भगवद्गीता हा प्राचीन भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील असलेला हा ग्रंथ ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
सुमारे ५००० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५ व्या अध्याया पासून ते ४२ व्या अध्यायापर्यन्त संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते.
गीतेतील असलेले ७०० श्लोक खालीलप्रमाणे १८ अध्यायांत सांगितले आहेत:
| अध्याय | शीर्षक | श्लोक |
| १ | अर्जुनविषादयोग | ४७ |
| २ | सांख्ययोग(गीतेचे सार) | ७२ |
| ३ | कर्मयोग | ४३ |
| ४ | ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान) | ४२ |
| ५ | कर्मसंन्यासयोग | २९ |
| ६ | आत्मसंयमयोग | ४७ |
| ७ | ज्ञानविज्ञानयोग | ३० |
| ८ | अक्षरब्रह्मयोग | २८ |
| ९ | राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) | ३४ |
| १० | विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य) | ४२ |
| ११ | विश्वरूपदर्शनयोग | ५५ |
| १२ | भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) | २० |
| १३ | क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग | ३४ |
| १४ | गुणत्रयविभागयोग | २७ |
| १५ | पुरुषोत्तमयोग | २० |
| १६ | दैवासुरसंपद्विभागयोग | २४ |
| १७ | श्रद्धात्रयविभागयोग | २८ |
| १८ | मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) | ७८ |
| एकूण श्लोक | ७०० |
गीतेची सुरुवात
“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥“ या श्लोकापासून होते, आणि शेवट
‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम‘
या श्लोकाने होते. अशा ध पासून सुरू होऊन र्म ने संपणाऱ्या ७०० श्लोकांमध्ये पूर्ण धर्माचे सार आले आहे असे म्हटले तरी हरकत नाही.
जीवनविषयक तत्वज्ञान गीतेमध्ये जे सांगितले आहे, त्याचे काही काहीजण खालीलप्रमाणेही वर्गीकरण करतात-
कर्मयोग (अध्याय १-६)
भक्ती योग (अध्याय ७-१२)
ज्ञान योग (अध्याय १३-१८)
गीतेची अठरा नावे
गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती।
ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी।।
अर्धमात्रा चिदानन्दा भवघ्नी भयनाशिनी।
वेदत्रयी पराऽनन्ता तत्त्वार्थज्ञानमंजरी।।
इत्येतानि जपेन्नित्यं नरो निश्चलमानसः।
ज्ञानसिद्धिं लभेच्छीघ्रं तथान्ते परमं पदम्।।
गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानन्दा, भवघ्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनन्ता और तत्त्वार्थज्ञानमंजरी (तत्त्वरूपी अर्थाच्या ज्ञानाचे भंडार) या प्रकारे (गीतेच्या) अठरा नावांना जो मनुष्य स्थिर मनाने नित्य जप करताो, तो शीघ्र ज्ञानसिद्धि आणि अंती परम पदाला प्राप्त होतो.
आज गीताजयंतीच्या शुभमुहूर्तापासून आपण श्रीमद् भगवद् गीतेवर आधारित क्विझ सुरू करीत आहोत.
आपला वेळ सत्कारणी लागण्यासाठी, आणि त्याचबरोबर त्यानिमित्ताने श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन व्हावे या हेतूने हे क्विझ सुरू करीत आहोत.
आपण सर्वांनी वरील लेख पूर्ण वाचला असेल तर मग चला, आपण वरील लेखावर आधारित असलेल्या खालील प्रश्नांची उत्तरें देऊ यात.
#1. How many total shlokas are there in Gita गीतेमध्ये एकूण किती श्लोक आहेत?
#2. How many chapters are there in Gita गीतेत एकूण किती अध्याय आहेत?
#3. What is the name of the 7th Chapter? सातव्या अध्यायाचे नांव काय आहे?
#4. Which chapter(s) is/are the smallest? कोणता/ कोणते अध्याय सगळयात कमी श्लोकांचे आहेत?
#5. Which chapter is the biggest? सगळयात जास्त श्लोक असलेला अध्याय कोणता?
#6. Which chapters describe Karmayog? कर्मयोग कोणकोणत्या अध्यायांत सांगितला आहे?
#7. Out of 18 names of Gita, which is 6th name? गीतेच्या 18 नावांपैकी 6 वे नांव कोणते?
#8. What is the name of 12th chapter? बाराव्या अध्यायाचे नांव काय आहे?
#9. Which chapter do you like most? तुम्हाला सगळयात जास्त कोणता अध्याय आवडतो?
#10. What is the name of the 15th Chapter? पंधराव्या अध्यायाचे नांव काय आहे?
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.


