Generate your own Greeting Card for Makar Sankranti
Makar Sankranti Greeting Card Generator
संक्रांतीच्या शुभेच्छा !
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
मकर संक्रांती हा एक आनंद आणि उत्साहाने भरलेला सण आहे. ऋतूमध्ये होणारा अनुकूल बदल, सूर्याचे उत्तरायण सुरू होण्याचा काळ, त्याच वेळी शेतीतील रब्बी हंगामाची महत्त्वाची कामें संपून थोडा निवांतपणा, या सगळ्यांना साजरा करण्यासाठी पूर्ण भारतात कुठल्या ना कुठल्या नांवाने आणि प्रकाराने हा उत्सव साजरा केला जातो.
एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे अपेक्षित असले तरी, आजकाल आधुनिक जीवनाच्या व्यस्ततेमुळे जर असे भेटणे शक्य झाले नाही, तर आपण एकमेकांना शुभेच्छा देणारे ग्रीटिंग नक्की पाठवितो. असे ग्रीटिंग जर नेमक्या, योग्य त्या शब्दात, आणि आपल्या नांवासकट पाठविता आले तर किती चांगले!
खाली दिलेल्या Greeting Card Generator चा वापर करून तुम्ही आपल्या स्नेही जनांना आणि मित्र परिवाराला असे शुभेच्छा कार्ड पाठवू शकता.
- Select a Sankranti Message या मेन्यू मधून, दिलेल्या १० मेसेजेस पैकी, आपल्याला आवडणारा मेसेज select करा. लगेच तो मेसेज खालील रंगीत कार्डावर दिसेल.
- Your Name या मेन्यू वर गेल्यावर, तुमचे नांव टाइप करा. तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत. लगेच तुमचे नांवही त्या कार्डवर दिसू लागेल.
- Download Card या बटन वर क्लिक करा.
- तुमचे customized greeting कार्ड तुमच्या मोबाईल वर किंवा लॅपटॉप वर (तुम्ही लॅपटॉप वरून केले असल्यास) डाउनलोड होईल.
- डाउनलोड झालेले कार्ड open करा. त्यात वर share चे बटन आले असेल. ते वापरून हे कार्ड तुम्ही whatsapp किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वर शेअर करू शकता !
Customized Greeting Card developed specially for the readers of goodworld.in and goodlifehub.in.
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.