Video by Sachin Bhope on 15 September 2024
हत्ती गणपती मंडळ पुणे देखावा 2024
Hatti Ganpati Mandal Pune Scene 2024
हत्ती गणपती मंडळ, नवी पेठ पुणे यांनी यावर्षी रावण वधाचा हलता देखावा सादर केला आहे, आणि तो पाहण्यासाठी श्रद्धाळूंची गर्दी उसळली आहे.
पुण्यातील नवी पेठ हत्ती गणपती मंडळाला १३३ वर्षांचा इतिहास आहे. १८९३ मध्ये देवकर, पानसरे, पडवळ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी नवी पेठ हत्ती गणपती मंडळाची स्थापना केली. स्थापनेपासून ही श्रींची तिसरी मूर्ती आहे. या मूर्तीला ५९ वर्ष पूर्ण झाली आहेत. वाघावर हत्ती आणि त्यावर गणपती बाप्पा विराजमान असणारी महाराष्ट्रातील अशी ही एकमेव मूर्ती आहे.
या मंडळाने यावर्षी प्रभू श्री राम रावणाचा वध करताहेत असा हलता देखावा उभारला आहे. त्या देखाव्यात श्री हनुमान हे आकाशात उडतांना दाखवले आहेत. आणि श्रीराम धनुष्याला बाण लावत आहेत, बाण मारत आहेत, आणि रावण खाली पडतो आहे, असे भव्य दृश्य उभारले आहे, आणि ते बघायला भाविकांची गर्दी उसळत आहे.
पुणे येथेच लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी यांनी १८९३ साली सार्वजनिक गणेश उत्सवाची प्रथा सुरू केली होती. त्यावेळच्या इंग्रज सरकारविरुद्ध भारतीयांना एकत्र आणण्याचे एक हत्यार, तसेच लोकांमध्ये राष्ट्रीयत्व आणि अस्मिता जागृत करण्याचे एक साधन म्हणून लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला होता. त्यामुळे, पुणे म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाचे माहेरघर आहे असे म्हटले तरी चालेल.
पुण्याचे पाच प्रमुख गणपती हे मानाचे गणपती समजले जातात आणि येथे गणेश उत्सव पाहण्यासाठी येणारे भाविक त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. याबद्दल मराठी आणि हिन्दी मधील सविस्तर लेख याधीच लिहिला आहे, तो खालील लिंक वर वाचू शकता
Hatti Ganpati Mandal Pune Scene 2024
खालील व्हिडीओ मध्ये आमच्या असीम आनंद या यू ट्यूब चॅनेल वर पुण्याचा हत्ती गणपती मंडळाचा वरील देखावा बघून प्रत्यक्ष बघण्याचा आनंद घ्या. आपण ही बघा आणि इतरांना ही पाठवा.
व्हिडिओ आवडल्यास असीम आनंद या चॅनेलला यू ट्यूब वर subscribe करा.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.