कारण त्याला ही कुठले dispute नकोच होते. मी साड्यांचे फ्रेश पेमेन्ट केले. त्याने तोपर्यंत साड्यांना प्रेस साठी पाठवले नव्हते. त्याने २ दिवसांनी यायला सांगितले, आणि दोन दिवसांनी जाऊन मी माझ्या वस्तू आनंदाने घरी घेऊन आलो!
असा हा गूगल पेमेन्ट चा किस्सा, मुद्दाम वाचकांसाठी शेअर एवढ्यासाठी केला, की अशा प्रकारे चूक कोणाची होऊ नये!
अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे!
फेसबुक तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी कधी कधी समोर आणून ठेवते. आज अशीच एक 9 वर्षांपूर्वीची केलेली पोस्ट फेसबुकने समोर आणून ठेवली- अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे. दि. १७ मार्च २०१७ रोजी लिहिलेली.
आता सध्या काय परिस्थिति आहे, माहिती नाही. पण त्यावेळी जे वाटले, ते तसेच्या तसेच व्यक्त केले होते. ते आज या ब्लॉग वर जसेच्या तसे देत आहे.
अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे!
अमेरिकेत प्रत्येक विमानतळावर प्रवाशांची व त्यांच्या सामानाची अत्यंत कसोशीने, व सविस्तर तपासणी, व तीही वेळेचा अजिबात अपव्यय न करता, होतांना पाहिली. तेथील सरकारी अधिकारी सतर्क व कर्तव्यदक्ष दिसले. याचा अनुभव आम्हाला ड़ॅलसहून नायगारा येथे जातांना व येतांना आला.
तसेच अमेरिकेहून परतीच्या प्रवासात ड़ॅलस येथील विमानतळावरही हा अनुभव पुरेपूर आला. तिथे security check अत्यंत सविस्तर, आणि तोही कमीत कमी वेळात केला गेला.
परतीच्या प्रवासात आम्ही मुंबई विमानतळावर उतरलो, तेंव्हा security check चा काही प्रश्न नव्हता , पण कस्टम क्लीअर करतांना आम्हाला जो अनुभव आला, त्यावरून, अजून आपल्या देशाला मूल्यांच्या बाबतीत किती पल्ला गाठायचा आहे याची जाणीव झाली.
आम्ही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो आणि आमचे सामान घ्यायला फिरत्या पट्ट्याजवळ थांबलो. तेंव्हा एक मनुष्य आमच्याजवळ आला आणि हलक्या आवाजात विचारू लागला, “ सर आपको कहाँ जाना है?” आम्हाला कस्टम क्लीअर करून जेट एअरवेज च्या औरंगाबाद च्या डोमेस्टिक फ्लाईट ने जायचे होते, हे त्याला कळाल्यावर म्हणू लागला, “सर मै आपको वहाँतक छोड देता हूँ” मी त्याला विचारले, जेट एअर वेज का काऊंटर कहाँ है? तर “बहोत दूर है सर, मै आपको वहाँतक आपके सामानके साथ छोड देता हूँ” म्हणून म्हणाला. मी त्याला विचारले, “किती पैसे घेशील?” तर कुछ नाही साब, एक हजार रुपये दे दिजीये, बस!” म्हणून म्हणाला!
मी त्याच्याकडे नंतर लक्ष दिले नाही; पण पुढे कस्टम क्लीअर केल्यानंतर, जेट चे काऊंटर समोरच असलेले दिसले! पण याहून ही पुढे, कस्टम काऊंटर वरील प्रकार पाहून धक्काच बसला. अमेरिकेतून परत येणाऱ्या भारतीय प्रवाशांना, त्यांच्याजवळ घोषित करण्यासारखे (रु. ५००००/ च्या आत) काही कर आकारणी योग्य सामान नसल्यास, ग्रीन चॅनेल मधून जाता येते, जेणेकरून त्याला लवकर बाहेर पडता येईल. आमच्याजवळ तसे काहीच सामान नसल्यामुळे immigration counter चा शिक्का लागल्यावर आम्ही कस्टम च्या ग्रीन चॅनेल च्या रांगेमध्ये उभे राहिलो.
त्या ठिकाणी, अर्थातच, भरपूर गर्दी होती, व येणाऱ्या प्रवाशांचे सामान X-Ray machine मधून scan होऊन पुढे जात होते. पण ही सर्व तपासणी अत्यंत जुजबी होत असल्याचे दिसले. आमच्याजवळ पाच मोठ्या बॅगा होत्या व हातातील पर्स, पाऊच व जेवणाचा डबा असे ३ छोटे डाग होते. बऱ्याच सूटकेस त्या यंत्रातून जात होत्या तर बऱ्याच प्रवाशांना बाजूने, तसेच न तपासता ही जाऊ दिले जात होते. आम्हालाही तेथील एका सब स्टाफ ने आमच्या दोघांच्या, फक्त छोट्या पर्स इत्यादि, मशीन मध्ये टाकायला सांगितल्या व सर्व मोठ्या बॅग्ज बाजूनेच, मशीनमधून न बघताच, पुढे न्यायला सांगितल्या. आमच्या छोट्या पर्स इत्यादि, मशीन मधून बाहेर आल्या. तिथे प्रवाशांचे सामान हाताळणाऱ्या एका स्टाफने, हिंदीमध्ये, “सर… कुछ बक्षिसी..” असे म्हणून आमच्याकडे क्षणभर अपेक्षेने पाहिले. आम्ही त्याचे म्हणणे न ऐकल्यासारखे करून आमच्या सामानाच्या trolleys घेऊन पुढे निघालो. पण हा प्रकार पाहून मला धक्काच बसला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार! माझ्या बॅग्जमध्ये, काही कस्टम ड्युटी लागणाऱ्या वस्तू नव्हत्या म्हणून बरे. पण माझ्या सामानात जर अशा अत्यंत महागड्या वस्तू असल्या असत्या, तर त्या कस्टम ड्युटी न भरताच मला सहज बाहेर आणता आल्या असत्या. आणि असे करू दिल्याबद्दल, तेथील स्टाफ ला १००-२०० रुपये दिल्यास, कोणीही, लाखो रुपयांची कस्टम ड्युटी सहज चुकवू शकला असता! आता ह्या प्रकारची तक्रार कुणाकडे व कशी करायची?
तिथून पुढे जवळच असलेल्या जेट एअरवेज च्या काऊंटर वर आम्ही आलो. तेथील व्यक्तीने आमच्या सामानाचे वजन केले, आणि आम्हाला excess luggage चा चार्ज लागेल म्हणून सांगितले. आमच्या luggage चे वजन international standards प्रमाणे बरोबर होते, पण domestic flight च्या मानाने जास्त होते, म्हणून मी काही न बोलता excess luggage चे पैसे भरले. पण नंतर मला सचिन ने सांगितले की international flight ने येणाऱ्या passengers ला तेवढे excess luggage allowed असते. जेट एअरवेज च्या कर्मचाऱ्यांनी आमच्या बॅगान्वरील international flight चे tags धडधडीत दिसत असूनही, आम्हाला वरील नियम सांगितला तर नाहीच, पण आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आम्हाला निष्कारण भुर्दंड बसवला. ही आपल्या येथील सचोटी!
त्यामुळे असे वाटते की सचोटी, प्रामाणिकपणा, इत्यादि मूल्ये एखाद्या समाजात मूलतः रुजावी लागतात, आणि त्या दृष्टीने आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे!
——******——-
माधव भोपे
१६.३.२०१७
जय हो जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा mahashivratri
जय हो जय हो शंकरा,
भोलेनाथ शंकरा,
My grand daughters- Saumya and Sreesha have sung this devotional song dedicated to Bhagvan Shiva on the occassion of Mahashivratri.
Please enjoy this song on YouTube channel- Saumyas corner.
Please enjoy this song on YouTube channel- Saumyas corner.
जय हो जय हो शंकरा,
भोलेनाथ शंकरा,
आदि देव शंकरा,
हे शिवाय शंकरा,
तेरे जाप के बिना,
भोलेनाथ शंकरा,
चले ये साँस किस तरह,
हे शिवाय शंकरा,
मेरा कर्म तू ही जाने,
क्या बुरा है क्या भला,
तेरे रास्ते पे मैं तो,
आँख मूँद के चला,
तेरे नाम की जोत ने,
सारा हर लिया तमस मेरा,
नमो नमो जी शंकरा,
भोलेनाथ शंकरा,
जय त्रिलोकनाथ शम्भू,
हे शिवाय शंकरा,
नमो नमो जी शंकरा,
भोलेनाथ शंकरा,
रुद्रदेव हे महेश्वरा,
जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी,
विलो लवी चिवल्लरी विराजमान मूर्धनि,
धगद् धगद् धगज्ज्वलल् ललाट पट्ट पावके,
किशोर चन्द्र शेखरे रतिः प्रतिक्षणं मम।
कौन है वो कौन है वो,
कहां से वो आया,
चारों दिशाओं में,
तेज सा वो छाया,
उसकी भुजाएं बदले कथाएं,
भागीरथी तेरी तरफ,
शिवजी चले देख ज़रा,
यह विचित्र माया,
नमो नमो जी शंकरा,
भोलेनाथ शंकरा,
जय त्रिलोकनाथ शम्भू,
हे शिवाय शंकरा,
नमो नमो जी शंकरा,
भोलेनाथ शंकरा,
रुद्रदेव हे महेश्वरा,
चन्द्रमा ललाट पे,
भस्म है भुजाओं में,
वस्त्र बाघ छाल का,
है खड़ाऊ पाँव में,
प्यास क्या, और तुझे,
गंगा है तेरी जटाओं में,
जटाओं में, जटाओं में,
दूसरों के वास्ते,
भोलेनाथ शंकरा,
तू सदैव ही जिया,
हे शिवाय शंकरा,
माँगा कुछ कभी नहीं,
भोलेनाथ शंकरा,
तूने सिर्फ है दिया,
हे शिवाय शंकरा,
समुद्र मंथन का,
था समय जो आ पड़ा,
द्वंद दोनों लोक में,
विशामृत पे था छिड़ा,
अमृत सभी में बाँट के,
प्याला विष का तूने खुद पिया।

