https://goodworld.in A website by Madhav Bhope

संभाषणाची कला

The art of talking
Guest Article by Vd. Sohan Pathak.
 
हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है”*
अदेशकालज्ञमनायतिक्षमं यदप्रियं लाघवकारि चात्मन:|
यच्चाब्रवीत कारणं वर्जित वचो,न तद्वच:
स्यात विषमेव तद्वच:||*
 

पञ्चतन्त्र

अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य शब्दांनी, अप्रिय , अयोग्य, अशुभ (नकारात्मक), कारण नसताना जे बोलले जाते ते बोलणे नसून विषच आहे.
 
आपलं बोलणं हे फार मोठं शस्त्र आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल किंवा समोरच्याचे विचार पटले नाहीत तर हे शस्त्र चुकीच्या पद्धतीने चालवल्या जाते.
 
असं म्हणतात की आपल्या वाणीला भूतकाळाचा शाप आहे. 
म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला प्रतिक्रिया देताना भूतकाळातल्या कटू आठवणी जागृत होतात आणि आपल्या बोलण्यातून नको त्या वेळी व्यक्त होतात.  खरतर त्यावेळेस ते बोलणे योग्य नसतं त्यामुळे जो विषय आपल्याला पटत नाही त्या विषयावर साधक बाधक चर्चा होण्याच्या ऐवजी चर्चेचा विषय दुसरी कडे जातो आणि विनाकारण वाक्युद्ध होण्याची शक्यता असते.
 
काहीजणांना अजून एक गैरसमज असतो की आपलं दुःख, आपल्या वेदना, आपलं असमाधान केवळ बोलल्या मुळेच व्यक्त होऊ शकतेआणि ते वारंवार त्याबाबत बोलत राहतात त्यामुळे कदाचित यामुळे समोरच्या मनातली त्यांच्या दुःखा बद्दलची सहानभूती सुद्धा कमी होऊ शकते. पण बोलणाऱ्या व्यक्तीला हे कळत नाही त्या भूतकाळातल्या भुतांना ते धरून बसलेले असतात.
 
त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट बोलताना निश्चितच विचार करून बोलावे.
 
आयुर्वेदामध्ये शरीर कर्म, मानस कर्म आणि वाक् कर्म असे कर्माचे तीन प्रकार आहेत सांगितले आहेत की बाकीचे कर्म करताना जसे आपण काही नियम पाळणं आवश्यक असतं तसे बोलताना सुद्धा नियम पाळणे आवश्यक आहे. शब्दांची फेक त्यांच्या उच्चाराची पद्धत, शब्दांची निवड त्यावेळेस व्यक्त झालेले हावभाव याची खूप काळजी घेऊन बोलावं कारण तुम्हाला बोलताना या गोष्टी जाणवत नसतात पण थेट समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला भिडण्याची त्याची तीव्रता असते. 
 
यातूनच व्यक्तीसंबंधातले अडथळे, गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता जास्त असते. बोलतांना भविष्यातली चिंता शब्दांनी वारंवार व्यक्त केली तर बऱ्याच वेळा आपल्या मनात त्याच गोष्टी राहतात व पुढे घटनाही त्याच पद्धतीने होतात. नकारात्मक बोलण्याचा समोरच्याच्या वर जितका वाईट परिणाम होतो त्यापेक्षा कैक पटीने त्याचा स्वतःवर वाईट परिणाम होतो.
 
पण याचा अर्थ मौन पाळणे किंवा शब्दात व्यक्त न होणे असा कदापि नाही. निश्चित बोलणं हे महत्त्वाचं आहे फक्त आपण व्यक्त होताना समोरचा अवाक् (अव्यक्त) होऊ नये. आपण काय, कुठे, कसं बोलतो आहोत हे मात्र खूप महत्त्वाचं.
 
पूर्वाभिभाषी, सुमुखः सुशीलः करुणामृदुः॥
 
आयुर्वेदात वाक् कर्म किंवा बोलणे याबाबत खूप छान नियम सांगितले आहेत. 
 
कोणी व्यक्ती भेटली तर आपण स्वतःहून बोलावे शक्यतो आपण सुमुख म्हणजेच आनंदी चेहऱ्याने व्यक्त व्हावे सुशीलता व मृदूता आपल्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा भाग असावा.
आपले वचन पैशुन्य व परुष नसावे. 
 
पैशून्य म्हणजे कोणाची तरी तक्रार त्याच्या परोक्ष करणे, एका व्यक्तीबद्दल वाईट दुसऱ्या व्यक्तीकडे बोलणे. आणि परुष म्हणजे कठोर बोलणे.
 
समाजात काही व्यक्ती या शिस्तप्रिय, काटेकोर असतात त्यांची जीवनाची काही मूल्य असतात परंतु त्यांचा अट्टाहास असतो की त्यांचे जीवनमूल्ये त्यांच्यासोबतच्या व्यक्तीं ने सुद्धा अंगीकारावी.  त्यांचा उद्देश योग्य असू शकतो परंतु त्यासाठी कठोर बोलणे समोरच्याचा अपमान करणे, दुसऱ्यांची जीवन मूल्य चुकीचे ठरवणे हा मार्ग योग्य नाही.  त्यामुळे त्यांच्या, सामाजिक जीवनात, नातेसंबंधात अनेक अडथळे येतात.
 
केवळ चुकीच्या बोलण्यामुळे ते त्यांचे आदर्शत्व घालवून बसतात. दुसर्यांच्या चुका काढणे, स्वतः बद्दलच बोलत राहणे, भिन्न मताचा अनादर, आपल्या देहबोलीत आणि वाणीतून चुकीच्या पद्धतीने अस्वीकार्यता दाखवणे, स्वार्थासाठी खोटे बोलणे, उपायापेक्षा प्रश्न अधिष्ठित जास्त बोलणे, आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना, आर्थिक, सामाजिक स्तर कमी असणाऱ्यांना नेहमी आज्ञार्थ बोलणे हे गैरसमज वाद पसरवणारे घटक आहेत.
 
त्यातूनच जीवनात अनुत्तरीत कठीण व दुःखद प्रसंग निर्माण होऊ शकतात. समोरच्याच्या उत्साह वाढवणारे, आधार देणारे ,कौतुक करणारे, उपाय सूचक, अभिनंदन करणारे, योग्य शब्दात मार्गदर्शन करणारे शब्द आपल्या व समोरच्याचे मानसिक आरोग्य, क्षमता वाढवणारे असतात. म्हणून आपल्या बोलण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
 
वरील  लेख हा, संभाजीनगर येथील प्रथितयश वैद्य सोहन पाठक यांच्या फेसबुकवरून साभार घेतला आहे.  सदरील लेख त्यांच्या फेसबुकवर दि. 14-10.2021 रोजी पोस्ट झालेला होता.
वैद्य सोहन पाठक
श्रद्धा आयुर्वेद चिकित्सालय
तद्विद समुपदेशन केंद्र
व अमृत नाद ध्यानकेंद्र
9822303175
sohanpathak@gmail.com
 
 
 

Go to  Amazon to shop and order for yoga mat or any amazon product, by clicking on the icon.

छोटी रेषा, मोठी रेषा

small line- big line

छोटी रेषा- मोठी रेषा

बऱ्याच वेळी, कुठल्या ना कुठल्या अगदी छोट्याश्या कारणामुळे, मन दुःखी होते, आपल्यासारखे कमनशिबी आपणच, असे वाटू लागते. आपल्याला आपलीच कीव येऊ लागते. त्यासाठी कारण, ज्याला English मध्ये “trigger” म्हणतात, ते, अगदी छोट्यातले छोटे कारण ही पुरेसे होते. अगदी, आपल्याला घरी, रोजच्या वेळी चहा नाही मिळाला, घरातला फॅन बिघडला, आणि मेकॅनिकला फोन करूनही तो वेळेवर आला नाही, आणि त्याच वेळी, सुट्टीचा दिवस असूनही, आपली आवडती मॅच सोडून आपल्याला ते काम करावे लागले, इ. कोणतेही कारण या दुःखी होण्याला पुरेसे होते. आपली कोणालाच पर्वा नाही. आपण किती कष्ट करतो याची कोणाला जाणीव नाही,. इ. इ. एकदा विचारांची गाडी सुरू झाली, आणि तिला जर रोकले नाही, तर ती कुठपर्यंतही भरकटत जाऊ शकते.

ज्या  माणसांना  आयुष्यात सगळ्या सुखसोयी मिळालेल्या असतात, सगळे व्यवस्थित चाललेले असते, अशांना विशेषतः असे प्रसंग खूप येतात. कारण खरे दुःख काय ते कधी पाहण्याचे, अनुभवण्याचे काम पडलेले नसते. खरे पाहिले  तर आपण जे जीवन आज जगतो, ते कुणाचे तरी स्वप्न असू शकते. कल्पना करा. आपण सकाळीच घरातून बायकोशी भांडून, रागारागाने, नाष्टा न करता, कार घेऊन, ऑफिसला निघालो आहोत. रस्त्याने एक जण हातगाडीवर माल भरून, उन्हाचा चटका असतांनाही, विकायला निघालेला आहे. त्याच्याकडे स्वतःचे घर नाही, भाड्याच्या छोट्याश्या जागेत राहतो आहे, नवरा बायको दोघे काम करतात, लहान दोन छोट्याशा मुलांना शेजारणीच्या हवाली करून निघालेले आहेत. तो जो हातगाडीवाला आहे, तो आपल्याकडे बघतांना, आपल्यासारखे होण्याचे स्वप्न बघत नसेल कशावरून? आपण मस्त एसी गाडीत ऑफिसला चाललो आहोत. एक दिवस आपल्यासारखे घर, गाडी इ. असावे हे त्याचे स्वप्न असू शकते.

लहान मुलें कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला दाखवायला आणतात आणि आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरतात. त्यांना वाटत असते, की ही गोष्ट, दुसऱ्याच्या डोळ्याच्या जितक्या जवळ नेऊ, तितकी त्याला चांगली, स्पष्ट दिसेल. पण मग आपण ती गोष्ट, तो कागद, धोड्या अंतरावर धरतो, मग तो कागद किंवा ती गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसू लागते. आयुष्यातही असेच असते. एखाद्या गोष्टीत आपण जितके लिप्त होतो, एकरूप होतो, तितके आपले perspective म्हणजे योग्यपणे जाणून घेण्याची क्षमता कमी होते, आणि आपण त्या बाबतीत स्वतःकडे अलिप्तपणे बघू शकत नाही. जेंव्हा त्या गोष्टीत आणि आपल्यात थोडे अंतर ठेवून पाहण्याची जाण येते, त्यावेळी कुठलीही गोष्ट, म्हणजेच वस्तू, व्यक्ति, परिस्थिती आपल्याला एवढी व्याकुळ नाही करू शकत.

या बाबतीत एक गोष्ट वाचण्यात आली. आपण एखाद्या वेळी क्षुल्लक गोष्टीमुळे दुःखी होतो, अशावेळी ही गोष्ट आठवून बघावी.

एकदा एक राजकुमार आणि त्याचे 5-7 मित्र घोड्यावरून असेच फिरायला निघाले होते. रस्त्याने काही गुजर स्त्रिया दूध, दही, ताक इत्यादीची विक्री करायला निघाल्या होत्या.

राजकुमाराला भगवान श्रीकृष्णासारखे गोपींची छेड काढण्याची लहर आली. त्याने विचार केला यांचे मटके फोडू, आणि नंतर यांना त्याचे पैसे देऊन देऊ! आणि त्याने गमती गमतीत त्या गुजर स्त्रियांचे मटके, दगड मारून, फोडले. त्या स्त्रिया रडू लागल्या.

पण त्यातील एक गुजरी अशी होती, की जिचे मडके फुटले, दूध दही ताक सांडले, तरी ती काहीच बोलली नाही, उलट हसू लागली.  तेंव्हा राजकुमार तिला म्हणाला, तुला काहीच वाटले नाही का? तू रडत का नाहीस? गुजरी म्हणाली, महाराज, माझी कहाणी फार मोठी आहे. मी ताक सांडल्याचा काय शोक करू? राजकुमारने तिला तिची कहाणी सांगण्याविषयी आग्रह केला, तेंव्हा ती सांगू लागली.

मी अमुक एका शहरातील नगरसेठची पत्नी होते, मला एक छोटेसे मूल होते. सेठ धन कमविण्यासाठी दुसऱ्या प्रदेशात दूर गेले होते. त्या नगराच्या राजाची नीयत खराब होती. माझे सुंदर रूप पाहून राजाची दृष्टी माझ्यावर पडली आणि त्याने मला निरोप पाठवला की अमुक दिवशी मला भेटायला ये. तू केंव्हा येशील याचे उत्तर दे. मी त्याला थोडे थांबण्याची विनंती केली, पतीला चिठ्ठी पाठवली आणि त्याला सगळे कळवून लवकर येण्याविषयी सांगितले. पति आला, त्याला सगळा वृत्तान्त सांगितला, मग आम्ही दोघांनी मिळून विचार केला, की काय करावे? पतीने सांगितले, तू राजाला वेळ दे. मी राजाला वेळ देऊन एका निर्जन ठिकाणी बोलावले, पण ही अट घातली की त्याच्या आसपास मैलभर कोणीही नसावे. राजा तयार झाला. आम्ही दोघे पति पत्नी घरून निघालो. मी तलवार घेऊन निघाले. पति त्या जागेपासून जवळच एका पडक्या घरात लपून बसला. राजा आला, तेंव्हा मी मोठी हिम्मत करून, राजाला तलवारीने मारून टाकले, आणि धावत पतीजवळ गेले. पाहते तर तेथे पतीला विषारी सापाने दंश केला होता, आणि तो तिथे मरून पडला होता. मग मी एकटीच तिथून पळाले, कारण सापडले असते, तर मला लोकांनी मारून टाकले असते. मूल माझे, घरीच राहिले.

पुढे पळता पळता जंगल लागले, तिथे डाकू भेटले, त्यांनी मला पकडले. माझे सगळे दागिने ओरबाडून घेतले, आणि मला एका वेश्येच्या घरी नेऊन विकून टाकले. आता मी तिथे राहू लागले. तिकडे आमच्या गावात दुसरा राजा झाला. त्याने माझ्या मुलाचा सांभाळ करून त्याला मोठे केले. तो माझा मुलगा मोठा होऊन तिथेच नोकरी करू लागला. इकडे वेश्यान्च्या संगतीत राहून मीही तेच काम करू लागले. एके दिवशी माझा मुलगा माझ्याकडे आला, आणि रात्रभर राहिला. मला नंतर शंका आली म्हणून सकाळी मी त्याला ओळख विचारली, तेंव्हा त्याने नांव पत्ता सांगितला, तेंव्हा कळाले की हा माझाच मुलगा! मला स्वतःची अत्यंत किळस आली, दुःख झाले, की मी कोण होते आणि कुसंगतीने काय झाले. पंडित लोकांना विचारले की असे पाप झाले, तर काय करावे. त्यांनी सांगितले, चिता पेटव आणि त्या आगीत जाऊन बैस. मनात विचार अला, की चिता पेटवली आणि त्यात जाऊन बसले, तर नंतर अस्थि गंगेत कोण टाकेल? म्हणून गंगा किनाऱ्यावर जाऊन, लाकडे एकत्र करून, चिता रचून त्यावर बसले आणि ती पेटवली. लाकडे जळू लागली. इतक्यात गंगेला पूर आला. आग विझली, मी बेशुद्ध झाले, आणि एका लाकडाच्या ओंडक्यासोबत वाहत वाहत दूर एका गावाच्या किनाऱ्यावर जाऊन पोंचले. त्या गावात गुज्जर लोकांची वस्ती होती.  त्यांनी मला वाचवले, आणि माझ्यावर उपचार केले आणि नंतर त्यांनीच माझा सांभाळ केला. आता या गुज्जर लोकांचे दही दूध ताक विकून आपला उदर निर्वाह करते.!

आता तूच सांग राजा, मटका फुटून ताक सांडले, तर त्याचा काय शोक करू?

हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-

देशान्तरे विधिवशाद गणिकां याता|

पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा

शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||

 

नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|

मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|

सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|

महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||

तसेच आपले न जाणो याआधी किती जन्म झाले आहेत, आणि प्रत्येक जन्मात काय काय दशा झाली आहे.. हे सगळे कितीदा मिळाले आणि कितीदा गेले. यापुढे छोट्याश्या गोष्टींची काय आणि किती चिंता करायची!

 

 

 

 

 

 

 

Go to our Amazon Shop to shop and order for yoga mat or any amazon product, by clicking on the icon.

   यही कथा हिन्दी में 

अब छाछ को सोच कहा कर है!

 

एक राजकुमार था| उसके पाँच-सात मित्र घोड़ों पर घूम रहे थे| वहाँ बहुत-सी गूजर-स्त्रियाँ दूध, छाछ, दही आदि की बिक्री करने को जा रहीं थीं|

 

राजकुमार को भगवान् श्रीकृष्ण की याद आ गयी कि वे दूध-दही लूटा करते थे तो हम भी आज वैसा ही करें| एक तमाशा कर लें, फिर उनको दाम दे देंगे| राजकुमार और उसके साथियों ने उनके मटके फोड़ दिये| गूजरियाँ बेचारी रोने लगीं|

 

उनमें से एक गूजरी ऐसी थी, जिसका मटका फूट गया, छाछ बिखर गयी, फिर भी वह हँस रही थी! राजकुमार ने उससे पूछा कि तू रोयी नहीं, क्या बात है? उसने कहा कि महाराज! मेरी बात बहुत लम्बी है! मैं छाछ गिरने का क्या शोक करूँ? राजकुमार ने उससे कहा कि अपनी बात सुनाओ| वह कहने लगी-

 

मैं अमुक शहर के एक सेठ की पत्नी थी और मेरी गोद में एक बालक था| वे सेठ कमाने के लिये दूसरे देश में चले गये| वहाँ के राजा की नियत खराब थी| मेरी छोटी अवस्था थी और सुन्दर रूप था| राजा ने मेरे पर खराब दृष्टि कर ली और कहा कि अमुक दिन तेरे को आकर मिलना ही पड़ेगा, तुम कब आओगी, जवाब दो| मैंने कहा कि अभी ठहरो| मैंने अपने पति को पत्र भेजा कि जल्दी आओ, मेरे पर ऐसी आफत आयी है| पति आ गया| उससे सारी बात कही और आपस में सलाह की कि क्या किया जाय? सेठ ने कहा तुम राजा को समय दे दो| मैंने राजा के पास समाचार भेज दिया कि आप शहर के बाहर अमुक जगह रात में आ जाओ, पर शर्त यह है कि उस स्थान के मिल भर नजदीक में कोई अन्य व्यक्ति न रहे| राजा ने स्वीकार कर लिया| हम दोनों पति-पत्नी घर से निकल गये कारण कि यहाँ टिक नहीं सकेंगे| मैं रात्रि में वहाँ तलवार लेकर गयी| पति को एक टूटे-फूटे मकान (खँडहर)-में छिपने के लिये कह दिया| जब राजा आया तो मैंने तलवार से उसको मार दिया और भागकर पति के पास गयी| वहाँ जाने पर मैंने पति को मरा हुआ पाया! उसको जहरीले साँप ने काट लिया था| फिर तो मैं अकेली वहाँ से भागी कि अगर पकड़ी गयी तो लोग मेरे को मार देंगे| लड़का पीछे छूट गया|

 

आगे भागते हुए जंगल आ गया तो वहाँ डाकू मिल गये| उन लोगों ने मेरे को पकड़ लिया, मेरे सब गहने छीन लिये और वैश्या के घर ले जाकर बिक्री कर दिया| अब मैं वहाँ रहने लगी| उधर दूसरा राजा बैठा तो उसने मेरे लड़के को पालकर बड़ा किया| मेरा लड़का वहीं राज्य में नौकरी करने लगा| इधर वेश्याओं के संग के प्रभाव से मैं भी वैश्या हो गयी| एक बार वह लड़का मेरे यहाँ आया और रातभर रहा| मेरे को वहम हो गया कि यह कौन है? सुबह होते ही पूछा तो उसने अपना नाम पता बताया, तब पता लगा कि अरे! यह तो मेरा ही बेटा है! मेरे को बड़ी ग्लानि, बड़ा दुःख हुआ कि मैं क्या थी और कुसंग के प्रभाव से क्या हो गयी! पण्डितों से पूछा कि ऐसा पाप किसी से हो जाय तो क्या करे? उन्होंने बताया कि चिता जलाकर आग में बैठ जाय| विचार आया कि चिता में बैठ जाऊँगी तो पीछे से गंगा जी में फूल कौन डालेगा? इसलिये गंगा के किनारे लकड़ियाँ इकट्ठी करके बैठ गयी और आग लगा दी| लकड़ियाँ जलने लगीं| इतने में पीछे से बाढ़ आ गयी| आग बूझ गयी और एक लकड़ी पर बैठ-बैठ एक गाँव-के किनारे पहुँच गयी| उस गाँव में गूजर बसते थे| अब वहाँ उनकी चीज बिक्री करके काम चलाती हूँ| आज छाछ लेकर आयी थी| छाछ गिर गयी तो अब इसकी चिन्ता क्या करूँ?

 

हत्वा नृपं पतिमवेक्ष्य भुजंगदष्टं-

देशान्तरे विधिवशाद गणिकां याता|

पुत्रं प्रति समधिगम्य चिता प्रविष्टा

शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम्||

नृप मार चली अपने पिव पै, पिव भुजंग डस्यो जो गयो मर है|

मग चोर मिले उन लूट लई, पुनि बेच दई गनिका घर है|

सुत सेज रमी, चिता पै चढ़ी, जल खूब बह्यो सरिता तर है|

महाराज कुमार भई गुजरी, अब छाछ को सोच कहा कर है||

 

जीवन में ऐसी घटनाएँ घटी है, क्या-क्या दशा हुई है, अब थोड़े-से नुकसान में क्या चिन्ता करूँ? ऐसी बातें तो होती रहती हैं और बीतती रहती हैं| अब छाछ गिर गयी तो क्या हो गया! हमारे न जाने कितने जन्म हुए हैं और उनमें क्या-क्या दशा हुई है! उनमें कभी बेटा मर गया, कभी पति मर गया, कभी पत्नी मर गयी| कभी धन आया, कभी धन चला गया| ये सब कई बार मिले और कई बार बिछुड़े| हवा चलती है तो कहाँ-कहाँ का फूस आकर इकट्ठा हो जाता है और दूसरे झोंके में अलग हो जाता है| इसमें नयी बात क्या हो गयी! संसार में सब आने-जाने वाले हैं| इनके लिये क्या चिन्ता करें?

 

 

 

 

 

Hanuman Jayanti-हनुमान जन्माचे अभंग

hanuman jayanti

श्री हनुमान जन्माचे अभंग

hanuman

.

देवांगना हातीं आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरीं वेगीं आला ॥२॥
राजा दशरथ सामोरा जाऊनी । अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
पुत्र स्नुषा दोन्हीं देखतां नयनीं । आनंदला मनी म्हणॆ नामा ॥४॥

आनंदोनी म्हणे राया धन्य केलें । इच्छिलें सोहळे पुरवीन ॥१॥
यज्ञाचा आरंभ करी लवलाह्मा । पुसोनी आचार्या वसिष्ठांसी ॥२॥
सर्व ऋषीजन मिळाले सकळ । मंत्रांचा कल्लोळ करिताती ॥३॥
नामा म्हणे शृंगी मुख्यत्वें शोभला । यज्ञ आरंभिला तेणें जेव्हां ॥४॥

आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥
पायस तें पात्र घेऊनियां करीं । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
नामा म्हणे देव येईल पोटासीं । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥

विभाग सत्वर वसिष्ठानें केले । राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥
प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥
आसडोनी पिंड घारीनें पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥
कैकई रुसली तेथें विघ्न झालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें झाली कथा श्रवण करा ॥६॥

ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैस माझे ध्यानीं सावधान ॥४॥
वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥
एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥

 

 

पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥

महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला हे चरण म्हणून गुलाल फुले टाकावीत.

घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥
नवमास होतां झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥
जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥

 

 

 

Adi Shankaracharya & Samarth Ramdas आदि शंकराचार्य आणि समर्थ रामदास

Shankara & Samartha

Adi Shankaracharya and Samartha Ramdas

आदि शंकराचार्य आणि समर्थ रामदास 

 

लेखक: श्री पांडुरंग देशपांडे 

आपल्या देशात संत आणि महापुरुषांची कमी नाही. त्याबाबतीत आपला देश हा खूप भाग्यवान आहे. त्यापैकी काही सत्पुरुष ही ‘अवतार’ या श्रेणीमध्ये येतात. इसवी सनाच्या 8 व्या आणि नवव्या शतकात होऊन गेलेले, आदि शंकराचार्य हे अवतार या श्रेणीत येतात. आपण त्यांना भगवान शंकरांचा अवतार मानतो. अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी येणाऱ्या अनेक शतकांत उपयोगी पडणारे कार्य करून ठेवले आहे. तसेच त्यामानाने अलिकडच्या काळात झालेले दुसरे सत्पुरुष म्हणजे समर्थ रामदास. रामदास हेही मारूतीचा अवतार आहेत असे आपण मानतो.

रामदासांनी त्या काळात अत्यंत आवश्यक असे समाज प्रबोधनाचे आणि शक्ति उपासनेचे  कार्य तर केलेच. पण व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड घालून, सामान्यातल्या सामान्याला परमार्थ सोपा करून सांगितला.

समर्थ रामदासांनी मुख्यतः जरी भक्तिमार्ग प्रशस्त केला असला, तरी त्यांच्यावर आदि शंकराचार्य यांच्या अद्वैत मार्गाचाही खूप प्रभाव होता.

लग्नमंडपात ‘सावधान ‘ शब्द ऐकून पळालेले नारायण काही दिवसांनी पंचवटी,नाशिक येथे आले. तिथे ते सुरुवातीला राम मंदिरात आणि नंतर शंकराचार्यांच्या  आश्रमात राहिले असावेत. .तिथेच  सेवा  करताना त्यांना आचार्यांच्या कार्याचा परिचय झाला असावा.

आचार्यांचे स्तोत्र वाङ्मय व  त्यांचे ‘प्रकरण’ ग्रंथ, विशेषतः हस्तामलक, शुकाष्टक, अद्वैतानुभूती,पंचीकरण, आत्मबोध,शतश्लोकी  वगैरेंचे अध्ययन या मठात प्रारंभी त्यांनी केले असावे. संस्कृत भाषेचा परिचय करून घेऊन गीता,भागवत रामायण, महाभारत,योगवासिष्ठ वगैरे ग्रंथांचे त्यांनी श्रवण,अध्ययन केले असावे. संगीताचे ज्ञानही त्यांनी करून घेतले असावे.  त्यामुळेच रागज्ञान, तालज्ञान इत्यादि विषयी त्यांचे दासबॊधामध्ये उल्लेख आले आहेत.

मठात राहत असताना त्यांनी आचार्यांची स्तोत्रे,भगवदगीता आत्मसात केली.आद्य शंकराचार्यांच्या वैदिक संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या कार्याचाही त्याच्या मनावर पूर्ण ठसा उमटला आहे असे समर्थ साहित्य वाचताना आपणास जाणवते. ‘त्वं तत्वमसि’ या तेथील महावाक्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम आपणाला  दासबोधात दिसतो.

‘समर्थप्रताप ‘ या ग्रंथात श्री गिरिधरस्वामींनी त्या दोघांमधील साम्य दाखविले आहे:

समर्थ अवतार निरोपमा / आचार्य स्वामींची साजे उपमा /

ब्रह्मचर्याश्रमी  परमहंसमहिमा / ब्राह्मण्यरक्षणी अवतारु //

ब्रह्मसूत्र आचार्यदेवी रक्षिले / ब्रह्मआरण्य समर्थदेवे संरक्षिले /

कलयुगीं संन्यासग्रहण आश्चर्ये चालविले/ विचार संन्यास समर्थांचे //

आचार्यस्वामी शंकरमूर्ती / समर्थस्वामी महारूद्रमूर्ती /

आत्मलिंग आत्माराममूर्ती / दक्षिणामूर्ती दक्षिणे  //

अद्वैत आणि भक्ती हे समर्थानी मांडलेले प्रमुख सिद्धांत आहेत.

अद्वैताच्या दृष्टीने पहिले तर मायावाद आणि निर्गुणाचा पुरस्कार या दृष्टीने समर्थ आचार्यांच्या जवळ वाटतात. समर्थांनी आचार्यांचा कर्मसंन्यास स्वीकारलेला नाही आणि ज्ञानापेक्षा भक्तीला त्यांनी अधिक महत्व दिलेले आहे.समर्थांचे मायाब्रह्माचे निरूपण पहिले की आचार्यांचा मायावाद त्यांनी  स्वीकारला आहे याची खात्री पटते. मायेच्या रूपाचा आणि कार्याचा अगोदर छडा लावावा लागतो .

आधी मिथ्या उभारावे  /मग ते वोळखोन सांडावे /

पुढे सत्य ते स्वभावे / अंतरी बाणे // (दास. ७.३.४ )

शंकराचार्यांनीही आपल्या ब्रह्मसूत्रभाष्याचा प्रारंभ अध्यासाच्या (Superimposition) विवेचनाने  केला आहे.

समर्थ पंचवटीतील ज्या शंकरमठात राहत होते तो स्वरूपसंप्रदाय मठ तत्कालीन द्वारिकापीठाच्या अधिकाराखाली होता. त्या द्वारिकापीठाचे आद्य आचार्य हस्तामलक  होते. प्रत्येक मठात

  • नाव व कार्यक्षेत्र ( पश्चिम,पू्र्व ,उत्तर आणि दक्षिण),
  • त्याचे आचार्य,क्षेत्र,देव,देवता,संप्रदाय (स्वरूप,प्रकाश,आनंद व चैतन्यमय),
  • त्या मठाचा वेद(अनुक्रमे साम,ऋक्,अथर्व आणि यजुस्) व
  • महावाक्य (तत्वमसि,प्रज्ञानं ब्रह्म,अयतात्मा ब्रह्म व अहं ब्रह्मास्मि)

आद्य शंकराचार्यांनी अनुशासित करून दिले होते.

आपण द्वारका,पुरी ,बदरिकाश्रम,व शृंगेरी  ही आद्य पीठे जाणतोच. याशिवायही अजून तीन पंथाचे-आम्नायांचे मठ आहेत.

या मठात राहून, शिकूनच समर्थानी आपल्या स्वतंत्र बुद्धीने आपल्या कुळात  चालत असलेल्या रामोपासनेचा तसेच रामाचा दास असलेल्या एकनिष्ठ मारुतीचा  समावेश करून आपला स्वतंत्र नवा ‘स्वरूप’ संप्रदाय उभारला. त्यांनी आचार्यांच्या मठ अनुशासनातील वरील  सर्व संकल्पनांचा उपयोग करून घेतला आहे हे त्यांच्या दासबोधाच्या (आपण सर्व पठण करत असलेल्या) आत्मनिवेदनपर ओव्यांतून व्यक्त होतात…

हनुमंत आमची कुळवल्ली  / राममंडपा वेला गेली /  श्रीरामभजने फळली /रामदास बोले या नावे //

आमुचे कुळी हनुमंत /हनुमंत आमुचे दैवत /तयवीण आमुचा परमार्थ /सिद्धीते ना पावे सर्वथा //

साह्य आम्हांसी हनुमंत /आराध्यदैवत श्री रघुनाथ / श्रीगुरुश्रीराम समर्थ /काय उणे दासासी  //

दाता  एक रघुनंदन / वरकड लंडी देई कोण /तया सोडोन आम्ही जन जे /कोणा प्रति मागावे //

म्हणोनि आम्ही रामदास /श्रीरामचंद्रानी आमुचा विश्वास /कोसळोनि पडो हे आकाश /आणिकाची वास ना पाहू //

स्वरूपसंप्रदाय अयोध्यामठ / जानकीदेवी श्रीरघुनाथ दैवत / मारुती उपासना नेमस्त /वाढविला परमार्थ रामदासी //

नवा अयोध्यामठ,देव रघुनाथ,देवता जानकी ,नेमस्त (ब्रह्मचारी)मारुतीसारखी उपासना आहे… अशा नव्या परमार्थपर ‘स्वरूप ‘संप्रदायाची समर्थानी स्थापना करून लोकप्रबोधन आणि उद्धाराचे मोठे कार्य  दासबोध इत्यादि साहित्यलेखन करून हाती घेतले  आणि ‘ जय जय रघुवीर समर्थ ‘ अशा जयघोषाने  अवघा भारतवर्ष  चेतनामय करून   टाकला !  आचार्य शंकरांसारखेच त्यांनीही देशभर भ्रमण केले आणि नंतर हिंदुस्थानभर हजार मठ उभारले व लोकांना  उपासनामार्गाला लावले.

सनातन धर्माच्या या दोन महान अवतारी सत्पुरुषांना मनोभावे वंदन!

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.

How to behave with elders-ससुराल की नीति

How to behave with elders

एक लड़की विवाह करके ससुराल में आयी|

घर में एक तो उसका पति था, एक सास थी और एक दादी सास थी|

वहाँ आकर उस लड़की ने देखा कि दादी सास का बड़ा अपमान, तिरस्कार हो रहा है!

छोटी सास उसको ठोकर मार देती, गाली दे देती|

यह देखकर उस लड़की को बड़ा बुरा लगा और दया भी आयी! उसने विचार किया कि अगर मैं सास से कह कहूँ कि आप अपनी सास का तिरस्कार मत किया करो तो वह कहेगी कि कल की छोकरी आकर मेरे को उपदेश देती है, गुरु बनती है!

अतः उसने अपनी सास से कुछ नहीं कहा| उसने एक उपाय सोचा| वह रोज काम-धंधा करके दादी सास के पास जाकर बैठ जाती और उसके पैर दबाती|

जब वह वहाँ ज्यादा बैठने लगी तो यह सास को सुहाया नहीं| एक दिन सास ने उससे पूछा कि ‘बहु! वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की ने कहा कि ‘बोलो, काम बताओ!’ सास बोली कि ‘काम क्या बतायें, तू वहाँ क्यों जा बैठी?’ लड़की बोली कि ‘मेरे पिता जी ने कहा था कि जवान लड़कों के साथ तो कभी बैठना ही नहीं, जवान लड़कियों के साथ भी कभी मत बैठना; जो घर में बड़े-बूढ़े हों, उनके पास बैठना, उनसे शिक्षा लेना| हमारे घर में सबसे बूढ़ी ये ही हैं, और किसके पास बैठूँ?

मेरे पिताजी ने कहा था कि वहाँ हमारे घर की रिवाज नहीं चलेगी, वहाँ तो तेरे ससुराल की रिवाज चलेगी| मेरे को यहाँ की रिवाज सीखनी है, इसलिये मैं उनसे पूछती हूँ कि मेरी सास आपकी सेवा कैसे करती है?

’ सास ने पूछा कि ‘बुढ़िया ने क्या कहा?’ वह बोली कि ‘दादी जी कहती हैं कि यह मेरे को ठोकर नहीं मारे, गाली नहीं दे तो मैं सेवा ही मान लूँ!’

सास बोली कि ‘क्या तू भी ऐसा ही करेगी?’ वह बोली कि ‘मैं ऐसा नहीं कहती हूँ, मेरे पिता जी ने कहा कि बड़ों से ससुराल की रीति सीखना!’


सास डरने लग गयी कि मैं अपनी सास के साथ जो बर्ताव करुँगी, वही बर्ताव मेरे साथ होने लग जायगा!

एक जगह कोने में ठीकरी इकट्ठी पड़ी थीं|     सास ने पूछा-‘बहू! ये ठीकरी क्यों क्यों इकट्ठी की हैं?’
लड़की ने कहा-‘आप दादी  जी को ठीकरी में भोजन दिया करती हो, इसलिये मैंने पहले ही जमा कर ली|’


‘तू मेरे को ठीकरी में भोजन करायेगी क्या?’


‘मेरे पिता जी ने कहा कि तेरे वहाँ की रीति चलेगी|’


‘यह रीति थोड़े ही है!’


‘तो आप फिर आप ठीकरी मैं क्यों देती हो?’


‘थाली कौन माँजे?’


‘थाली तो मैं माँज दूँगी|’


‘तो तू थाली में दिया कर, ठीकरी उठाकर बाहर फेंक|’

अब बूढ़ी माँजी को थाली में भोजन मिलने लगा|

सबको भोजन देने के बाद जो बाकी बचे, वह खिचड़ी की खुरचन, कंकड़ वाली दाल माँ जी को दी जाती थी| लड़की उसको हाथ में लाकर देखने लगी|

सास ने पूछा-‘बहू! क्या देखती हो?’


‘मैं देखती हूँ कि बड़ों को भोजन कैसा दिया जाय|’


‘ऐसा भोजन देने की कोई रीति थोड़े ही है!’


‘तो फिर आप ऐसा भोजन क्यों देती हो?’


‘पहले भोजन कौन दे?’


‘आप आज्ञा दो तो मैं दे दूँगी|’


‘तो तू पहले भोजन दे दिया कर|’


‘अच्छी बात है!’


अब बूढ़ी माँ जी को बढ़िया भोजन मिलने लगा| रसोई बनते ही वह लड़की ताजी खिचड़ी, ताजा फुलका, दाल-साग ले जाकर माँ जी को दे देती| माँ जी तो मन-ही-मन आशीर्वाद देने लगी|

माँ जी दिनभर एक खटिया में पड़ी रहती| खटिया टूटी हुई थी| उसमें से बन्दनवार की तरह मूँज नीचे लटकती थी| लड़की उस खटिया को देख रही थी|

सास बोली कि ‘क्या देखती हो?’
‘देखती हूँ कि बड़ों को खाट कैसे दी जाय|’
‘ऐसी खाट थोड़े ही दी जाती है! यह तो टूट जाने से ऐसी हो गयी|’
‘तो दूसरी क्यों नही बिछातीं?’
‘तू बिछा दे दूसरी|’
‘आप आज्ञा दो तो दूसरी खाट बिछा दूँ!’


अब माँ जी के लिए निवार की खाट लाकर बिछा दी गयी|

एक दिन कपड़े धोते समय वह लड़की माँ जी के कपड़े देखने लगी| कपड़े छलनी हो रखे थे|

सास ने पूछा कि ‘क्या देखती हो?’


‘देखती हूँ कि बूढों को कपड़ा कैसे दिया जाय|’


‘फिर वही बात, कपड़ा ऐसा थोड़े ही दिया जाता है? यह तो पुराना होने पर ऐसा हो जाता है|’


‘फिर वही कपड़ा रहने दें क्या?’
‘तू बदल दे|’


अब लड़की ने माँ जी का कपड़ा चादर, बिछौना आदि सब बदल दिया| उसकी चतुराई से बूढ़ी माँ जी का जीवन सुधर गया! अगर वह लड़की सास को कोरा उपदेश देती तो क्या वह उसकी बात मान लेती? बातों का असर नहीं पड़ता, आचरण का असर पड़ता है| 

लोकां सांगे ब्रह्मज्ञान -5

loka sange brahmadnyan

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (५)

मार्च एंड झाल्यानंतर महिन्याभरातच माझी बदली पुन्हा महाराष्ट्रात झाली. रीतसर निरोप समारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिनी ट्रक मध्ये सामान भरून निघायचे ठरले. मात्र दुसऱ्या दिवशी मिनी ट्रक सकाळ ऐवजी संध्याकाळी आला आणि सामान भरून निघायला रात्र झाली.

अंधाऱ्या रात्री निबीड अरण्यातून सुनसान, निर्मनुष्य रस्त्याने आमचा ट्रक महाराष्ट्राच्या दिशेने निघाला होता. ट्रकच्या केबिन मध्ये ड्रायव्हर शेजारील दुहेरी सीटवर मी पत्नी व मुलांसह बसलो होतो. भोवतालच्या गडद काळोखातून मार्ग काढीत ट्रक धीम्या गतीने पुढे चालला होता. त्याच्या हेड लाईटच्या प्रकाशात रस्ता ओलांडणारे साप, ससे, मोर, हरीण, कोल्हे असे वनचर प्राणी पाहून आपण थिएटर मध्ये बसून “जंगल बुक”, “लॉयन किंग” किंवा “नार्निया” सारखा चित्रपट “थ्री-डी” मध्ये पाहतो आहोत, असा भास होत होता.

एका जीवघेण्या वळणावर अचानक ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबल्यामुळे कर्कश आवाज करीत ट्रक थांबला. झाडाच्या फांद्या आडव्या टाकून कुणीतरी जाणून बुजून रस्ता बंद केलेला होता. हा वाटमारीचा तर प्रकार नाही ना, अशी शंका येऊन सावधपणे कानोसा घेत आम्ही गाडीतच स्तब्ध बसून राहिलो.

थोडा वेळ असाच भयाण, रहस्यमय शांततेत गेला. मग रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावरील गर्द झाडीत जराशी कुजबुज व हालचाल जाणवली. मध्येच एखादा टॉर्च क्षणभर चमकून लगेच विझायचा. एखाद्या दबा धरून बसलेल्या हिंस्त्र वाघाच्या चमकणाऱ्या डोळ्यां सारखाच तो लुकलुकणारा प्रकाश भासायचा.

झाडीतून कुणीतरी खुणेची कर्णकटू शिटी वाजविली आणि गलका करीत हातात लाठी आणि टॉर्च घेतलेल्या पंधरावीस जणांनी खालचा उतार चढून रस्त्यावर येत आमच्या ट्रकला वेढा घातला. त्यातील एक जणाने टॉर्चच्या प्रकाशात ट्रकची नंबर प्लेट पाहिली आणि “हाच तो ट्रक आहे !” असे तेलगू भाषेत कुणालातरी ओरडून सांगितले. लगेच रस्त्यावरील झाडाचा अडथळा बाजूला करून दोन मोठ्या व्हॅन आमच्या ट्रक समोर येऊन थांबल्या. एखाद्या कुख्यात डाकूच्या टोळीला पोलिसांनी चारी बाजूंनी घेरावं तसं चित्रपटातल्या सारखं ते दृश्य होतं.

ते टॉर्चधारी, फॉरेस्ट खात्याच्या फ्लाईंग स्क्वाडचे लोक होते. सागवानाने भरलेला एक ट्रक उतनुरहून महाराष्ट्राकडे निघाला आहे अशी गुप्त खबर त्यांना मिळाली होती. मागच्या बाजूने आत चढून त्यांनी ट्रकची तपासणी सुरू केली. आतील घरगुती फर्निचर पाहून त्यांचा प्रचंड विरस झाला. “त्या” दहा सागफळ्या पाहून त्यांचे डोळे आनंदाने चकाकले. पण त्यावरील फॉरेस्ट विभागाचा शिक्का पाहताच पुन्हा एकदा ते निराश झाले. एव्हाना माझी ट्रान्स्फर ऑर्डर व रीलिव्हिंग लेटर मी त्यांच्या ऑफिसरला दाखविले होते.

मग अखेरचा प्रयत्न म्हणून,

“कशावरून हे फर्निचर व या साग फळ्या चोरीच्या नाहीत ? तुमच्या जवळ हे लाकूड खरेदी केल्याची सरकारी पावती आहे काय ?” असा बिनतोड कायदेशीर प्रश्न विचारून मला कोंडीत पकडण्याचा त्यांच्या ऑफिसरने प्रयत्न केला.

सर्व फर्निचर तसेच साग फळ्यांचा उल्लेख असलेली सूर्यकुमार साहेबांनी दिलेली फॉरेस्ट विभागाची दंडाची पावती आठवणीने खिशात ठेवली होतीच. ती त्या ऑफिसरला दाखवताच..

“कशावरून ही पावती खरी आहे ? आजकाल अशा बनावट पावत्यांचा सुळसुळाट झाला आहे ? या पावती वरील सही कुणाची आहे ?”

असा निष्फळ युक्तिवाद करीत मला चाचपण्याचा त्याने शेवटचा प्रयत्न केला.

“फॉरेस्ट रेंजर श्री.सूर्यकुमार साहेबांची ही सही आहे. तुमच्या जवळ असलेल्या वायरलेस सेट वरून त्यांच्याशी संपर्क साधून पावतीच्या खरेपणाबद्दल खात्री करून घेऊ शकता..!”

माझ्या ह्या उत्तराने देखील त्या ऑफिसरचे पुरेपूर समाधान झालेले दिसत नव्हते.

“सूर्यकुमार साहेब आज इथेच आहेत. बाजूच्या जंगलातील टेन्ट मध्ये बसले आहेत. त्यांना ही पावती दाखवून येतो..”

असे म्हणून ती पावती घेऊन तो ऑफिसर बाजूच्या जंगलात उतरत काळोखात दिसेनासा झाला.

आज आपलं काही खरं नाही, हे फॉरेस्ट वाले आपल्याला लवकर सोडणार नाहीत असा विचार करून आमच्या ड्रायव्हरने आपला सामानाचा ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला आणि खाली उतरून एका फॉरेस्ट गार्डशी तेलगू भाषेत गप्पा मारत निवांतपणे बिडी ओढू लागला.

माझा लहान मुलगा या साऱ्या प्रकाराने खूप घाबरला होता. सुनसान दाट जंगल, सर्वत्र असलेला गर्द भीषण काळोख, भुतासारखे भासणारे उंचच उंच स्तब्ध साग वृक्ष.. अशा वातावरणात आमच्या ट्रकचे तसेच फॉरेस्टच्या दोन्ही व्हॅनचे हेड लाइट्स अजूनही ऑनच होते. भरीस भर म्हणून ट्रकला वेढा घातलेल्या पंधरा वीस गार्ड्सच्या हातातील प्रखर झोताचे टॉर्चही सुरूच होते. एखाद्या चोराकडे किंवा पिंजऱ्यातील हिंस्त्र जनावराकडे पहावे तसे ते खाली उभे राहून आमच्याकडे बघत होते.

“पप्पा, हे आपल्याला मारून तर टाकणार नाही ना ?”

माझा पाच वर्षाचा लहान मुलगा मला भीतीने बिलगत विचारत होता. कदाचित टीव्हीवर पाहिलेल्या सिनेमातील अशाच प्रकारची डाकुंची दृश्ये त्याला आठवत असावीत. खरं तर त्याला खूप जोराची लघवी लागली होती. पण अशा धोकादायक जागी लघवीसाठी खाली उतरण्यास तो तयार नव्हता.

रात्रीचे दोन वाजले होते. आम्हा तिघांनाही खूप झोप येत होती. जांभया देत अवती भवतीच्या मिट्ट अंधाराकडे पहात आम्ही जागे राहण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. रातकिड्यांची किरकिर, टिटवी सारख्या पक्ष्यांचे ओरडणे आणि अधून मधून ऐकू येणारी झाडांच्या पानांची सळसळ व फॉरेस्ट गार्ड्सची हलक्या आवाजातील कुजबुज..! सारंच खूप भयाण, कंटाळवाणं वाटत होतं. वेळ जाता जात नव्हता..

सूर्यकुमार साहेब जंगलातील त्यांच्या टेन्टच्या बाहेर येणार नाहीत याबद्दल मला पक्की खात्री होती. तशीही पुन्हा त्यांचे तोंड पाहण्याची मलाही अजिबातच इच्छा नव्हती.

बऱ्याच वेळाने जंगलात गेलेला तो अधिकारी परत येताना दिसला.

“रेंजर साब आपसे खुद ही मिलना चाहते है ! प्लीज, आप नीचे आईये.. !!”

जवळ येऊन नम्र भाषेत तो विनंती करता झाला.

“पप्पा, खाली उतरू नका..” असं ओरडून माझा शर्ट घट्ट पकडीत मुलगा विनवित असताना त्याचाकडे लक्ष न देता मी खाली उतरलो. ऑफिसरने माझ्यासाठी खुर्ची मागवली. त्यावर बसून मी रेंजर साहेबांची वाट पाहू लागलो.

थोड्या वेळाने अचानक माझ्या खुर्चीमागून येऊन समोर प्रगट होत आपल्या चिरपरिचित हसऱ्या मुद्रेने “जय हिंद, सर !” म्हणत सूर्यकुमार साहेबांनी मला आदराने कडक सल्युट ठोकला. त्यानंतर लगेच माझा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला आणि बळजबरीने मला जवळ खेचत घट्ट मिठी मारून म्हणाले..

“ओहो.. व्हॉट अ सरप्राइज ! सर, कितने दिनों के बाद मिल रहे है हम.. ! रिअली अनबिलिव्हेबल.. !!”

ट्रक मध्ये बसलेल्या माझ्या पत्नीकडे लक्ष जाताच ट्रकच्या दरवाजा जवळ जात हात हलवित म्हणाले..

“हॅलो भाभीजी, कैसे है आप ? फायनली, अपने गाँव वापस जा रहे हो ? आपका बनाया टेस्टी मसाला डोसा अभी भी याद है.. फिरसे खाने के लिए एक दिन जरूर महाराष्ट्रा में आपके घर आऊंगा.. !! विश यू हॅपी जर्नी, मॅडम..!”

त्यानंतर आईला बिलगून त्यांच्याकडे संशय मिश्रित कुतूहलाने पाहणाऱ्या लहानग्या अनिश कडे पाहून म्हणाले..

“हाय प्रिन्स ! डरो मत.. हम तुम्हारे पापा के दोस्त है..”

त्यानंतर खिशातून मूठभर चॉकलेट्स काढून ती अनिशच्या हातात ठेवत म्हणाले..

“हॅव धिस..! इस जंगल में तुम्हे बस इतना ही दे सकता हूं मैं..!”

रेंजर साहेबांच्या मैत्रीच्या या खोट्या प्रदर्शनाला मी आता भुलणार नव्हतो. माझ्या डोळ्यांतील तिरस्कृत भाव आणि कोरड्या प्रतिसादा वरून त्यांच्या ही ते सहज लक्षात आलं असावं. त्याकडे दुर्लक्ष करीत..

“दिन में निकलने की बजाए, आप इतनी रात में क्यों निकले ? वो भी फॅमिली के साथ.. और ऐसे ट्रक मे बैठ कर..! आपका बँक, कार का पैसा नही देता क्या ? अरे भाई, ये खतरनाक जंगल है.. चिता, शेर, भालू कभी भी अटॅक कर सकते है..! और हमारे डिपार्टमेंट को टीक स्मगलिंग का डाउट भी आता है ऐसे रात में चलने वाले व्हेईकल्स पर.. !!”

असं म्हणून त्यांनी हाताखालच्या अधिकाऱ्यांशी कसली तरी महत्त्वाची गंभीर चर्चा केली. त्यानंतर आमच्या ट्रकच्या ड्रायव्हरला बोलावून घेत त्याला तेलगू भाषेत काही तरी समजावून सांगितलं. मग माझ्याकडे वळून ते म्हणाले..

“आज हमारे फॉरेस्ट डिपार्टमेंट के सेंट्रल अँटी टीक स्मगलिंग फोर्स का annual इन्स्पेक्शन है.. यहाँ से “निर्मल-भैंसा” रास्ते तक जगह जगह पर डिटेल चेकिंग हो रही है.. बेवजह इस रास्ते पर आपको बहुत तकलीफ होगी.. रुकना भी पडेगा हर जगह.. यहाँ से महाराष्ट्र बॉर्डर तक जाने वाला एक कच्चा शॉर्ट कट है, जहाँ पर आज की चेकिंग नही है.. वहां से ये मिनी ट्रक आसानीसे निकल सकता है.. आप लोग हमारी सफारी जीप में पक्के रास्ते से स्टेट बॉर्डर तक जाइए.. ट्रक के साथ हमारा एक ऑफिसर रहेगा.. प्लीज, इन्कार मत करना..! आप को सच्चे दिल से मदत करना चाहता हूं.. !!”

दोन्ही हात जोडत सूर्यकुमार विनवणी करीत होते.

थोड्याशा अनिच्छेनेच आम्ही फॉरेस्टच्या जीप मध्ये बसलो. मी अद्याप रेंजर साहेबांशी एक शब्दही बोललो नव्हतो. आम्ही निघतानाही त्यांच्याकडे पहाणं मी हेतुपुरस्सरपणे टाळलं. टेन्ट मधून काही ब्रेड व बिस्कीटांचे पुडे मागवून ते आम्हाला देण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरकडे दिले. जीप बरीच पुढे गेल्यावर मी सहज मागे वळून पाहिलं.. रेंजर साहेब अजूनही रस्त्यावर उभे राहून आमच्याकडेच पहात हात हलवून निरोप देत होते.

फॉरेस्टच्या जीपमधून म्हैसा (Bhainsa) जवळील महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून नांदेड जिल्ह्यातील भोकर पर्यंत पोहोचलो. थोड्याच वेळात आमचा मिनी ट्रक ही तिथे येऊन पोहोचला. ट्रक सोबत आलेल्या आंध्र प्रदेशच्या फॉरेस्ट ऑफिसर सोबत तिथल्याच एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता घेतला. आमचा निरोप घेताना त्या ऑफिसरने वायरलेस सेट वरून सूर्यकुमार साहेबांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

आत्ता नुकत्याच केलेल्या मदतीबद्दल “थॅन्क्स!” असं म्हणून त्यांचे आभार मानले तेंव्हा उत्तरा दाखल बोलताना ते म्हणाले..

“सर, आय नो, मुझ पर बहुत नाराज हो आप.. ! न जाने हमारे मुल्क से कैसी कैसी भली बुरी यादें साथ ले कर जा रहे हो…

आप मेरे बंगले पर आकर गए.. आपको मेरे प्रायव्हेट हॉल मे जाते हुए मैने देख लिया था, ईसलिये उस दिन मै बाहर से ही वापस लौट गया था..

आपने मेरी ऐशो-आराम भरी, शौकिया पसंद, सुखभोगी, विलासितापूर्ण जिंदगी तो देख ली.. मेरी कथनी और करनी में अंतर भी देख लिया.. मै ऐसा ही हूं, मुझे लक्झरी लाईफ जीने की आदत सी पड़ गई है..

आपको अभी दुनिया का ठीक से तजुर्बा नही है.. दुनिया ऐसी ही है.. जो दिखती है वैसी कभी नही होती..

फिर भी, आपसे कहना चाहूंगा की जहां तक हो सके ईमानदारीसे ही जिंदगी बिताओ.. बेईमानी की कमाई से इकठ्ठा की हुई इन चीजों से सुख और आराम तो अवश्य मिलता है, लेकिन शांती और समाधान कभी नही मिल सकता..

मैने आपको अपरिग्रह का जो रास्ता बताया था, वो अपनाना बहुत कठिन तो है, लेकिन सच्चा सुख उसी रास्ते पर चलनेसे मिलता है.. मुझे अफसोस है के मै खुद इस रास्ते पर चल न सका..

आप की फॅमिली बहुत खुबसुरत है, आप हमेशा खुश रहे, सुखी और समाधानी रहे, यहीं कामना करता हूं.. भाभीजी को प्रणाम !”

एवढं बोलून सूर्यकुमार साहेबांनी वायरलेस कट केला. आज त्यांच्याशी एवढं कडवट, त्रयस्थपणे वागल्याबद्दल मला चुटपुट लागून राहिली होती.

महाराष्ट्रातील रुक्ष रस्त्यांवरून भोकर, वसमत, औंढा, जिंतूर, मंठा मार्गे आणखी आठ तासांचा कंटाळवाणा प्रवास करून दुपारी उशिरा जालन्याला पोहोचलो. उतनुरचे ते हिरव्यागार जंगलाचे, भोळ्या आदिवासींचे, निर्दयी पोलिसांचे, क्रूर नक्षलवाद्यांचे, नवनवीन साहसी, रोमांचक अनुभवांचे दिवस आता सरले होते. निरर्थक इर्षा, द्वेष, स्पर्धा, चढाओढ, लाचारी, चमचेगिरी यांनी भरलेल्या स्वार्थी शहरी दुनियेत आपण पुन्हा प्रवेश करीत आहोत असेच प्रवास करताना जाणवत होते.

… आज इतक्या वर्षांनंतरही उतनुरच्या सागवानी रॉकिंग चेअर बसून झुलत झुलत कधी जैन तत्वे, गीतेची वचने, गांधींचे विचार, बुद्धांची प्रवचने वाचतो आणि त्यात “अपरिग्रह” शब्दाचा उल्लेख येतो तेंव्हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर सूर्यकुमार साहेबांचा रुबाबदार हसरा चेहरा, त्यांनी माझ्या घरी दिलेलं मोटिव्हेशनल स्पीच आणि त्यांचा तो आलिशान दिवाणखाना आठवतो.

(समाप्त)

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

3.*लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3 

4..लोकां सांगे ब्रह्मज्ञान-4

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या या  कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, 5 भागांची ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित केली आहे.

amazon logo
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.