https://goodworld.in A website by Madhav Bhope

Gita Jayanti and Mokshada Ekadashi गीता जयंती 2024 आणि मोक्षदा एकादशी

margashirsha

गीता जयंती 

आज दि. 11 डिसेंबर, मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती अशी मान्यता आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचे माहात्म्य आपल्याला नवीन सांगायला नको.

श्रीमद्भगवद्गीतेचे माहात्म्य अगाध आणि असीम आहे. हा भगवद्गीता ग्रंथ प्रस्थानत्रयींमध्ये मानला जातो. मानवजातीच्या उद्धाराचे तीन राजमार्ग प्रस्थानत्रय या नांवाने सांगितले जातात.

त्यापैकी ‘उपनिषद्’ हा वैदिक मार्ग आहे. दुसरा ब्रह्मसूत्र हा दार्शनिक मार्ग आहे, आणि भगवद्गीता हा स्मार्त मार्ग आहे (म्हणजे श्रुति आणि स्मृति यांना अनुसरणारा),असे म्हटले जाते.

उपनिषदांमध्ये ‘मंत्र’ आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये ‘सूत्रें’ आहेत आणि गीतेमध्ये ‘श्लोक’ आहेत. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्लोक असूनही प्रत्यक्ष भगवंतांची ‘वाणी’ असल्यामुळे, ते मंत्रच आहेत.  ह्या श्लोकांमध्ये अत्यंत गहन अर्थ भरलेला असल्यामुळे त्यांना ‘सूत्रें’ ही म्हटले जाते. उपनिषद् ‘अधिकारी’ मनुष्यांच्या उपयोगाचे आहे, ब्रह्मसूत्र ‘विद्वानांच्या’ उपयोगाचे आहे, परंतु भगवद्गीतेतील ज्ञान हे सर्वांच्या उपयोगाचे आहे.

भगवद्गीता हा एक अत्यंत अलौकिक आणि वैचित्र्यपूर्ण ग्रंथ आहे. साधक कोणत्याही देशाचा, भाषेचा, धर्माचा, विचाराचा, संप्रदायाचा, वर्णाचा, आश्रमाचा असला तरीही त्याच्या उपयोगी पडणारी संपूर्ण साधन सामग्री या ग्रंथात आहे.

कारण की, गीतेमध्ये कोणत्याही संप्रदायाची निंदा अथवा स्तुति केलेली नाही, तर वास्तविक तत्त्वाचेच वर्णन केलेले आहे. वास्तविक तत्त्व तेच आहे, की जे परिवर्तनशील, प्रकृति आणि प्रकृतिजन्य पदार्थांपासून सर्वथैव अतीत, आणि संपूर्ण देश, काल, वस्तु, व्यक्ति, परिस्थिति, इत्यादींमध्ये नित्य, निरंतर एकरस आणि एकरूप राहणारे आहे. जो मनुष्य ज्या ठिकाणी आणि जसा आहे, त्या ठिकाणी आणि तसेच, वास्तविक तत्त्व पूर्ण विज्ञमान आहे. परंतु परिवर्तनशील असलेल्या वस्तु, व्यक्ति मध्ये ‘राग’ आणि द्वेषामुळे त्याचा अनुभव येत नाही. संपूर्णपणे रागद्वेषरहित झाल्यानंतर त्याचा स्वाभाविकच अनुभव येतो.

 

गीतेमध्ये साधनांचे वर्णन करण्याबाबत, विस्तारपूर्वक समजावण्याबाबत एकेका साधनाचे अनेक वेळा कथन करण्यात संकोच केलेला नाही. आपल्या कल्याणाची उत्कट अभिलाषा असणारा मनुष्य कोणत्याही परिस्थितीत परमात्व तत्त्वाला प्राप्त करून घेऊ शकतो. युद्धासारख्या भयंकर परिस्थितीमध्येही आपले कल्याण करून घेऊ शकतो. अशा प्रकारे व्यवहारामध्ये राहूनही परमात्त्व प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकविली आहे. त्यामुळे गीतेची बरोबरी करू शकेल असा दुसरा कोणताही ग्रंथ दिसत नाही.

 

स्वामी रामसुखदासजी सांगतात- गीता हा एक प्रासादिक ग्रंथ आहे. याचा आश्रय घेऊन पाठ केले असता अत्यंत विलक्षण, अलौकिक आणि शांती प्रदान करणारे भाव स्फुरण पावतात. याचे मनःपूर्वक पठण केल्यास परम शांती मिळते. ह्याचा एक विधी असा आहे की, प्रथम गीतेचे संपूर्ण श्लोक अर्थासहित पाठ करावेत, नंतर एकांतात बसून गीतेच्या “यत्र योगेश्वर कृष्ण” या शेवटच्या श्लोकापासून “धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे” या पहिल्या श्लोकापर्यंत पुस्तकावाचून उलटा पाठ केल्यास परम शांती मिळते. गीतेचा दररोज एक वेळा किंवा अनेक वेळा पूर्ण पाठ केल्यास गीतेचे विशेष अर्थ स्फुरतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पाठ करता करताच तिचे निरसन होते. वास्तविक या ग्रंथाचे माहात्म्य वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही.

 

आज गीताजयंतीच्या दिवशी, भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करून, गीतेतील जितके जमतील तितके अध्याय वाचल्यास नक्कीच हा दिवस सार्थकी लावल्यासारखे होईल.

मोक्षदा एकादशी

आजच्या या एकादशीला मोक्षदा एकादशीही म्हणतात. प्राचीन काळी वैखानस नांवाचा राजा गोकुळावर राज्य करीत होता. त्याला एकदा स्वप्नामध्ये त्याचे वडील मृत्यूनंतर अतिशय कष्ट भोगत असल्याचे दिसले. त्यावरून त्याने राजपुरोहिताचा सल्ला घेतला, राजपुरोहिताने त्याला पर्वत नांवाच्या ऋषींकडे पाठविले. त्यांनी त्यांच्या ज्ञानाने जाणून राजाला सांगितले की त्याचे वडील त्यांच्या काही पापाचरणाने नरकात कष्ट भोगत आहेत. त्यावर उपाय म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे, जिचे नांव मोक्षदा एकादशी आहे, तिचे व्रत करून तिचे पुण्य आपल्या वडिलांना द्यावे, जेणेकरून ते त्यांच्या पापातून मुक्त होतील. राजाने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मोक्षदा एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य आपल्या वडिलांना दिल्यावर ते मुक्त झाले अशी कथा आहे. मोक्षदा एकादशीला आपल्या पितरांसाठी तर्पण करावे असे सांगितले आहे.

 

श्रीकृष्णार्पणमस्तु!!

 

LIC Bima Sakhi Yojna-एल.आय.सी ची बीमा सखी योजना

LIC-Bima-Sakhi-Yojana

बीमा सखी योजना- 18 ते 70 वयोगटातील महिलांना एलआयसी एजंट बनण्याची सुवर्णसंधी- सोबत महिना 7000 रूपये स्टायपेण्ड!

दि. 9 डिसेंबर च्या वर्तमानपत्रात “बीमा सखी योजना” या नांवाची, LIC India(भारतीय जीवन बीमा  निगम)ची एक योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आल्याची बातमी वाचण्यात आली. या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी हरियानातील पानिपत या शहरी केल्याचे वाचण्यात आले. तसेच वर्तमानपत्रात याबद्दल त्या दिवशी LIC तर्फे देण्यात आलेली जाहिरातही वाचण्यात आली.

कुतूहलाने त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, त्यातील एका वैशिष्ट्याने लक्ष वेधून घेतले- ते म्हणजे यासाठी 18 ते 70 वयापर्यंतच्या, कमीत कमी 10 वी पास असलेल्या महिला पात्र आहेत. LIC अशा प्रकारे 2 लाख महिलांना एक उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणार आहे असे म्हटले आहे. त्यासाठी निवडलेल्या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा रु. 7000 चा स्टायपेण्ड देण्यात आहे- म्हणजे वर्षाचा रु. 84000- दुसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 6000- म्हणजे वर्षाचा रु. 72000 आणि तिसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 5000-म्हणजे वर्षाचा रु. 60000- असा 3 वर्षांचा एकूण रु. 2,16,000 स्टायपेण्ड देण्यात येणार असल्याचे लिहिले आहे- आणि हा 3 वर्षांचा कालावधी हा प्रशिक्षण काळ राहील असे सांगितले आहे. या कालावधीच्या पूर्ततेनंतर संबंधित महिलांना LIC Agent म्हणून काम करता येणार आहे( LIC चे कर्मचारी नव्हे), आणि त्यातील ग्रॅजुएट असलेल्यांना विकास अधिकारी (Development Officer) म्हणून काम करण्याचीही संधी मिळू शकते असे लिहिले आहे.

अजून या योजनेचे पूर्ण तपशील कळू शकले नाहीत. जसे की- या कालावधीत कसे प्रशिक्षण दिले जाईल? आणि कुठे? तसेच LIC च्या संबंधित वेबसाइट वर वरील स्टायपेण्डच्या समोर वर्षभरात 24 पॉलिसीज- म्हणजे साधारण महिन्याला 2 पॉलिसीज कराव्या लागतील असा उल्लेख आहे. त्यामुळे अशा पॉलिसीज जर पूर्ण नाही होऊ शकल्या तर काय, याबद्दल उल्लेख नाही. मात्र केलेल्या पॉलिसीज वर कमिशन वेगळे मिळेल असा उल्लेख आहे. त्यामुळे ज्या महिलांना अशा प्रकारच्या कामात रस आहे, थोडे अधिकचे काम करून उत्पन्न मिळविण्याची इच्छा आहे, त्यांनी यासंदर्भात apply करून बघायला काही हरकत नाही, असे वाटते. आणि त्यासाठी जास्त काहीच कागदपत्र देण्याची गरज नाहीये. त्यामुळे आपल्या महितीतील कोणी अशा महिला असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोंचवावी असे वाटते. तसेच  इच्छुक महिलांनी LIC च्या वेबसाइट वर जाऊन apply करावे.

या संदर्भातील सगळे तपशील खाली दिले आहेत.

सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये, google search वर जाऊन, bima sakhi(इंग्लिश मध्ये) किंवा बीमा सखी (मराठीमध्ये) टाइप करावे. त्यानंतर जे रिजल्ट येतील, त्यात खालील वेबसाइट दिसेल (अगदी पहिल्याच क्रमांकावर नाही, पण वरून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर) https://licindia.in/lic-s-bima-sakhi

त्यावर क्लिक करावे. त्यानंतर खालील स्क्रीन येईल-

 

lic-1 स्क्रीन वर अजून खाली गेल्यानंतर Click here for Bima Sakhi असे एक बटन येईल. त्यावर क्लिक करायचे-lic-3

 

 

त्यांनंतर अर्जाचा खालील स्क्रीन येईल.lic-5

 

त्यात आपली माहिती भरायची. जन्मतारीख टाकतांना ती MM/DD/YYYY या फॉरमॅट मध्ये टाकायची आहे, म्हणजे जन्माचा महिना पहिल्यांदा, नंतर जन्मतारीख, आणि नंतर वर्ष. आपल्या मोबाईल नंबरच्या कॉलम मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. ई -मेल अॅड्रेस असल्यास टाका, नसल्यास ती जागा रिकामी सोडा. त्यानंतरच्या कॉलम मध्ये- Are you related–… इत्यादि मध्ये मात्र No वरती क्लिक करणे आवश्यक आहे- अर्थात त्यासाठी तुम्ही LIC ह्या कुठल्याही एजंट, डेव्ह. ऑफिसर, कर्मचारी, इत्यादींच्या नात्यात येत नसले पाहिजे. 

त्यानंतरच्या कॉलम मध्ये तिथे दिलेला Captcha भरायचा, आणि नंतर सबमिट करायचे.  सबमिट केल्यावर खालील मेसेज येईल- अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकेल.

LIC-6 (1)

 

 

 

The importance of Margashirsha- मासानां मार्गशीर्षोहं

margashirsha

The Significance of Margashirsha in Hindu Culture

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।

मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।10.35।।

।मैं मासों में मार्गशीर्ष हूँ अंग्रेजी महीनों के अनुसार दिसम्बर और जनवरी के भाग मार्गशीर्ष हैं। भारत में इस मास को पवित्र माना गया है। जलवायु की दृष्टि से भी यह सुखप्रद होता है? क्योंकि इस मास में न वर्षा की आर्द्रता या सांद्रता होती है और न ग्रीष्म ऋतु की उष्णता।मैं ऋतुओं में बसन्त हूँ प्रकृति को सुस्मित करने वाली बसन्त ऋतु मैं हूँ। समस्त सृष्टि की दृश्यावलियों को अपने सतरंगी सन्देश और सुरभित संगीत से हर्ष विभोर करने वाला ऋतुराज पर्वत पुष्पों के परिधान पहनते हैं। भूमि हरितवसना होती है। सरोवर एवं जलाशय उत्फुल्ल कमलों की हंसी से खिलखिला उठते हैं। मैदानों में हरीतिमा के गलीचे बिछ जाते हैं। सभी हृदय किसी उत्सव की उमंग से परिपूर्ण हो जाते हैं। सृष्टि के हर्षातिरेक को राजतिलक करने के लिए चन्द्रिका स्वयं को और अधिक सावधानी से सँवारती है।मुझे न केवल भव्य और दिव्य में ही देखना है और न केवल सुन्दर और आकर्षक में? वरन् हीनतम से हीन में भी मुझे पहचानना है मैं हूँ? जो हूँ सुनो

The month of Margashirsha, often regarded as the most sacred month in the Hindu calendar, holds immense importance both spiritually and practically. Its prominence is explicitly mentioned in the Bhagavad Gita, where Bhagvan Shrikrishna proclaims, “Masanaam Margashirshoham” (Among all months, I am Margashirsha), emphasizing its unparalleled divine essence. This article delves into why this month is revered, its spiritual significance, health benefits aligned with the Indian climate, and the ancient scriptures’ recommendations for an ideal lifestyle during this time.


Margashirsha: The Month of Divinity

Margashirsha corresponds to November–December in the Gregorian calendar. It is considered the ninth month of the lunar Hindu calendar and marks the transition from autumn to winter. This transitional period is a time of renewal, reflection, and devotion.

The declaration in the Bhagavad Gita elevates Margashirsha to a divine status. Bhagvan Shrikrishna’s words highlight its unique sanctity, symbolizing purity, abundance, and the ideal time for spiritual awakening. Hindu traditions associate this month with the manifestation of Lord Vishnu’s qualities, such as compassion, wisdom, and righteousness.


Spiritual Significance of Margashirsha

  1. Devotion and Worship:
    Margashirsha is regarded as the ideal month for spiritual activities such as meditation, chanting, and worship. It is said that prayers and rituals performed during this time yield manifold blessings.

    • Satyanarayan Puja, dedicated to Lord Vishnu, is frequently conducted during this month.
    • Chanting the sacred mantra “Om Namo Bhagavate Vasudevaya” is believed to bring inner peace and connect one with divine consciousness.
  2. Gita Jayanti:
    One of the most significant events of Margashirsha is Gita Jayanti, the day when Bhagavad Gita was revealed by Bhagvan Shrikrishna to Arjuna on the battlefield of Kurukshetra. This day is celebrated with readings of the Gita, discussions, and reflections on its teachings.

  3. Simplicity and Charity:
    Hindu scriptures like the Padma Purana and Skanda Purana emphasize simplicity and acts of charity in Margashirsha. Offering food, clothes, and other essentials to the needy is highly meritorious. The concept of “daan” (charity) during this month is a way to cleanse the soul and cultivate selflessness.

  4. Kartik Ekadashi and Margashirsha Purnima:
    The month is also adorned with significant tithis like Kartik Ekadashi and Margashirsha Purnima, where devotees fast and engage in spiritual practices to attain liberation (moksha).


Health Benefits During Margashirsha

From a health perspective, Margashirsha marks the onset of winter in India, bringing cooler temperatures and a conducive environment for physical and mental rejuvenation. Ancient Ayurvedic texts underscore specific practices to maintain health during this month:

  1. Strengthening Immunity:
    The transition from autumn to winter often challenges the body’s immunity. A diet rich in seasonal produce, such as fresh vegetables, citrus fruits, nuts, and warming spices like turmeric, ginger, and cinnamon, is recommended.

  2. Detoxification:
    Margashirsha is an excellent time for detoxifying the body. Traditional Ayurvedic practices like Panchakarma or simple home remedies such as herbal teas can help cleanse the system.

  3. Sun Salutations and Yoga:
    The crisp morning air during Margashirsha is ideal for outdoor yoga and Surya Namaskar (sun salutations). These practices align the body with the rhythm of nature, enhancing vitality.

  4. Balance and Rest:
    The cooler weather encourages restful sleep and reduces physical fatigue. Embracing nature’s rhythm by waking up early and meditating during Brahma Muhurta (approximately 4:00 AM) is highly beneficial.


Margashirsha and Spiritual Growth

The spiritual essence of Margashirsha lies in its alignment with the cosmic rhythm. The tranquility of the season inspires self-introspection and fosters a deeper connection with the divine.

  1. Meditation and Japa:
    Meditation during this month is particularly effective due to the stillness of the environment. Practicing Japa (repetitive chanting of mantras) enhances focus and invokes divine blessings.

  2. Pilgrimages and Holy Baths:
    Ancient scriptures like the Mahabharata and Garuda Purana recommend pilgrimages to holy sites and ritualistic baths in sacred rivers during Margashirsha. The waters of rivers like the Ganga are believed to hold heightened purifying properties during this month.

  3. Vrat (Fasting):
    Observing fasts on auspicious days like Ekadashi and Purnima is spiritually uplifting. Fasting helps cleanse the body and mind, paving the way for higher spiritual experiences.


Rituals and Practices in Margashirsha

  1. Worship of Tulsi:
    The Tulsi plant holds special significance during this month. Devotees light lamps and offer prayers to Tulsi, seeking her blessings for prosperity and well-being.

  2. Kirtans and Bhajans:
    Singing hymns and participating in kirtans (devotional music sessions) uplift the spirit and create an atmosphere of divine energy.

  3. Simplicity in Living:
    Margashirsha encourages simplicity and moderation. Emphasizing contentment, it advises detachment from materialistic desires and focusing on spiritual fulfillment.

  4. Observing Silence:
    The practice of Mauna Vrata (observing silence) is recommended to cultivate inner peace and enhance spiritual awareness.


Margashirsha in Ancient Hindu Scriptures

  1. Bhagavata Purana:
    The Bhagavata Purana mentions that Margashirsha is the month when spiritual practices yield higher benefits compared to other months.

  2. Skanda Purana:
    This scripture highlights the importance of worshipping Lord Vishnu during Margashirsha, as it is the most auspicious period for seeking His grace.

  3. Padma Purana:
    The Padma Purana encourages acts of kindness and charity, reinforcing the principle of selfless service.


Modern Relevance of Margashirsha

In today’s fast-paced world, the principles associated with Margashirsha offer a much-needed reprieve. Its emphasis on simplicity, introspection, and spiritual growth serves as a reminder to pause and reconnect with one’s inner self. Practicing gratitude, mindfulness, and acts of kindness during this month can significantly improve mental well-being and foster a sense of community.


Conclusion

Margashirsha, the divine month honored by Bhagvan Shrikrishna in the Bhagavad Gita, is a period of immense spiritual, physical, and emotional significance. From its health benefits aligned with the changing climate to its spiritual practices fostering inner peace and divine connection, this month encapsulates the essence of Hindu culture. Embracing the principles of Margashirsha—devotion, simplicity, and mindfulness—not only nurtures the soul but also enriches the quality of life.

Let us honor this sacred month with heartfelt devotion, meaningful actions, and a commitment to spiritual growth, realizing the divine within and around us.

भक्तांच्या कथा-5-भक्त गोकर्ण Devotee 5- Bhakta Gokarna

gokarna

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

भक्त- गोकर्ण

भक्त गोकर्ण

Bhakta Gokarna

पूर्वीच्या काळी दक्षिण भारतात तुंगभद्रा नदीच्या काठी एक सुंदर नगरी होती. तिथे आत्मदेव या  नांवाचा एक सदाचारी, विद्वान आणि धनवान ब्राह्मण राहत होता. त्याला धुंधुली या नांवाची पत्नी होती, जी खूप भांडकुदळ होती. त्या दोघांना मूलबाळ नसल्याने ते दुःखी होते. मूल होण्यासाठी बरेच उपाय करूनही त्यांना मूल होत नव्हते. एके दिवशी आत्मदेव त्याच चिंतेत घराच्या बाहेर पडला, आणि वनात जाऊन एका तळ्याच्या काठी बसला. तिथे त्याला एका संन्याशाचे दर्शन झाले. त्याने त्या संन्याशाला आपले दुःख सांगितले. संन्याशाला त्याची दया आली. त्याने ध्यान लावून त्याचे प्रारब्ध जाणून घेतले, आणि त्याच्या नशिबात सात जन्मपर्यंत संततीचा योग नाही असे सांगितले. त्यामुळे त्याने संततीची इच्छा सोडून भगवंतात चित्त लावावे असे सांगितले. पण आत्मदेव म्हणाला, “महाराज, मला आपला उपदेश नकोय, मला संतती मिळवून द्या, अन्यथा मी इथेच देहत्याग करतो.” ब्राह्मणाचा हट्ट पाहून तो संन्याशी म्हणाला, “ असा हट्ट करणे योग्य नाही. विधात्याच्या इच्छेविरुद्ध तुला पुत्र प्राप्ति झाली तरी त्याचे सुख तुला मिळणार नाही. परंतु तरीही जर तुझा हट्टच असेल, तर तू हे फळ घेऊन जा, हे घरी जाऊन आपल्या बायकोला खाऊ घाल, तुला पुत्र होईल. पण लक्षात ठेव, तुझ्या पत्नीने पुत्र उत्पन्न होईपर्यंत व्रतस्थ, पवित्रतेने राहायला पाहिजे. सत्य बोलायला पाहिजे, दान केले पाहिजे, आणि फक्त एक वेळ जेवून राहायला पाहिजे. अशाने तुम्हाला होणारी संतती चांगली होईल.” असे सांगून संन्याशाने त्याला एक फळ दिले.

फळ घेऊन ब्राह्मण घरी आला आणि आपल्या पत्नीला ते फळ दिले. त्याची पत्नी धुंधुलीने विचार केला, की हे फळ खाल्ल्यावर मला इतक्या कडक नियमाने राहावे लागेल, आणि पुन्हा मूल झाल्यावर सुद्धा त्याला सांभाळण्याचे कष्ट करावे लागतील. त्यापेक्षा नकोच ते, वांझ राहणेच ठीक.” असा विचार करून तिने ते फळ आपल्या गाईला खायला घातले, आणि फळ आपण खाल्ल्याचे पतीला खोटेच सांगितले. इकडे त्याच  वेळी, तिची लहान बहीण गर्भवती झाली होती. तिने तिच्याकडून कबूल करून घेतले, की तिला होणारे अपत्य ती धुंधुलीला देईल. योग्य वेळी तिच्या बहिणीला एक पुत्र झाला, जो तिने धुंधुलीला आणून दिला. सगळीकडे हे प्रसिद्ध करून दिले की धुंधुलीला मुलगा झाला. त्याचे नांव त्यांनी धुंधुकारी ठेवले.

तीन महिन्यांच्या नंतर त्या गाईची प्रसूती झाली, आणि तिने एका बालकाला जन्म दिला. त्याचे सर्व अवयव मनुष्याचे होते, फक्त कान गाईसारखे होते. त्यामुळे त्याचे नांव गोकर्ण ठेवले.

gokarna-4

गोकर्ण अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि बुद्धिमान होता. तो लवकरच अत्यंत विद्वान आणि ज्ञानी झाला. इकडे धुंधुकारी मात्र दुश्चरित्र, आचारहीन क्रोधी, चोर, निर्दयी आणि वेश्यागामी निघाला. तो माता पित्याला अत्यंत दुःख देत असे आणि त्यांचे धन घेऊन वेश्येला नेऊन देत असे. आत्मदेव त्याच्या वर्तनाने दुःखी होऊन रडू लागला, त्यावेळी गोकर्णाने त्याला समजावले, आणि ज्ञानाचा उपदेश दिला. पुत्राच्या उपदेशाने आत्मदेव प्रभावित होऊन, घराच्या बाहेर पडला, आणि वनात जाऊन, श्रीहरीच्या भक्तिमध्ये त्याने देह त्याग केला.

पित्याच्या मृत्यूनंतर, धुंधुकारीने त्याचे सगळे धन नष्ट केले, आपल्या आईला खूप त्रास देऊ लागला, ज्यामुळे त्रस्त होऊन तिने विहिरीत जीव दिला. हे सर्व झाल्यावर गोकर्णसुद्धा घरातून तीर्थ यात्रेसाठी बाहेर पडला.

इकडे धुंधुकारी पाच वेश्यांना घेऊन त्याच घरात राहू लागला. एके दिवशी त्या वेश्यांनी त्याला निर्दयपणे मारून टाकले, आणि त्याचे शरीर खड्ड्यात पुरून टाकले. धुंधुकारी आपल्या दुष्ट कर्मांमुळे प्रेतयोनीला प्राप्त झाला. गोकर्णाने जेंव्हा त्याच्या मृत्यूचा समाचार ऐकला, तेंव्हा गयेला जाऊन त्याचे श्राद्ध केले, आणि ज्या ज्या  तीर्थात गेला, तिथे पण त्याचे श्राद्ध केले.

गोकर्ण तीर्थयात्रा करून वापस आला, आणि घरी येऊन रात्री  जेंव्हा झोपला, तेंव्हा, धुंधुकारी प्रेत योनीतच येऊन त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागला. गोकर्णाने त्याला विचारले की तू कोण आहेस, तेंव्हा धुंधुकारी जोरात रडू लागला, पण त्याला बोलता येईना. तेंव्हा गोकर्णाने त्याच्यावर मंत्रजल शिंपडले, तेंव्हा तो बोलू लागला, आणि त्याने दीनपणे आपला सगळा वृत्तान्त सांगितला आणि या भीषण यातनां मधून सुटण्याचा उपाय विचारला. त्यावर गोकर्ण म्हणला, “ तू सध्या जा. मी विचार करून यावर काही उपाय शोधतो.”

दुसऱ्या दिवशी गोकर्णाने अनेक विद्वान ब्राह्मणांशी याबाबत चर्चा केली. तेंव्हा सगळ्यांचे असे मत पडले, की या बाबतीत भगवान सूर्य नारायणांनाच विचारावे. गोकर्णाने त्याच वेळी आपल्या तपोबलाने आणि मंत्र बलाने भगवान सूर्य नारायणांची प्रार्थना केली, आणि त्यांना याबाबत उपाय विचारला. सूर्यनारायणाने संगितले, की याची मुक्ति फक्त भागवत पाठाने होऊ शकते. तू सात दिवसात श्रीमद्भागवत पाठ कर.

गोकर्ण भागवत पाठ करणार हे समजल्यावर आजूबाजूच्या गांवांमधील खूप लोक एकत्र झाले. गोकर्णाने जेंव्हा व्यास आसनावर विराजमान होऊन भागवतकथा  सुरू केली, तेंव्हा धुंधुकारी त्या सभामंडपात आला आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागला. त्याने पाहिले की तिथे सात गाठींचा एक उंच असा बांबू (वेळू) आहे. तो धुंधुकारी वायूरूप असल्याने, त्या बांबूच्या एका छिद्रात जाऊन बसला. 

gokarna-3

संध्याकाळ झाल्यावर, पहिल्या दिवशीची कथा समाप्त झाल्यावर लोकांनी पाहिले की त्या बांबूची एक गाठ कडकड आवाज करीत तुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ आणि तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ तुटली. याप्रकारे सात दिवसांत त्या बांबूच्या सातही गाठी तुटून गेल्या आणि कथा समाप्त होता होता, धुंधुकारी प्रेतयोनीला त्यागून दिव्यरूपाला प्राप्त झाला. लोकांनी पाहिले- त्याच्या गळ्यात तुळशीची माला, मस्तकावर मुकुट, श्याम वर्ण, आणि पीतांबर नेसलेला आहे. तो गोकर्णासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, “बंधू गोकर्ण, तू माझ्यावर दया केलीस आणि मला या प्रेतयोनीतून सोडविलेस. मी आता हे दिव्य रूप घेऊन भगवद्धामाला जातो आहे.” इतक्यात त्याला भगवान विष्णूचे पार्षद घ्यायला आले, आणि तो दिव्य विमानात बसून तिथून गेला.

श्रावण महिन्यात गोकर्णाने पुन्हा श्रीमद्भागवतकथा केली. कथा समाप्तीच्या दिवशी स्वतः भगवान विष्णू आपल्या पार्षदां सोबत तिथे प्रकट झाले, त्यांनी गोकर्णाला हृदयाशी लावून, आपले चतुर्भुज रूप प्रदान केले. पाहता पाहता, मंडपात उपस्थित असलेले श्रोतेगणही विष्णूरूप होऊन गेले, आणि सर्वजण योगीदुर्लभ विष्णू लोकाला गेले. अशा प्रकारे महान भक्त गोकर्णाने आपल्याबरोबर त्या पूर्ण गावाचा उद्धार केला.

shri vishnu

संकलन- माधव भोपे 

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात.  ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

भक्तांच्या कथा-4 -महान भक्त- यमराज – Devotee- 4 Yamraj

220px Yama on buffalo

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee- 4 Yamraj

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

महान भक्त- यमराज

 

Devotee-4 Yamraj

या आधीच्या लेखात आपण पाहिले की प्रमुख 12 भागवताचार्यांमध्ये यमराज हे स्वतः आहेत. त्यांना यमधर्मराज म्हटले जाते. म्हणजे जे धर्माचे पालन करतात. यमराज हे नित्य देव असून ते सूर्यपुत्र आहेत असे मानले जाते. ते देवशिल्पी विश्वकर्मा यांची पुत्री संज्ञा हिच्यापासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते. त्यांचे शरीर श्याम रंगाचे आहे आणि हातात यमदण्ड घेतलेला असतो. त्यांचे वाहन रेडा आहे. भगवान ब्रह्माच्या आदेशानुसार त्यांनी प्राण्यांच्या कर्मानुसार फळाचा निर्णय करण्यासारखे कठोर कार्य त्यांनी अंगिकारले आहे.

यमराज हे परम भक्त आहेत. श्रीमद् भागवतात आले आहे की, यमराज आपल्या दूतांना सांगतात-

“ज्यांची वाणी भगवंताच्या मंगलमय गुणांना आणि पवित्र नामाला वर्णन करत नाही, ज्यांचे चित्त भगवंतांच्या चरणकमळाचे चिंतन करत नाही, अशा, भगवान विष्णूच्या पावन कर्मांपासून पृथक राहणाऱ्या दुष्ट लोकांनाच तुम्ही इथे म्हणजे यमपुरीत आणीत जा. जे लोक भगवंताच्या कथा संकीर्तनामध्ये मग्न राहतात त्यांच्याजवळ तुम्ही जाऊ नका. कारण की मी दुसऱ्या प्राण्यांना तर दण्ड देऊ शकतो, पण भगवंताच्या भक्तांना दण्ड देण्याची शक्ति माझ्यात नाही.”

कठोपनिषदा मध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आला आहे. नचिकेता हा वाजश्रव ऋषी किंवा  उद्दालक यांचा मुलगा होता. त्याच्या वडिलांनी एक यज्ञात, ज्याच्यात आपली सर्व संपत्ति दान करायची असते, अशा यज्ञात, त्यांच्याजवळील म्हाताऱ्या आणि भाकड गायी दान करतांना पाहिले. त्याला फार वाईट वाटले. त्याने आपल्या वडिलांना विचारले, “पिताजी, तुम्ही मला कोणाला दान करणार?” दोन तीन वेळेला हाच प्रश्न ऐकून त्याच्या वडिलांनी त्याला रागाने सांगितले, की जा, तुला यमाला दान दिले आहे. नचिकेता आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून यमलोकाला जायला निघाला. तिथे यमराज उपस्थित नसल्याने त्याला तीन दिवस त्यांची वाट पाहत थांबावे लागले. यमराज परत आल्यावर, आपल्यामुळे या ब्राह्मणकुमाराला वाट पहावी लागली याचे त्यांना दुःख झाले, आणि त्यांनी त्याचे आदरातिथ्य करून, झालेली विलंबाबद्दल त्याला 3 वर मागून घेण्यास सांगितले.

yam nachiketa

तेंव्हा, नचिकेताने, पहिल्या वराने आपल्या वडिलांसाठी शांतीची मागणी केली, दुसऱ्या वराने, यज्ञाविषयी माहिती विचारली, आणि तिसऱ्या वराने त्याने आत्म्याच्या स्वरूपाबद्दल विचारले. यमराजाने पहिले दोन वर तर दिले, पण तिसऱ्या वराबद्दल यमराजाने आधी नचिकेत्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इतर अनेक भौतिक सुखांचे वर देण्याची लालूच दाखविली. अशा प्रकारे यमराज त्याची परिक्षा पाहत होता. पण नचिकेता कुठल्याच प्रलोभनाला भुलला नाही, आणि आत्मज्ञान मिळण्यासाठी आग्रही राहिला. कारण नचिकेत्याला माहित होते की आत्मज्ञान देण्यासाठी यमराजासारखा दुसरा गुरू मिळणे नाही. तेंव्हा मग यमराजाने त्याला जे आत्मज्ञान दिले, ते कठोपनिषदा मध्ये वर्णन केले आहे.  

श्रीहरि!

संकलक- माधव भोपे

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

Devotee- 3 Bhagwan Brahma-भक्तांच्या कथा-3 -भगवान ब्रह्मा

brahma-2

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee- 3 Bhagwan Brahma

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

भगवान ब्रह्मा

 

Devotee-3 Bhagwan Brahma

याआधी आपण श्री गणेश यांची मातृ पितृ भक्ति पाहिली तसेच भगवान शिवांची विष्णुभक्ति पाहिली. यानंतर त्रिदेवांमधील, सृष्टिनिर्मितीचे कार्य करणारे ब्रह्मदेव यांची भक्ति जाणून घेणार आहोत.

श्रीमद् भागवतात, श्री यमराजाने आपल्या दूतांना प्रमुख भागवताचार्यांचे वर्णन करतांना सांगितले, की

  1. भगवान ब्रह्मा, 2. भगवान शंकर, 3. देवर्षि नारद,
  2. सनकादि कुमार, 5. महर्षि कपिल, 6. महाराज मनु,
  3. भक्तराज प्रह्लाद, 8. महाराज जनक, 9. श्रीभीष्मजी,
  4. दैत्यराज बलि, 11. महामुनी शुकदेव आणि मी स्वतः, म्हणजे 12. यमराज,

असे  बारा आचार्य आहेत जे की रहस्यमय दुर्बोध विशुद्ध भागवत धर्माला जाणतात. त्या बारा आचार्यां मध्ये भगवान ब्रह्मा हे प्रथम आचार्य आहेत.

स्वयंभूर्नारदः शम्भूः कुमारः कपिलो मनुः|
प्रह्लादो जनको भीष्मो बलिर्वैयासकिर्वयम||
द्वादशैते विजानीमो धर्मं भागवतं भटाः|
गुह्यं विशुद्धं दुर्बोधं यं ज्ञात्वामृतमश्नुते|| (श्रीमदभागवत श्लोक 6.3.20-21)

 

सृष्टीच्या आरंभी शेषशायी भगवान विष्णूंच्या नाभीतून एक ज्योतिर्मय कमल प्रकट झाले आणि त्या कमळाच्या कर्णिकेवर भगवान ब्रह्मा प्रकट झाले.

ब्रह्मदेवाने हे पाहण्यासाठी, की हे कमल कुठून येते आहे, त्या कमळाच्या नाळेमध्ये, म्हणजे पोकळ दांडीमध्ये प्रवेश केला आणि हजार वर्षपर्यन्त शोधत राहिले. पण त्यांना काहीच पत्ता लागला नाही, तेंव्हा ते निराश होऊन कमळाच्या मुखावर परत आले. त्यावेळी त्यांना ‘तप’ हा शब्द दोनवेळा ऐकायला आला. त्यानुसार ब्रह्मदेव दीर्घ कालपर्यंत तप करीत राहिले. तपाद्वारे त्यांचे अंतःकरण पूर्ण निश्चल झाल्यानंतर त्यांना आपल्या अंतःकरणातच शेषशायी भगवान श्री विष्णूचे दर्शन झाले. ब्रह्मदेवाद्वारे  स्तुति केली गेल्यानंतर, भगवंताने त्यांना चार श्लोकांमध्ये भागवताचा उपदेश केला. तेच मूळ चतुः श्लोकी भागवत होय.brahmadev in lotus

अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम्।
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥१ ॥

श्रीभगवान म्हणतात – सृष्टीपूर्वी फक्त मीच होतो. माझ्या पलीकडे काही नव्हते, खरे-खोटे किंवा त्यापलीकडे. सृष्टी नसतानाही (संहाराच्या वेळी) मी तिथेच राहतो. ही सृष्टीची सर्व रूपे मीच आहे आणि या सृष्टी, परिस्थिती आणि संहारातून जे काही उरले आहे, तेही मीच आहे.

ऋतेऽ र्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि।
तद्विद्यादात्मनो मायां यथाऽऽभासो यथा तमः ॥ २ ॥

माझ्या मूळ तत्वाव्यतिरिक्त जे सत्य दिसते (दिसते) पण आत्म्यात दिसत नाही (दिसत नाही), त्या अज्ञानाला आत्म्याचा भ्रम समजा जो प्रतिबिंब किंवा अंधारासारखा मिथ्या आहे ॥२॥

यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥ ३ ॥

ज्याप्रमाणे पाच महान तत्वे (पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश) जगाच्या सर्व लहान-मोठ्या वस्तूंमध्ये अंतर्भूत असूनही त्यांचा अंतर्भाव नाही, त्याचप्रमाणे मी सर्व गोष्टींमध्ये उपस्थित असूनही, मी सर्वांपासून वेगळा आहे ॥3॥

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्व जिज्ञासुनाऽऽत्मनः।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा ॥ ४ ॥

ज्याला आत्म्याचे सार जाणून घ्यायचे आहे, त्याच्यासाठी एवढेच जाणून घेणे योग्य आहे की अन्वय (सृष्टी) किंवा व्यतिरेक (विनाश) या क्रमाने सर्वत्र आणि सदैव (स्थान आणि काळाच्या पलीकडे) राहणारा घटक तोच आत्मा आहे. – सार.

याप्रकारे ब्रह्मदेवाने साक्षात भगवंतांकडून सृष्टीच्या सुरुवातीला तत्त्वज्ञान प्राप्त केले.. नंतर ब्रह्मदेवाने देवर्षि नारदांनी विचारल्यावरून त्यांना या भागवत तत्त्वाचा उपदेश केला आणि भगवतकृपेने हृदयात स्फुरलेल्या भगवंतांच्या लीलांपैकी मुख्य चोवीस अवतारांची चरित्रे सूत्ररूपाने सांगितली.  देवर्षि नारदांनी ते तत्वज्ञान आणि भगवतचरित्र महर्षि व्यासांना ऐकविले आणि व्यासांनी त्याला श्रीमद् भागवताच्या स्वरूपात अठरा सहस्र श्लोकांच्या स्वरूपात शुकदेव यांना ऐकविले. या क्रमाने श्रीमद् भागवताचा सर्व लोकांत विस्तार झाला.

जेंव्हा जेंव्हा पृथ्वी असुरांच्या अधर्माचरणाने पीडित होते, तेंव्हा तेंव्हा ती देवतांसह भगवान विष्णूंकडे जाऊन आपले गाऱ्हाणे मांडते. त्यावेळी ब्रह्मदेव त्या परम परमेश्वराची प्रार्थना करून जसा त्यांचा आदेश होईल त्याप्रमाणे देवतांना आदेश देतात. अशा प्रकारे भगवंताचे बहुतेक अवतार हे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे होतात आणि त्या त्या अवतारांच्या वेळी ब्रह्मदेव भगवंताच्या लीलांचे दर्शन करण्यासाठी उपस्थित होतात.

जेंव्हा भगवान वामन अवताराने दैत्यराज बळीच्या यज्ञात तीन पावले भूमीच्या दानाचा संकल्प करून घेतला, आणि संबंध पृथ्वी एका पायाने व्यापून आपल्या विराट स्वरूपाला प्रकट करीत दुसरा पाय स्वर्गाकडे नेला, तेंव्हा भगवंताचा तो चरण ब्रह्मलोकापर्यन्त पोंचला. त्यावेळी ब्रह्मदेवाने मोठ्या श्रद्धेने तो चरण धुतला, आणि त्याची पूजा केली. भगवान वामनाच्या त्या चरणाच्या अंगठ्याच्या नखामुळे ब्रह्मांडाचे बाह्य आवरण थोडेसे फाटले आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडातून बाहेर ब्रह्मवारि भगवंताच्या श्रीचरणावर आले. ब्रह्माने भगवंताचे ते चरणोदक, म्हणजेच ‘ब्रह्मद्रव’ आपल्या कमंडलूमध्ये भरले, आणि सदैव ते चरणोदक आपल्या जवळ ठेवू लागले. महाराज भगीरथ यांनी तप केल्यावर त्याच कमंडलूमधील थोडेसे द्रव ब्रह्माने सोडले, ते तीन रूपांमध्ये झाले. ती तीन रूपें म्हणजे, स्वर्गातील मंदाकिनी, पाताळातील भोगावती, आणि पृथ्वीवर गंगा यांच्या रूपाने भगवंताचे तेच चरणोदक साक्षात ब्रह्मद्रव प्रवाहित होत आहे. म्हणूनच गंगा ही विष्णू चरणांपासून निघाली आहे अशी आपली श्रद्धा आहे. vaman and bali

ब्रह्माजी ने स्वतः आपल्या स्थितीचे वर्णन करीत म्हटले आहे, की माझी वाणी कधी असत्याकडे प्रवृत्त होत नाही, माझे मन कधी असत्याकडे जात नाही, माझी इंद्रियें कधी असन्मार्गाकडे झुकत नाहीत, कारण मी हृदयामध्ये अत्यंत उत्कंठेने श्रीहरि चे नाम धारण करतो.

अशा प्रकारे भागवत धर्माच्या प्रथम आचार्य ब्रह्माजी ने सर्वांना हा उपदेश केला आहे की वाणीने कधी असत्य भाषण होऊ नये, मन कुमार्गाला जाऊ नये, इंद्रियें विषयाकडे प्रवृत्त होऊ नयेत, यासाठी एकमात्र उपाय म्हणजे भगवंताचे नाम हृदयात धारण करणे हा आहे.

अशा प्रकारे, भक्तांच्या मालिकेत आपण श्री गणेश, भगवान शिव यांच्यानंतर ब्रह्मदेवांचे स्मरण केले. यानंतरच्या लेखात आपण परम भक्त श्री यमराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यानंतर, सनकादि कुमार, देवर्षि नारद, ब्रह्मर्षि वशिष्ठ, महर्षि अत्रि, महर्षि भृगु यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

श्रीहरि!

संकलक- माधव भोपे

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.