Memories of Teachers day आठवणीतील शिक्षक दिन
कोण आहेत महाराष्ट्रातील पारितोषिक प्राप्त शिक्षक?
इतर कुठलाही दिवस (स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाशिवाय) इतका लक्षात राहत नाही, पण 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून पक्का लक्षात राहतो. कारण शिक्षक दिनासोबत जोडलेल्या आपल्या शालेय जीवनातील आठवणी, आणि त्याच बरोबर आपल्या संस्कारक्षम वयात आपल्याला शिकविणाऱ्या आपल्या शिक्षकांच्या आठवणी.
शिक्षकांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन हा जसा भारतात साजरा केला जातो, तसा तो जगभरात पण साजरा केला जातो, पण 5 सप्टेंबरला नाही. यूनेस्को तर्फे 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये शिक्षक दिन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. मात्र, जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
याशिवाय अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. 1994 मध्ये UNESCO ने शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी 5 ऑक्टोबर हा ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली होती.
भारतात 1962 सालपासून, प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपति, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरूवात झालेली आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी इंग्रजांच्या काळातील ‘मद्रास प्रेसिडेन्सी’ मधील नॉर्थ अॅऱ्कॉट जिल्ह्यातील तिरुतनी या गावी, तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता(आताच्या तामिळनाडू मधील तिरुवल्लूर जिल्हा). त्यांच्या विद्वत्तेने शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. काही पाश्चात्य तत्त्वज्ञान्यांनी वेदान्त तत्त्वज्ञाना बद्दल केलेल्या चुकीच्या प्रचारानी व्यथित होऊन, त्यांनी वेदान्त तत्वज्ञान, अद्वैत तत्त्वज्ञान याबद्दल सखोल अभ्यास करून, त्यांना उत्तर देण्यासाठी, “The Ethics of Vedanta” या नावाचा शोधप्रबंध 1914 साली प्रसिद्ध केला. ते सनातन हिंदू तत्वज्ञान आणि अद्वैत वेदान्त याचे कट्टर पुरस्कर्ते होते.
राधाकृष्णन यांना 1952 मध्ये भारताचे उपराष्ट्रपति म्हणून निवडण्यात आले. आणि 1962 साली ते भारताचे दुसरे राष्ट्रपति झाले. ते 1967 पर्यन्त भारताचे राष्ट्रपति होते. राधाकृष्णन यांना 1954 मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ते जेंव्हा भारताचे राष्ट्रपति झाले तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी 5 सप्टेंबर रोजी येणारा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांना भेटायला गेले तेव्हा आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा दिवस देशातील शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे त्यांनी सुचविले. तेंव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
आमच्या शिक्षक दिनाच्या आठवणी

शिक्षक दिनानिमित्त आमच्या त्या काळच्या शिक्षकांची आठवण आजही आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची लकब त्यानिमित्ताने आठवते. शिक्षक आणि मुलांचे एक वेगळेच घट्ट नाते त्याकाळी होते. शिक्षकांविषयी अपार आदर होता, आणि शिक्षकांनाही मुलांविषयी अपार आत्मीयता होती. शिक्षक दिन विशेष लक्षात राहण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी एक दिवस केलेली शिक्षकाची भूमिका. शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेतील त्यातल्या त्यात हुशार विद्यार्थी, वेगवेगळ्या विषयाचे ‘शिक्षक’ म्हणून भूमिका पार पाडत. आपापले विषय वाटून घेत आणि त्या दिवशी शिकविण्यासाठी एखादा लेसन तयार करून, त्या दिवशी ‘क्लास’ घेत. त्यांचे वर्गमित्र मोठ्या उत्साहाने त्यांचा क्लास attend करत. काही काही व्रात्य मुले आपल्या या ‘शिक्षकाची’ फिरकीही घेत. शिक्षकही आपल्या शिष्याचे कौतुक पाहायला क्लास मध्ये येत. एखादा विद्यार्थी हेडमास्तरही होई. शिक्षक दिनानिमित्त भाषणेही होत. नंतर सगळे मिळून छानपैकी नाश्ता करून त्या दिवसाची सांगता करीत.
मला वाटते अजूनही ही प्रथा बऱ्यापैकी चालू आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांसाठीही शिक्षक दिन ही अशीच एक पर्वणी आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त शिक्षकांची यादी
भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दि. 5 सप्टेंबर रोजी खालील 50 शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरवित करण्यात येणार आहे. आणि त्यांना नगदी रु. 50000/ एक प्रमाणपत्र आणि सिल्वर मेडल यांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
- अविनाशा शर्मा – हरियाणा
- सुनील कुमार – हिमाचल प्रदेश
- पंकज कुमार गोया – पंजाब
- राजिंदर सिंह – पंजाब
- बलजिंदर बराड़ सिंह – राजस्थान
- हुकम चौधरी चंद – राजस्थान
- कुसुम लता गरिया – उत्तराखंड
- चंद्रलेखा दामोदर मेस्त्री – गोवा
- चंद्रेशकुमार भोलाशंकर बोरीसागर – गुजरात
- विनय शशिकांत पटेल – गुजरात
- माधव पटेल प्रसाद – मध्य प्रदेश
- सुनीता गोधा – मध्य प्रदेश
- के, शारदा – छत्तीसगढ़
- नरसिम्हा मूर्ति एचके – कर्नाटक
- द्विति चंद्र साहू – ओडिशा
- संतोष कुमार कर – ओडिश
- आशीष कुमार रॉय – पश्चिम बंगाल
- प्रशांत कुमार मारिक – पश्चिम बंगाल
- उर्फनामीन जम्मू – कश्मीर
- रविकांत द्विवेदी – उत्तर प्रदेश
- श्याम मौर्य प्रकाश यू – उत्तर प्रदेश
- डॉ. मिनाक्षी कुमारी – बिहार
- सुकेंद्र कुमार सुमन – बिहार
- के. सुमा – अंडमान एंड निकोबर द्वीप
- सुनीता गुप्ता – मध्य प्रदेश
- चारू शर्मा – दिल्ली
- अशोक सेनगुप्ता – कर्नाटक
- एच एन गिरीश – कर्नाटक
- नारायणस्वामी.आर – कर्नाटक
- ज्योति पंका – अरुणाचल प्रदेश
- लेफिजो अपोन – नागालैंड
- नंदिता च ओंगथम – मणिपुर
- यांकिला लामा – सिक्किम
- जोसेफ वनलालह्रुआ सेल – मिजोरम
- एवरलास्टी एनजी पाइनग्रोप – मेघालय
- डॉ.नानी जी देबनाथ – त्रिपुरा
- दीपेन खानिकर – असम
- डॉ. आशा रानी – झारखंड
- जिनु जॉर्ज – केरल
- के सिवाप रसद – केरल
- मिडी श्रीनिवास राव – आंध्र प्रदेश
- सुरेश कुनाट – आंध्र प्रदेश
- प्रभाकर रेड्डी पेसरा – तेलंगाना
- थदुरी संपत कुमार – तेलंगाना
- पल्लवी शर्मा – दिल्ली
- चारु मैनी – हरियाणा
- गोपीनाथ आर – तमिलनाडु
- मुरलीधरन रमिया सेथुरमन – तमिलनाडु
- मंटय्या चिन्नी बेडके – महाराष्ट्र Z.P.UPEER PRIMZRY DIGITAL SCHOOL JAJAVANDI
- सागर चित्तरंज एन बागडे – महाराष्ट्र SOU S. M. LOHIA HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KOLHAPUR





















