https://goodworld.in A website by Madhav Bhope

Unsung Heroes of Indian Freedom Struggle

e048c7d9b1100d11b67dd09cf7dc3dc9

Unsung Heroes of Indian Independence.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा सहभागindependenceday 1723561798347

आज आपण भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. पण दुर्दैवाने 1947 साली आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, त्याला फाळणीच्या दुःखाची किनार होती आणि लक्षावधी निर्वासितांच्या आणि जे मारले गेले त्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाचे आवरण होते.

भारतीयांचे स्वातंत्र्य युद्ध अनेक वर्षे चालले. त्याची सुरुवात 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामापासून झाली.( त्याला 1857 चे बंड असे इंग्रजांच्या प्रभावामुळे आपण कित्येक वर्ष म्हणत आलो होतोत). आज आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आपल्या प्राणाची आहुति देणाऱ्या तसेच अनन्वित अत्याचार सहन करणाऱ्या योद्ध्यांचा विसर पडल्यासारखे झाले आहे. म्हणून आजच्या या दिवशी, स्वातंत्र्य लढ्यातील या योद्ध्यांचे स्मरण करून त्यांना नमन करूयात .images 1

1 160

Unsung Heroes of Indian Independence.

कवि बा. भ. बोरकर यांच्या कवितेत थोडासा बदल करून असे म्हणावेसे वाटते:

यज्ञी ज्यांनी देऊनी निजशीर

घडिले स्वातंत्र्याचे मंदिर

परी तयांच्या दहनभूमीवर

नाही चिरा नाही पणती

तेथे कर माझे जुळती

इ.स. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, उमाजी नाईक,नानासाहेब पेशवे, शेवटचा मुघल बादशाहा बहादूरशाह जफर इत्यादी स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी:Indian Freedom Fighters

  1. अनंत लक्ष्मण कान्हेरे
  2. उमाजी नाईक
  3. चंद्रशेखर आझाद
  4. मंगल पांडे
  5. दामोदर हरी चाफेकर
  6. नाना पाटील
  7. बाळकृष्ण हरी चाफेकर
  8. भगतसिंग
  9. मदनलाल धिंग्रा
  10. राजगुरू
  11. लहुजी राघोजी साळवे
  12. हरी मकाजी नाईक
  13. वासुदेव बळवंत फडके
  14. वासुदेव हरी चाफेकर
  15. विष्णू गणेश पिंगळे
  16. विनायक दामोदर सावरकर
  17. हेमू कलानी
  18. बिरसा मुंडा
  19. बेगम हजरत महल
  20. कुंवरसिंह
  21. राणी चेन्नमा
  22. बहादूरशाह जफर
  23. खुदीराम बोस
  24. प्रितीलता वड्डेदार
  25. बुधू भगत
  26. शंभुधन फुंगलोसा
  27. शंकर शहा
  28. दर्यावसिंह ठाकूर
  29. सुरेंद्र साए
  30. चारुचंद्र बोस
  31. रंगो बापूजी गुप्ते
  32. गोमाजी रामा पाटील
  33. हिराजी गोमाजी पाटील
  34. झिपरु चांगो गवळी
  35. आनंदीबाई झिपरु गवळी
  36. नारायण नागो पाटील
  37. दिनकर बाळु पाटील
  38. गौतम पोशा भोईर
  39. विश्राम घोले
  40. यशवंतराव होळकर
  41. राणी गाइदिनल्यू
  42. राघोजी भांगरे
  43. डाॅ. सदाशिव खानखोजे
  44. कोंडाजी नवले
  45. रामजी किरवे
  46. बिरसा मुंडा
  47. खाज्या नाईक
  48. झलकारी बाई
  49. त्रंबक डेंगळे
  50. जयनाथ सिंह
  51. राजा नंदकुमार
  52. राजा चेतसिंह
  53. तिलाका मांझी
  54. पझसी राजा –केरल वर्मा
  55. मुधोजीराजे भोसले
  56. घानासिंह
  57. युवराज चैनसिंह
  58. राणी चेन्नमा
  59. तीरथसिंह
  60. आत्माराम चौकेकर
  61. फोंड सावंत
  62. सुई मुंडा
  63. चिमासाहेब भोसले
  64. गंगानारायण
  65. फकुन आणि बरुआ
  66. चक्र बिष्णोई
  67. शम्भूदान
  68. राणी जिंदान कौर
  69. मूलराज
  70. सिदो कान्हू
  71. ईश्वरी पांडे
  72. कुमारी मैना
  73. अजिदुल्ला खाँ
  74. मुहंमद अली
  75. भीमाबाई
  76. राणा बेनो माधोसिंह
  77. फिरोजशहा
  78. वाजिद अली शहा
  79. बेगम हजरत महल
  80. मौलवी अहमदुल्ला शहा
  81. कुंवरसिंह

याशियाय असे असंख्य स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांची आपल्याला माहित नसतील. 2022 सालच्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या वेळी, भारत सरकारने अशा अजून काही खूप कमी माहिती असलेल्या स्वातंत्र्य योद्ध्यांची माहिती प्रसिद्ध केली होती. ती या ठिकाणी प्रस्तुत करीत आहोत.

येथे क्लिक करा 

Capture 14 aug

Watch Live telecast of Independence day celebrations and flag hoisting here:

 

 

Chaturmas-चातुर्मास

chaturmas 2024

चातुर्मास माहिती 

चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय.[१] मात्र, काहीजण याला चातुर्मास असेही म्हणतात. जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात.

चातुर्मास कालावधी

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस ‘प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चतुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे.

ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. २०२० साली अधिक आश्विन आला होता,, त्यामुळे चातुर्मास पाच महिन्यांचा होता.

शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात, आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात,(अशी धारणा आहे) आश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे.

चातुर्मासात हिंदूंचे विवाहमुहूर्त नसतात.

व्रत-उपासना

या काळात हिंदू धर्म व जैन धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार (मुंज), विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हंटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.

आख्यायिका

चतुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. काळात शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात असा समज आहे.

पौराणिक कथा

मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, ‘पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?’ ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग    आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदि व्यवहार बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, ‘राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला ‘नारा’ असे म्हणले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. ‘हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.’ राजा म्हणाला, ‘प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणिमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.’ राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिर ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय, असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, ‘मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, हे राजा, तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.’ मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. हृषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले.

व्रते व आचरण

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –

वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः

व्रतेन चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।

अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.

या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.

मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.

परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.

चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

व्रते

सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात.  पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.

वर्ज्य

१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०]

२. मंचकावर शयन

३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन

४. परान्न

५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य

६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे.

अवर्ज्य

चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

Source- Wikipedia 

Read our latest article on Chaturmas here:

चातुर्मासा संबंधीचा नवीन माहितीपूर्ण लेख इथे वाचा-

चातुर्मासाचे महत्त्व

Saumya’s Corner!

माझी नात सौम्या हिने तिचे यू ट्यूब चॅनेल Saumyas Corner सुरू करून आता 2 वर्षांपेक्षा जास्त झाले. या कालावधीत, तिने तिच्या आईच्या मदतीने आतापर्यंत 75 videos टाकले आहेत. त्यातील ‘संध्याकाळचे श्लोक’ हा तिचा व व्हिडिओ खूप जणांनी पाहिला आणि आतापर्यंत त्याचे 1 लाख views झाले आहेत. तसेच दूसरा एक व्हिडिओ ‘गणपतीचे श्लोक आणि स्तोत्र’ हा व्हिडिओही 6.2k वेळेला पाहिला गेला आहे. तसेच आजपर्यंत तिच्या चॅनेलचे 497 subscribers झाले आहेत. 500 subscribers चा टप्पा गाठायला फक्त 3 कमी! तिने टाकलेल्या व्हीडिओज मध्ये मुख्यतः

  1. श्लोक, स्तोत्रे, व इतर,
  2. भगवद्गीता अध्याय
  3. माझ्या आवाजातील गाणी
  4. My drawing
  5. Art and Craft
  6. Games
  7. My dance videos

इत्यादींचा समावेश आहे.

नुकतेच तिने “Science Experiments with Saumya”, “I got selected for the final round of dance competition”,

 

 

 

“ ये ग ये ग रखुमाई Song with lyrics” इत्यादि व्हीडिओज तसेच पुण्याच्या पावसात “ए आई, मला पावसात जाऊ दे”  इत्यादि short videos टाकले आहेत. ते  अवश्य पाहण्यासारखे झाले आहेत. तसेच पुण्यातील (पिंपरी चिंचवड) येथील एका सुप्रसिद्ध गार्डन मध्ये dinosaur सोबत काढलेला व्हिडिओ हे बघण्यासारखे झाले आहेत.

सौम्याचे व्हीडिओज पाहण्यासाठी तिच्या चॅनेल ला खाली दिलेल्या लिंकवर जाऊन, बघू शकता, आणि Subscribe चे बटन दाबून Subscribe  करून तिला 500 चा टप्पा पार करायला मदत करू शकता.

Saumyas Corner subscribe

वरील सर्व व्हीडिओजच्या लिंक्सला क्लिक करून वरील व्हीडिओज आणि shorts बघू शकता.

Learning journey-4

dattatreya

Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. आपल्याला आपल्या जीवनात अनेक माणसे भेटतात. अनेकांशी कामानिमित्ताने अगदी जवळचा संबंध येतो. खरे तर आपल्या घरच्या लोकांपेक्षाही आपण जिथे काम करतो तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण जास्त वेळ असतो.

दत्तात्रेयाने जसे 24 गुरू केले होते, आणि प्रत्येकाकडून काही ना काही गुण घेतले होते तसे प्रत्येकामध्ये काही काही गुण प्रकर्षाने दिसून येतात. ते आत्मसात करता आले तर खूप चांगले. नाही आले तरी आपल्याला एक बेंचमार्क बघायला मिळतो आणि काही प्रमाणात का होईना, ते गुण कळत नकळत आपल्यात येतात.

यापूर्वी अशा काही व्यक्तींविषयी लिहिले. आज अजून काही सहकाऱ्यांबद्दल लिहायचा विचार आहे.

  1. श्री सुभाष व्यवहारे

subhash vyavhare

एखाद्या माणसाची कामाप्रति निष्ठा कशी असावी, याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे सुभाष व्यवहारे. मी पाथरी कृषि विकास शाखेला असतांना सुभाष व्यवहारे तिथे दफ्तरी म्हणून होते. अगदी टाप टीप राहणी, कपडे नेहमी नीट नेटके, आणि बँकेचा पांढरा गणवेश नेहमी न चुकता घालून येत, आणि वेळेच्या आधी नेहमी बँकेत हजर. बोलणे नेहमी अदबशीर. कधीही न सांगता सुट्टी घेत नसत. खूप आधी पूर्वकल्पना देऊन, आवश्यक असेल तेंव्हाच सुट्टी घेत. सुभाष व्यवहारेचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे रेकॉर्ड ठेवण्याची त्यांची पद्धत. बँकेचे अनेक वर्षांचे रेकॉर्ड, ज्याच्यात रोजच्या व्हाऊचरपासून, ते मागील पूर्ण पत्रव्यवहार, बँकेचे असंख्य सर्क्युलर्स, वेगवेगळ्या विषयांच्या फाइली, या सर्व गोष्टींचा समावेश असे. या बाबतीत सुभाष व्यवहारेने तिथे आल्यावर, मागील सर्व सर्क्युलर्स, विषयाप्रमाणे आणि वर्षाप्रमाणे नीट लावून घेतले, आणि त्यांना बुक बाईंडर ला बोलावून त्याच्याकडून पक्के बाईंडिंग करून घेतले, आणि प्रत्येक फाइलवर त्या त्या सेरीजचे नाव आणि वर्ष सुवाच्च अक्षरात टाकून, त्या सर्व फाइल्स क्रमाने लावून ठेवल्या होत्या. त्यामुळे आम्हाला जुन्या कुठल्याही सर्क्युलर चा संदर्भ पाहिजे असेल तेंव्हा सुभाष व्यवहारे ते सर्क्युलर लगेच काढून देत. त्यामुळे इतर कुठल्या ब्रांचलाही, इतकेच नव्हे, तर कधी कधी रिजन ऑफिस ला ही एखादा जुना संदर्भ पाहिजे असेल, तर ते आमच्या ब्रांच ला फोन करत, कारण सुभाष व्यवहारे ते पटकन काढून देतील याविषयी त्यांना खात्री असे. तसेच रोज लागणारे वेगवेगळे फॉर्म्सही सुभाष यांनी अगदी व्यवस्थित लावून ठेवलेले असत. त्यामुळे फॉर्म शोधण्यात वेळ जात नसे.

अव्यवस्थितपणा त्यांना अजिबात खपत नसे. आपल्या कामाबद्दल त्यांना रास्त अभिमान होता, आणि हे सर्व काम व्यवस्थित करण्यास कितीही उशिरापर्यन्त थांबावे लागले, तरी त्यांची तयारी असे. या त्यांच्या गुणामुळे, मला, पाथरीला असतांना याबाबतीत खूप मदत झाली.

नंतर 2010 ते 2015 मी जेंव्हा ट्रेनिंग सेंटरला होतो, तेंव्हा, आम्ही मधून मधून subordinate staff साठी ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचो. तेंव्हा काही प्रोग्राम्स मध्ये मी मुद्दाम सुभाष व्यवहारे यांना बोलावून, एक पूर्ण सेशन, रेकॉर्ड कसे नीट ठेवावे, या विषयी त्यांच्याकडून प्रात्यक्षिक दाखवून घेत असे, त्यावेळी ते योगा योगाने, औरंगाबादच्याच एका ब्रांचला होते. ते त्यांच्या सोबत, काही फाइली घेऊन येत आणि  त्यांनी तेथील ब्रांचचे व्हाऊचर्स कसे stitch केले आहेत  फाइली कशा प्रकारे ठेवल्या आहेत, या विषयी सविस्तर सांगत. अशा प्रकारे मी ज्यांच्या सोबत काम केले, त्यापैकी सुभाष व्यवहारे हे व्यक्तिमत्व एक सभ्य, सुसंस्कृत, कामाप्रति अढळ निष्ठा असणारे व्यक्तिमत्व हे माझ्या कायम लक्षात राहिले आहे.

  1. श्री पी. एम. बुरांडे

श्री पी. एम. बुरांडे(प्रभाकर बुरांडे)  हे व्यक्तिमत्व सुद्धा, बऱ्याच अंशी श्री सुभाष व्यवहारे यांच्या सारखेच होते. वरील सर्व गुण हे त्यांच्यातही अगदी जसेच्या तसे होते म्हटले तरी चालेल. 1998 ते 2001 मधील अडीच वर्षांच्या काळात मी औरंगाबाद येथील स्टेशन रोड ब्रांचला होतो. त्यावेळी तिथे श्री बुरांडे हे दफ्तरी होते. बुरांडे हे नेहमी हसतमुख असत. आणि आपण एखादेवेळी त्यांच्यावर रागावलो तरी ते शांतपणे, समजावून सांगून, समोरच्याचा राग शांत करत. ही गोष्ट भल्या भल्यांना जमत नाही. पण स्थितप्रज्ञता हा  बुरांडे यांचा अंगभूत गुण होता.  मी कधीही त्यांना रागावलेले किंवा कोणाशी तावातावाने  भांडतांना पाहिले नाही. श्री बुरांडे यांनीही तेथील रेकॉर्ड अत्यंत व्यवस्थित ठेवले होते. आणि कोणताही फॉर्म किंवा रेकॉर्ड पाहिजे असल्यास ते पटकन काढून देण्याची त्यांची हातोटी होती. बुरांडे एक चांगले कलाकार सुद्धा होते, आणि रांगोळी काढण्याची कला ही त्यांना अवगत होती.

श्री बुरांडे हे अभ्यासू व मेहनती असल्यामुळे थोडेच दिवसांत त्यांचे प्रमोशन होऊन ते क्लरिकल केडऱ मध्ये आले, आणि नंतर प्रमोशन होऊन हेड कॅशियर पर्यन्त त्यांची पदोन्नती झाली.

आता तर निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचा बागकामाचा छंद इतका उत्कृष्टपणे जपला आहे, की आता पूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) मधून खूप लोक त्यांच्या बागेला आणि कचऱ्यातून कला निर्माण करण्याच्या कार्याला पाहायला येतात.  बँकेतील लोक तर त्यांचे कौतुक करतातच, पण आता त्यांच्या कार्याची प्रसिद्धी आसपासच्या सर्व परिसरात झाली आहे, आणि त्याबद्दल काही वृत्तपत्रांमध्येही लिहून आले आहे.  त्यांना त्यांच्या बागकामासाठी, आणि टाकाऊतून टिकाऊ निर्माण करण्याच्या कार्यासाठी बरीच परितोषकेही मिळाली आहेत. नुकतेच त्यांना इको ग्रीन फाउंडेशन औरंगाबाद यांच्या तर्फे विशेष उल्लेखनीय बागेसाठीचे पारितोषिक देऊन गौरवीत करण्यात आले.  हल्लीच त्यांनी काही प्रदर्शनेही भरवली होती. निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे जगावे याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री बुरांडे होत.image 9 P.M. Burande

माझ्या वरील दोन सहकाऱ्यांचे काम, त्यांचा स्वभाव, कामाप्रति त्यांची निष्ठा, या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे.

नाचू कीर्तनाचे रंगी

स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून मुख्य व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले श्री भुजंग संगारेड्डीकर हे एक बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. बँकेत असतांनाची त्यांची लोकप्रियता आजही तितकीच टिकून आहे. बँकेत असतांना त्यांच्या creative स्वभावामुळे, त्यांनी अनेक प्रयोग यशस्वीपणे राबवले. आणि computerization च्या वेळी आणि नंतर त्यांचा एक मार्गदर्शक आणि trouble shooter म्हणून खूप लौकिक झाला.

आजही त्यांचे निरनिराळे उपक्रम चालू असतात.

त्यांच्या पत्नी सौ. जयश्री संगारेड्डीकर यांचीही  त्यांना त्यांच्या सर्व उपक्रमात अगदी पूर्णपणे साथ असते.

निवृत्तीनंतर, अध्यात्माकडे ओढा असल्याने, त्या बाबतीतील उपक्रमात त्यांचा दोघांचाही सक्रिय सहभाग असतो.

स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधील निवृत्त कर्मचारी दर वर्षी आषाढी एकादशीच्या वारीत सहभागी होतात. आणि विठूरायाच्या भक्तीत रंगून जातात.

या वर्षीच्या वारीत संगारेड्डीकर उभयता पती पत्नींनी मिळून वारीत बहारदार कीर्तन सादर केले.

त्या कीर्तनाचा  काही अंश आपल्या “असीम आनंद” या यू ट्यूब चॅनेल वर टाकला आहे.

तो या ठिकाणी सादर आहे.

आपणास व्हिडिओ आवडला असल्यास like करा आणि youtube चॅनेल “असीम आनंद” नक्की subscibe करा.

तसेंच goodworld.in या आपल्या ब्लॉग ला subcribe करा.

तसेंच ब्लॉग इतरांसोबत share करा.

Test your Emotional Intelligence for FREE-आपली भावनिक बुद्धिमत्ता तपासा

 

  • Emotional intelligence is the ability to recognize your emotions, understand what they’re telling you, and realize how your emotions affect other people.
  • There are five elements that define Emotional Intelligence: Self-Awareness, Self-Regulation, Motivation, Empathy, and Social Skills.
    5 components of emotional intelligence
    5 components of emotional intelligence
  • Emotionally intelligent people are masters at managing their emotions. The ability to stay calm and in control in difficult situations is highly valued
  • Developing and using your emotional intelligence can be a good way to show others the leader inside of you.
  • Emotional intelligence can be learned and developed

We probably all know people, either at work or in our personal lives, who are really good listeners. No matter what kind of situation we’re in, they always seem to know just what to say – and how to say it – so that we’re not offended or upset. They’re caring and considerate, and even if we don’t find a solution to our problem, we usually leave feeling more hopeful and optimistic.

We probably also know people who are masters at managing their emotions. They don’t get angry in stressful situations. Instead, they have the ability to look at a problem and calmly find a solution. They’re excellent decision makers, and they know when to trust their intuition. Regardless of their strengths, however, they’re usually willing to look at themselves honestly. They take criticism well, and they know when to use it to improve their performance.

shining man

People like this have a high degree of emotional intelligence. They know themselves very well, and they’re also able to sense the emotional needs of others.

As more and more people accept that emotional intelligence is just as important to professional success as technical ability, organizations are increasingly using it when they hire and promote.

For example, one large cosmetics company recently revised their hiring process for salespeople to choose candidates based on their emotional intelligence. The result? People hired with the new system have sold, substantially more than salespeople selected under the old system. There has also been significantly lower staff turnover among the group chosen for their emotional intelligence.

How to measure your Emotional Intelligence?

Free Emotonal Intelligence Test

Emotional Intelligence-1

Emotional Intelligence-2