https://goodworld.in A website by Madhav Bhope

चातुर्मासाचे महत्त्व importance-of-chaturmas

chaturmas-2025

importance of chaturmas

चातुर्मासाचे महत्त्व: पावसाळ्यातील आरोग्य, आध्यात्मिकता आणि संस्कृतीचा संगम

अतिशय पुरातन आणि समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे आपल्या येथील सर्व चाली  रीती, सण, उत्सव, हे निसर्गचक्राशी घट्टपणे जोडले गेलेले आहेत. भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे चार महिने नियमितपणे (जरी गेल्या काही वर्षात अनियमित झाला असला तरी) पाऊस- ज्याला आपण मान्सून म्हणतो, तो  पडणारा आपला देश आहे.

महाराष्ट्राला तर गेल्या ७०० वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीची समृद्ध परंपरा लाभली आहे.

vari

आणि आषाढी एकादशीपासूनच सुरू होतो-‘चातुर्मास’.

summer

४ महिने उन्हाने तापलेल्या जमिनीला थंड करण्यासाठी नैऋत्य मोसमी वारे घेऊन येतात, ‘पावसाळा’. पावसाळा हा जमिनीला उपजाऊ बनवून, आपले भरण पोषण करणारे धान्य, फळे, भाजीपाला उगवून तसेच वर्षभराची पाण्याची, भू-जलाची बेगमी आणि पुनर्भरण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा काळ. धरित्रीचे ओसाड, शुष्क रूप बदलून, तिला सुखद शीतल हिरवे रूप प्रदान करणारा काळ.

first rain

पण असे असले, तरी, या काळाचे काही तोटे ही असतात. मनुष्याचे आरोग्य, त्याच्या शरीरातील पाचक अग्नी हा खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याशी जोडलेला असतो. पावसाळ्यात सूर्यदर्शन अभावानेच होते. अर्थात ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असते, किंवा मराठवाडा, विदर्भातील काही भाग, इत्यादि त्यांचा अपवाद सोडून द्या. तर सूर्याच्या अभावामुळे मनुष्यप्राण्याच्या पोटातील अग्नि सुद्धा मंद होतो आणि पाचनक्रिया मंदावते.

नद्यांना पूर आल्याने, रस्ते चिखलमय झाल्यामुळे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे दुस्तर होते.

flooded river

जलाशय अशुद्ध होतात. पालेभाज्या, ज्या अगदी जमिनीलगत उगवतात, त्यां चिखलामुळे आणि मातीतील जंतूंमुळे खाण्या योग्य राहत नाहीत आणि त्या खाल्ल्या तर रोगांचा प्रादुर्भाव होणे अटळ असते. शरीरात वाताचा प्रभाव बळावतो.

या सर्व बाहेरील बदलांचा दुष्परिणाम होऊ नये, आणि या चार महिन्यांचा सदुपयोग व्हावा, या दृष्टीने चातुर्मासात संयमित आणि व्रतस्थ राहणे, ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी रूढ केली. आणि कुठल्याही गोष्टीला धर्माशी जोडल्यानंतर सर्व सामान्यांकडून तिचे पालन होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या गोष्टी धर्माशी, विविध व्रतांशी जोडल्या गेल्या.

या दृष्टीने मग खालील नियम अस्तित्वात आले-

  1. चातुर्मासात वर्ज्य गोष्टी- prohibited vegetables चातुर्मासात कांदे, लसूण, वांगे, इत्यादि पदार्थ जे की वातुळ, म्हणजे शरीरात वात वाढविणारे आहेत, ते खाणे निषिद्ध मानले गेले. बऱ्याच लोकांचे म्हणणे असते, की कांदे, लसूण आरोग्याला खूप चांगले असतात, आणि म्हणून त्यांचे सेवन नेहमी केले पाहिजे. वांगेही शरीराला चांगले असतात, म्हणून तेही खाल्ले पाहिजेत. पण आयुर्वेदाचा दृष्टिकोण असा आहे, की प्रत्येक पदार्थ हा ऋतू, काळ बघूनच सेवन केला पाहिजे. आणि कांदे, लसूण इत्यादि केवळ औषधी स्वरूपात आणि तितक्याच प्रमाणात सेवन केले पाहिजेत. त्या पदार्थांचे जसे गुण आहेत तसेच दोष ही आहेत. कांदा आणि लसूण खाल्ल्यावर माणसाचे मन स्थिर राहू शकत नाही, विचलित होते, त्यात कामवासना वाढीस लागते, हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि काम वासना वाढू देण्यास हा काळ अनुकूल मानलेला नाही. तसेच याच्या सेवनाने शरीरातील वात वाढीस लागतो आणि विकृत होतो. तीच गोष्ट वांगे इत्यादि गोष्टींची आहे. त्यामुळे या काळात वरील पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत. तसेच फुलकोबी, पत्ताकोबी, इत्यादि सुद्धा टाळायला सांगितले आहेत. कारण या भाज्यांमध्येही आळ्या, सूक्ष्म किडे इत्यादि या दिवसांत होण्याची खूप जास्त शक्यता असते.  तसेच या काळात हिरव्या पालेभाज्या, मुळा, गाजर इत्यादींचे  सेवन ही वर्जित सांगितले आहे. कारण हिरव्या पालेभाज्या किंवा मुळा, गाजर इत्यादि जमिनीच्या अगदी जवळ असतात( मुळा गाजर तर जमिनीतच असतात). शेतात पावसाळ्यामुळे चिखल झालेला असतो, आणि त्यामुळे पालेभाज्यांवर चिखल, माती, आणि सूक्ष्म किडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात या भाज्यांचे सेवन वर्ज्य सांगितले आहे.
  2. वर्ज्य समारंभ -या काळात शुभ कार्यांचे मुहूर्तही नसतात. भारतातील जनता मुख्यतः कृषिप्रधान असल्याने या काळात शेतकरी एकतर शेतीच्या कामात व्यस्त असतो. आणि लग्न, मुंज, यज्ञ याग इत्यादि कार्यात समाजातील लोकांचे एकत्र येणे अपेक्षित असते, जे की पावसाळ्यामुळे अवघड असते. या कारणामुळे या काळात वरील कार्यांचे मुहूर्त नसावेत. अर्थात बदलत्या काळानुसार परिस्थिती बदललेली आहे, आणि आजकाल काही पंचांगकर्त्यांनी सुद्धा बदलत्या काळानुसार वरील काळांसाठी आपत्कालीन मुहूर्त द्यायला सुरूवात केली आहे.  
  3. उपवास- या काळात पाचक अग्नि कमी झाल्यामुळे, आहार हलका आणि बेताचाच घेणे योग्य असते आणि त्यातही मधून मधून पोटाला विश्रांती देणेही आवश्यक असते. याच दृष्टीने या चार महिन्यांत अनेक उपवास आणि व्रतें आपल्या संस्कृतीत योजली आहेत. त्यांचा योग्य तो अर्थ घेऊन खऱ्या अर्थाने उपवास केले, तर त्याचा फायदा नक्कीच शरीराला होतो आणि पावसाळ्याच्या मंद आणि कुंद् वातावरणात जठराग्निचे रक्षण होते. अन्यथा उपवासाच्या दिवशी विविध जड पदार्थ, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खाल्ले गेले, तर उपवासाचे फायदे तर दूर राहिले, पण तोटे मात्र निश्चित संभवतात. मग त्यापेक्षा उपवास न केलेला बरा, असे म्हणायची वेळ येते.

असो.

प्रतीकरूप समजावून घेणे आवश्यक

आता या चातुर्मासाविषयी आपल्या परंपरेत, विविध पुराणांत इत्यादि, काय सांगितले आहे, ते थोडक्यात बघू. या सर्व गोष्टींचे प्रतीकरूप समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, काय, पुराणातल्या गप्पा, असे म्हणून त्यांना झिडकारणे सोपे आहे, पण समजदारीचे नाही.    

चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय.  जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात. हिंदू धर्मात ही या काळात संन्याशी एकाच गावात थांबतात. अन्यथा संन्याशांनी ३ दिवसांच्या वर एका जागी थांबू नये असा नियम असतो.

चातुर्मास कालावधी

bhagvan vishnu

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मास सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर त्याच्या आसपास, कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस ‘प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे.. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे. या काळात जगाचा कारभार हा भगवान शिव बघतात अशी धारणा आहे. हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.

पौराणिक कथा

 या संदर्भात ब्रह्मांडपुराणात सूर्यवंशातील  मांधाता नावाच्या चक्रवर्ती सम्राटाची कथा सांगितली जाते. त्या राजाच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या.

king

त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. तेंव्हा राजा आपल्या सैन्यासह वनात गेला, आणि अनेक ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या. तिथे त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले  अंगिर ऋषी दिसले.

rishi

राजाने त्यांना प्रणाम करून आपले आणि आपल्या प्रजेचे दुःख सांगितले. त्यावर मुनीने त्यांना पद्मा एकादशीचे (म्हणजेच देवशयनी एकादशी) व्रत सांगितले, आणि आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह  या एकादशीचे व्रत करायला सांगितले. राजाने आणि प्रजेने त्याप्रमाणे  त्या सर्वांनी असे व्रत सुरू करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. अशी कथा ब्रह्मांडपुराणात सांगितली आहे.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –

वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः

व्रतेन चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।

अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.

या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.

मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.[६]

परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.

चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

चातुर्मासातील व्रते 

सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात.  पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.

वर्ज्य

१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०]

२. मंचकावर शयन

३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन

४. परान्न

५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य

६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे. अजूनही बरेच लोक चातुर्मासात किंवा कमीतकमी श्रावण महिन्यात, दाढी करीत नाहीत.

अवर्ज्य

चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ यांना हविष्यान्न म्हणतात.  (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

आठवणी

मला आठवते, आमच्या लहानपणी- साधारण ५५ वर्षांपूर्वी, छोट्या गावांमध्ये, चातुर्मासामध्ये निरनिराळ्या पोथ्यांचे वाचन होत असे. संध्याकाळी, गावातील लहान थोर लोक, बाया बापड्या, सर्व श्रद्धेने पोथी ऐकायला जमत. या चार महिन्यांत विशेष करून निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असे, गावांत कुणाचे न कुणाचे कीर्तन इत्यादि असे आणि लोक अत्यंत श्रद्धेने कीर्तन ऐकायला जमत. दर गुरुवारी आणि एकादशीला, बहुतेक कुठल्या मंदिरात किंवा कुणाच्या घरी, स्थानिक भजनी मंडळाचे भजन असे. संध्याकाळी ९ च्या नंतर,, सगळ्यांची कामे वगैरे आटोपल्यावर लोक एकत्र जमून भजन, संकीर्तन करीत. मी बऱ्याच वेळेला, माझ्या वडिलांसोबत अशा भजनाला जात असे. एखादे दिवशी भजनाला गेलो नाही, तरी घरी अंथरुणावर पडल्या पडल्या, टाळ मृदुंगांचा आवाज आणि कुणीतरी आळवून आळवून म्हटलेले भजन आणि इतरांनी त्याला दिलेली सामूहिक साथ, ऐकू येत असे आणि मी अगदी वेगळ्याच दुनियेत पोंचून जात असे.

bhajan

समारोप 

असो. रविवारी दि. ६ जुलै पासून यावर्षीचा चातुर्मास सुरू झाला आहे. आपल्या सर्व चांगल्या रूढी, परंपरा नेहमीसाठी सुरू राहोत आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे बळ देत राहोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

माधव भोपे 

Birthday card from a daughter to her father

birthday card

 

See how beautifully my grand daughter, Saumya has expressed her emotions, her love and regards for her father on the occasion of his birthday- 

Every year, both my grand daughters come up with hand made greeting cards with new ideas, on the occasion of birth day of their parents, grand parents. 

This year, my elder grand daughter, Saumya made the following lines for her father-

सागराहून हृदय तुमचे मोठे,

असे बाबा नाही अजून कोठे,

जरी तुम्हाला नसतो जास्त वेळ,

तरी तुम्ही खेळता आमच्याशी खेळ,

काही केले तर म्हणता ‘वा, वा’

हॅपी बर्थडे डियर बाबा !

Which means,

You have a heart greater than the Sea,

There is no father like you in the world,

Though you are short of time,

Still you find time to play with us,

You appreciate anything that we do,

Happy birthday my dear father!

And the picture that she has drawn is simply heart touching. With the daughter cuddling her father fondly.birthday card

Her younger sister also made a cute drawing for her father and presented to him on his birthday.

You can see the birthday greeting card here, on her channel, Saumya’s Corner- Her video has already got 789 views and is liked by many.

उतनूरचे दिवस-4C-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

old tractor

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

 

*उतनुरचे दिवस..*

*थरार.. (४-क)*

के. जनार्दनचं भूत काही केल्या माझा पिच्छा सोडायला तयार नव्हतं. मी जेंव्हा जेंव्हा शामपुरच्या जनार्दन भाऊंना भेटायचो तेंव्हा तेंव्हा इथे काही तरी पाणी मुरतंय असा मला सतत संशय यायचा. ते कितीही “के. जनार्दनला ओळखत नसल्याचा” आव आणत असले तरी त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी नक्कीच काहीतरी जवळचा संबंध असावा, अशी माझं अंतर्मन मनोमन ग्वाही देत होतं.

एकदा सकाळी लवकर बँकेत जाऊन के. जनार्दन च्या लोन डॉक्युमेंट्स वरील फोटोला काळ्या पेन्सिलने लांब, भरगच्च कल्ले व फ्रेंच (बुल्गानिन) कट दाढी काढून, तो दाढी व कल्ल्यात कसा दिसला असता याबद्दल तर्क करीत होतो. त्या पोलिसी डिटेक्टिव्ह पद्ध्तीच्या क्रियाकलापात मी एवढा गुंग होऊन गेलो होतो की केंव्हा आमचे मॅनेजर साहेब माझ्या मागे येऊन उभे राहिले, हे मला कळलंही नाही.

memories at Utnoor 4c

मी अजूनही के. जनार्दनचाच छडा लावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे हे पाहून आंतून त्यांना जरी माझ्या कर्तव्यनिष्ठ चिकाटीचं कौतुक वाटलं तरी वरकरणी नाराजी दाखवत ते म्हणाले..

“मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की त्या के.जनार्दनचा व्यर्थ नाद सोडा. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा, आपला हैद्राबाद इथं होणारा सत्कार समारंभ अवघ्या महिन्या भरावर आलाय, त्याची तयारी करा..”

त्यांच्या समाधानासाठी के. जनार्दनची फाईल बंद करून कपाटात ठेवून दिली. मात्र शेंडी तुटो वा पारंबी, पण आता के. जनार्दनचा रहस्यभेद करण्याची वेळ आली असून लवकरच त्यावर अंतिम घाव घालायचा असा मी मनातून निर्धार केला.

गेल्या काही दिवसांपासूनच्या, के. जनार्दनच्या उरलेल्या सर्वच म्हणजे एकूण 35 एकर जमिनीवर बँकेचा बोजा नोंदवून घेण्याच्या माझ्या सततच्या प्रयत्नांना आता यश आलं होतं. मात्र त्या उर्वरित जमिनीपैकी बहुतांश जमीन ही उतनूर, नागापूर व शामपुर या गावांत असून बऱ्याच काळापासून ती पडीत अवस्थेतच असल्याचं आढळून आलं होतं.

के. जनार्दनच्या इंद्रवेल्लीच्या पत्त्यावर लागोपाठ कर्ज वसुलीच्या नोटीसा पाठविण्याचा मी धडाकाच लावला होता. साध्या नोटीसा तसंच वकिलाच्या कायदेशीर नोटीसा, साध्या पोस्टाने (ordinary post) आणि रजिस्टर्ड पोस्टाने पाठविण्यास मी सुरवात केली होती. ही पोस्टाची सर्व पाकिटे “ऍड्रेस नॉट ट्रेसेबल” अशा शेऱ्याने बँकेकडे परत यायची. त्या परत आलेल्या पाकिटांवर जनार्दन भाऊंचा शामपुरचा पत्ता म्हणजेच”न्यू ऍड्रेस C/o दामोदर बाजार” असं लिहून मी ती पाकिटं पुन्हा पोस्टात नेऊन देत असे. आश्चर्य म्हणजे शा re-directed पाकिटांपैकी बरीचशी पाकिटं जनार्दन भाऊंकडून (चुकून ?) accept ही केली गेली होती.

एक दोन वेळा स्वतः आदीलाबादच्या मोंढ्यात जाऊन चौकशी केली तेंव्हा तेथील जुन्या हमालांकडून व मुनिमांकडून के. जनार्दन बद्दल बरीचशी नवीन व आश्चर्यजनक माहिती मिळाली.

अशा प्रकारे भरपूर पुरावे गोळा केल्यानंतर एका दिवशी सकाळी नऊ वाजता शामपुरला जनार्दन भाऊंच्या वाड्यावर जाऊन धडकलो. स्वतः जनार्दन भाऊंनीच दार उघडल्यावर दोन्ही हात जोडून खणखणीत, आत्मविश्वासपूर्वक आवाजात म्हणालो..

“नमस्कार जनार्दन भाऊ उर्फ आमचे ट्रॅक्टर कर्जदार माननीय श्री. के. जनार्दन..!”

माझ्या त्या नाट्यपूर्ण गौप्यस्फोटानंतर जनार्दन भाऊंचा चेहरा एकदम पडून जाईल व त्यावर भीतीची छाया पसरेल अशीच माझी अपेक्षा होती. मात्र जनार्दन भाऊंच्या चेहऱ्यावरची रेष ही माझ्या त्या डायलॉग मुळे हलली नाही. उलट, बहुदा ते मी येण्याचीच वाट पहात असावेत. गंभीर, रुक्ष स्वरात ते म्हणाले..

“या..! आत या.. !!”

आम्ही सोफ्यावर बसल्यावर नेहमी प्रमाणे त्यांच्या पत्नीने पाणी आणून दिलं आणि चहा आणण्यासाठी ती आत निघून गेल्यावर जनार्दन भाऊ म्हणाले..

memories at Utnoor-4c

“हं.. ! बोला आता.. !! कुठून कुठून आणि काय काय पुरावे गोळा केलेत, मीच तुमचा तो ‘के. जनार्दन’ आहे हे सिद्ध करण्यासाठी..?”

जनार्दन भाऊंच्या चेहऱ्याकडे, ते कुरवाळत असलेल्या त्यांच्या हनुवटीवरील दाढीकडे क्षणभर मी रोखून बघितलं. आणि मग एक दीर्घ श्वास घेतला आणि एकेक शब्द सावकाशपणे उच्चारीत मी म्हणालो..

“मी महाराष्ट्रातून आलेला मराठी माणूस आहे हे कळूनही तुम्ही जेंव्हा माझ्याशी थोडं जास्त आपुलकीनं वागायच्या ऐवजी त्रयस्था सारखं अलिप्तपणे वागलात, तेंव्हाच मला तुमचा थोडासा संशय आला होता. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत आहात असं मला वाटलं. तुम्ही अट्टाहासानं माझ्याशी तेलगू भाषेत बोललात तेंव्हा तुम्ही मराठी भाषिकच आहात हे तुमच्या पत्नीशी खोटं बोलून मी शोधून काढलं. पण तोपर्यंत तुम्हीच के. जनार्दन आहात याची मला पुसटशीही कल्पना किंवा शंका नव्हती.”

हलकीशी जांभई देत कंटाळा आल्याचं दाखवीत जनार्दन भाऊ म्हणाले..

“त्याच त्याच, माहीत असलेल्या गोष्टी सांगू नका. मुद्द्याचं बोला..!”

त्यांच्या त्रासिक अविर्भावाकडे लक्ष न देता मी पुढे म्हणालो..

“त्या दिवशी तुम्ही थोड्या वेळासाठी वाड्याबाहेर गेला असताना दिवाणखान्यात लावलेले तुमचे फॅमिली फोटो पहात असताना तुमच्या वडिलांच्या फोटोखाली बारीक अक्षरात ‘कै. वामन गणपत केंद्रे’ असे नाव लिहिलेले मी वाचले. त्यावरून तुमचे आडनाव केंद्रे आहे हे समजले. तसं तुम्ही इथे ‘पी. जनार्दन’ हे नाव धारण केलं असून यातील ‘पी’ म्हणजे ‘पाटील’ असं तुम्ही इथल्या लोकांना सांगत असत, हे ही मला चौकशीतून समजलं होतं.

पुढे.. इंद्रवेल्लीच्या हॉटेलवाल्या चिन्नय्या कडून के. जनार्दनच्या नक्षलवाद्यांनी बळी घेतलेल्या मुलाचं नाव “दामोदर” असल्याचं समजलं आणि तुम्हीच जनार्दन केंद्रे उर्फ के. जनार्दन असल्याचा पहिल्यांदाच मला संशय आला.”

मी दामोदरचा उल्लेख केला तेंव्हा जनार्दन भाऊंच्या चेहऱ्यावर उमटून गेलेले शोकपूर्ण दुःखी भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांच्या नजरेला नजर न देता भिंतीवरील कोवळ्या वयाच्या मुलाच्या फोटोकडे पहात मी पुढे म्हणालो..

“अर्थात, या हॉलमध्ये लावलेला हा हार घातलेला फोटो तुमच्या मुलाचा म्हणजेच दामोदरचा असून त्याच्या स्मरणार्थच तुम्ही या कॉम्प्लेक्स चे नाव ‘दामोदर बाजार’ असे ठेवले आहे याचाही मग आपोआपच उलगडा झाला.

नक्षलवाद्यांनी तुमच्या चेहऱ्यावर कोयत्याने जे वार केले होते, त्याचे व्रण लपवण्यासाठीच तुम्ही गालांवर केसांचे कल्ले वाढविले आणि हनुवटीवर ही छोटीशी दाढी सुद्धा ठेवलीत. तसंच डोक्यावरील व्रण लपवण्यासाठीच तुम्ही सदैव गांधी टोपी घालता.”

एवढं बोलून, यावर जनार्दन भाऊंची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी मी हळूच त्यांच्याकडे पाहिलं. मात्र डोळे मिटून शांतपणे ते माझं बोलणं एकाग्र चित्ताने ऐकून घेत होते. त्यामुळे माझं बोलणं तसंच सुरू ठेवत मी म्हणालो..

“आदीलाबादच्या धान्य मोंढ्यात जाऊन मी तुमच्याबद्दल चौकशी केली तेंव्हा तुम्ही अजूनही ट्रॅक्टर मध्ये धान्य भरून मोंढ्यात विक्रीसाठी आणता असं समजलं. तसंच चेहऱ्यावरचे व्रण नष्ट करण्यासाठी तुम्ही मद्रास (आताचं चेन्नई) येथे जाऊन प्लास्टिक सर्जरीही केलीत, पण तरीही ते व्रण पूर्णपणे मिटले नाहीत, त्यामुळे नाईलाजाने तुम्ही गालावर लांब कल्ले व हनुवटीवर बुल्गानिन कट फ्रेंच दाढी ठेवलीत, ही माहिती देखील तेथील जुन्या मुनींमांकडून समजली.”

मी आणखी पुढे बोलणार तोच जनार्दन भाऊंनी डोळे उघडले आणि हातानेच मला “थांबा..!” अशी खूण करीत म्हणाले..

“बस.. बस..! पुरे झालं..! मीच तो, तुमचा कर्जदार के. जनार्दन..! आता तुमचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात सांगा..!!”

“बँकेचा कर्मचारी या नात्याने, ‘बँकेची थकबाकी ताबडतोब भरा’ यापेक्षा वेगळं ते काय म्हणणं असणार माझं..?” मी त्यांना प्रतिप्रश्न केला.

त्यावर एक दीर्घ उसासा सोडत खिन्न स्वरात जनार्दन भाऊ म्हणाले..

“दुर्दैवाने बँकेचं कर्ज परतफेड करू शकण्या एवढी आता माझी ऐपत राहिलेली नाही. मी पुरता कर्जबाजारी झालो आहे. अन्यथा फार पूर्वीच तुमचं सारं कर्ज मी फेडून टाकलं असतं..”

जनार्दन भाऊंचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी म्हणालो..

“एखाद्या सामान्य माणसानं हे म्हटलं असतं तर एक वेळ मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता. पण.. तुमच्या नावावर अद्यापही 35 एकर जमीन आहे, पंधरा सोळा दुकानांचा एवढा मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, पेट्रोल व खत विक्रीचा तुमचा व्यवसाय आहे, याशिवाय ठोक धान्य खरेदी विक्रीही तुम्ही करता.. असं असूनही तुम्ही कर्जबाजारी कसे..?”

“तुम्हाला वस्तुस्थिती माहीत नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय..” असं म्हणून जनार्दन भाऊंनी आपली दुखभरी दास्तान सांगायला सुरुवात केली..

“दामोदरच्या मृत्यूनंतर माझी पत्नी पुत्रशोकाच्या दु:खातिरेकानं भ्रमिष्ट झाली. तिला काही दिवसांकरता नागपूरच्या एका मानसोपचार केंद्रात उपचारांसाठी ठेवावं लागलं. माझ्या जिवालाही नक्षल्यांकडून धोका असल्याचा खात्रीलायकपणे सुगावा लागल्यामुळे तांतडीने घर व जमीन नातेवाईकांना विकून मी इंद्रवेल्ली कायमचं सोडून आदीलाबादला राहायला गेलो.

इंद्रावेल्ली गावातील नक्षल्यांच्या काही खबऱ्यांशी माझी खाजगी, व्यक्तिगत दुश्मनी होती. ते माझ्या मागावरच होते. सतत आदीलाबादला येऊन नक्षल्यांच्या नावाने ते माझ्याकडून खंडणी वसूल करायचे.

जखमांमुळे माझा चेहरा खूपच भेसूर दिसत होता. माझा विद्रुप चेहरा पाहताच माझ्या पत्नीला तो भयानक प्रसंग आठवायचा आणि तिचं बरं होत आलेलं वेड उफाळून यायचं. त्यामुळे मी सतत चेहऱ्यावर मोठा रुमाल बांधूनच वावरायचो. पुढे मद्रासला जाऊन मी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरीही करवून घेतली. अर्थात त्यामुळे जखमांचे व्रण बरेच कमी झाले असले तरी ते पूर्णपणे नाहीसे न झाल्यामुळे ह्या दाढी, कल्ले आणि गांधी टोपीच्या आड मी ते व्रण लपवले.

बराच काळ माझा सावकारीचा व्यवसाय व धान्य खरेदी बंद असल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नव्हते. शेती करण्याची तर हिम्मतच नव्हती. एकीकडे पत्नीच्या उपचारात बराच पैसा खर्च होत होता तर दुसरीकडे नक्षल्यांना अजूनही खूप मोठी रक्कम अधून मधून खंडणी म्हणून द्यावी लागत असे. माझ्या प्लास्टिक सर्जरीलाही खूप जास्त खर्च आला. लवकरच माझी सर्व जमापुंजी संपुष्टात आली.

सुदैवाने मला ओळखणारे व माझ्याकडून सतत खंडणी उकळणारे इंद्रवेल्लीचे नक्षली व त्यांचे खबरी अचानक एका अपघातात मरण पावले. आता मला ओळखणारं त्या परिसरात कुणीच नसल्याने माझी उरलेली शेतजमीन कसण्यासाठी मी शामपुरला येण्याचं ठरवलं. तत्पूर्वी मोठ्या हौसेनं बांधलेला माझा परभणीचा बंगला आणि घरातील सर्व सोनं नाणं विकून आलेल्या पैशातून मी हा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून काढला.

सावधगिरीचा उपाय म्हणून माझं नाव पी. जनार्दन आहे असं मी शामपुरच्या लोकांना सांगितलं. कॉम्प्लेक्स मागेच हा वाडा बांधून घेतला आणि पत्नीसह इथे रहायला आलो. वाड्यामागेच माझी वीस एकर जमीन आहे. स्थानिक मजुरांच्या मदतीनं मी ती शेती कसायला सुरवात केली. लवकरच शॉपिंग कॉम्प्लेक्सची सर्व दुकानं भाड्यानं गेली आणि घरबसल्या मला भरपूर उत्पन्न मिळू लागलं.”

अविश्रांत बोलून थकल्यामुळे जनार्दन भाऊ दम घेण्यासाठी क्षणभर थांबले. त्यांची पत्नीही माजघरातील दारात उभी राहून आमचं बोलणं ऐकत होती. तिला पुन्हा एकदा चहा करायला सांगून जनार्दन भाऊंनी आपली कर्मकहाणी कन्टीन्यू केली..

“माझ्या आवडत्या सूट, बूट, कोट, टाय, गुळगुळीत दाढी व डोक्यावर हॅट अशा साहेबी पेहरावाचा त्याग करून धोतर, सदरा, गांधी टोपी, लांब कल्ले, दाढी व पायात चप्पल असा नवीन देशी पेहराव मी धारण केला. वीज खातं, शेती खातं, तहसील, रेव्हेन्यू खातं अशा सर्वच सरकारी खात्यात माझे नातेवाईक असल्याने त्यांच्या मदतीने सगळ्या सरकारी रेकॉर्ड्स मध्ये मी माझे नाव सहजरित्या पी. जनार्दन असे बदलून घेतले.

सुरवातीचे काही दिवस सारं काही सुरळीत चाललं होतं. स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांकडून ठोक भावाने धान्य खरेदी करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते आदीलाबाद च्या मोंढ्यात विकण्याचा माझा जुना व्यवसायही आता मी पुन्हा सुरू केला होता. मात्र माझ्याकडून अनवधानाने एक बदल करायचा राहून गेला होता. मी माझी मोटारसायकल व ट्रॅक्टर ट्रॉली, तीच जुनीच ठेवली होती. आणि त्या एका चुकीनेच माझ्या मागे पुन्हा दुर्दैव हात धुवून लागलं.

इंद्रवेल्लीच्या अपघातातून वाचलेला एक नक्षली खबऱ्या योगायोगानं एकदा त्याच्या शामपुरच्या नातेवाईकाकडे आला होता. ट्रॅक्टर व मोटरसायकल वरुन तसंच माझ्या आवाजावरून त्याने मला ओळखलं आणि शामपुर एरियाच्या नक्षली कमांडरला त्याची खबर दिली.

एके दिवशी नक्षल्यांचं एक इशारेवजा धमकीपत्र मला प्राप्त झालं. तीन एकरपेक्षा जास्त जमीन कसू नये, शॉपिंग कॉम्प्लेक्स भाड्याने देऊ नये, मोटारसायकल वापरू नये, ठोक धान्य खरेदी बंद करावी किंवा आदिवासींना धान्याचा योग्य, वाढीव भाव द्यावा अशा आज्ञा त्यात दिल्या गेल्या होत्या. तसंच नक्षलींच्या पूर्वीच्या आज्ञापत्राचे उल्लंघन केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा खंडणीवजा दंड ही मला ठोठावण्यात आला होता.

इंद्रवेल्लीत नक्षल्यांनी माझ्या कुटुंबावर जो भयंकर अत्याचार केला होता त्याला आता दहा वर्ष उलटून गेली होती. या मधल्या काळात नक्षल्यांचा जोर खूप कमी झाला होता. जवळच उतनूरला पोलिसांचं खूप मोठं ठाणं झालं होतं. रस्ते, टेलिफोन, वीज या सोयींतही या काळात भरपूर सुधारणा झाली होती. आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे गमावण्या सारखं आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे नक्षल्यांच्या मागण्या मी साफ धुडकावून लावल्या व त्यांच्या धमकीकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं.

माझ्या या कृतीमुळे चिडलेल्या नक्षल्यांनी सर्वप्रथम स्थानिक आदिवासी मजुरांना माझ्या शेतावर काम करण्यास मनाई केली. त्यामुळे माझी शेतीची कामे ठप्प झाली. मात्र त्यामुळे खचून न जाता आदीलाबाद-महाराष्ट्र सीमेवरील पिंपळखुटी गावातून जादा मजुरी देऊन मी मराठी मजूर आणले, त्यांची राहण्याची सोय केली आणि शेतीची कामे पूर्ववत सुरळीतपणे सुरू केली. त्यानंतर मला धान्य विकण्यास नक्षल्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना मनाई केली. त्यामुळे माझा तो व्यवसायही कायमचाच बंद झाला. नक्षल्यांची दहशत व त्यांचे फर्मान यामुळे दामोदर बाजारातील सर्वच गाळे ओस पडले. त्या दुकानांच्या भाड्यातून मला जे नियमित उत्पन्न मिळत होतं, ते ही आता मिळेनासं झालं.

एकदा उतनूर येथील विशेष पोलीस मुख्यालयाच्या उदघाटनासाठी राज्याचे गृहमंत्री तिथे आले होते. ह्या परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे शिपाई या कार्यक्रमाला हजर होते. नेहमीप्रमाणेच हा मोका साधून वीस पंचवीस सशस्त्र आदिवासी तरुणांनी माझ्या वाड्याला वेढा घातला. शामपुर गावातील जनतेला दवंडी पिटवून माझ्या वाड्याजवळ जमण्यास सांगण्यात आले. माझ्या शेतात काम करीत असलेल्या महाराष्ट्रातील मजुरांपैकी दोघांना पकडून वाड्यासमोरील चिंचेच्या झाडाला बांधण्यात आले. त्यानंतर नक्षली गटाच्या कमांडरने गावकऱ्यांना माझ्यावरील आरोप पत्र वाचून दाखविले..”

इतक्यात चहा आल्यामुळे जनार्दन भाऊंनी बोलणं थांबवलं. त्यांची कहाणी आता रोमांचक वळणावर आल्याने भराभरा चहा पिऊन पुढील प्रसंग ऐकण्यास मी सज्ज झालो. दारात उभ्या असलेल्या आपल्या पत्नीला आत जाऊन आराम करण्यास सांगून जनार्दन भाऊंनी उर्वरित कहाणी सांगण्यास सुरवात केली..

“माझ्यावरील आरोपपत्रात असा उल्लेख होता की ‘पीपल्स वॉर ग्रुप’ च्या नियमानुसार समाजात आर्थिक समानता यावी या साठी या परिसरात कुणालाही तीन एकरापेक्षा जास्त जमीन कसण्यास मनाई आहे. तसेच घर, दुकान भाड्याने देणे, स्वस्त दराने स्थानिकांकडून धान्य, मध, डिंक इत्यादी खरेदी करून त्यांची पिळवणूक करणे यास ही सक्त मनाई आहे. कार, स्कुटर व मोटारसायकल अशी जलदगतीची वाहने वापरण्यास ही सामान्य नागरिकांना मनाई आहे. या सर्व नियमांचा पी. जनार्दन यांनी भंग केल्यामुळे त्यांना खालीलप्रमाणे दंड ठोठावण्यात येत आहे.

  1. आम्ही आखून दिलेल्या सीमा रेषेच्या आतील जमिनीवरच त्यांना शेती करता येईल.
  2. धान्य व अन्य मालाची छुप्या मार्गाने खरेदी केल्यास त्यांचे व माल विकणाऱ्याचे घर जाळून टाकण्यात येईल.
  3. त्यांची मोटारसायकल जप्त करण्यात येत आहे.
  4. त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. सांगितलेल्या ठिकाणी एक दोन दिवसात त्यांनी हा दंड पोचता करावा.

अशाप्रकारे आरोप पत्राचे जाहीर वाचन करून झाल्यावर वाड्याच्या मागील शेतजमिनीवर अंदाजे दोन अडीच एकर क्षेत्रफळाच्या अंतरावर एका रांगेत त्यांनी चार फूट उंचीच्या लाकडी खुंट्या ठोकल्या आणि या रांगे पलीकडील जमिनीत जो कोणी पाय ठेवील त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले जातील असा जाहीर इशारा दिला.

bamboo boundary

त्यानंतर अत्यंत निर्दयपणे त्यांनी झाडाला बांधलेल्या दोन्ही मजुरांचा एकेक हात कुऱ्हाडीचे घाव घालून तोडून टाकला. मी महाराष्ट्रातून आणलेल्या सर्व मजुरांनी ताबडतोब येथून परत निघून जावे अन्यथा त्यांची ही गत अशीच होईल तंबी देऊन माझी मोटारसायकल घेऊन ते जंगलात निघून गेले.

या घटनेनंतर बरेच दिवस शामपुर गावात भीती व दहशतीचे वातावरण होते. पोलिसांनी तर माझ्या वाड्यासमोरच आपली तात्पुरती छावणी उभी केली होती. मी नक्षल्यांना खंडणी देऊ नये यासाठी त्यांनी माझ्यावर भरपूर दबावही आणला. मात्र नक्षल्यांच्या अत्यंत भीषण व कटू पूर्वानुभवामुळे मी गुपचूप त्यांच्याकडे खंडणीची रक्कम पोचती केली.”

जनार्दन भाऊ उर्फ के. जनार्दन यांची दुःखद कर्म कहाणी संपली होती. त्यानंतर मला घेऊन ते वाड्याच्या पाठीमागे गेले. तिथे पंधरा वीस एकर ओसाड जमीन पसरलेली होती. जवळच एका रांगेत अनेक लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या. त्या काठ्यांकडे बोट दाखवीत जनार्दन भाऊ म्हणाले..

“जरी तिथपर्यंतच्या जमिनीवर शेती करण्याचा नक्षल्यांनी मला अधिकार दिला असला तरी प्राणभयामुळे या भागातील कुणीही माझ्या शेतीवर काम करण्यास तयार नाही. शेती, धंदा, दुकान भाडे या मार्गांनी पूर्वी मिळणारे सर्वच उत्पन्न बंद झाल्यामुळे मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो आहे. पेट्रोल व खत विक्रीच्या व्यवसायातून कसंबसं पोट भरण्यापुरतं उत्पन्न मिळतं. पण तो व्यवसायही तसा बेकायदेशीरच आहे. माझ्याकडे पेट्रोल वा खत विक्रीचं कोणतंही लायसन्स नाही. पोलीस, MRO व अन्य सरकारी विभागांना नियमित लाच देऊनच मी तो व्यवसाय कसातरी टिकवून ठेवला आहे.”

जनार्दन भाऊंची कहाणी जरी खरी वाटत असली तरी कुठेतरी मला त्यात मतलबी धुर्तपणा लपलेला दिसत होता. वाड्यामागेच एका पत्र्याच्या शेडखाली त्यांची मोटारसायकल उभी केलेली दिसत होती. मी त्या मोटारसायकल कडे निरखून पहात असताना माझ्या मनात आलेली शंका जनार्दन भाऊंनी लगेच ओळखली आणि ते म्हणाले..

“नक्षल्यांनी पळवून नेलेली माझी मोटारसायकल पुढे एका छाप्यात पोलिसांनी जप्त केली. अद्यापही ती उतनूरच्या पोलीस ठाण्यात गंजत पडली आहे. तशीही ती गाडी बरीच जुनी झाल्याने मला नवीन मोटरसायकल घ्यायचीच होती. इथे दळणवळणाच्या सोयी जवळपास नाहीतच. बरेचदा माझ्या पत्नीला वैद्यकीय उपचारासाठी नागपूर व आदीलाबादला घेऊन जावे लागते. तसंच आदीलाबादच्या मोंढ्यात धान्य अडतीचा व्यवसायही मी करतो. त्यासाठीही मला स्वतःचे वाहन असणे आवश्यकच होते. इथल्या नक्षली नेत्यांना मी माझी अडचण सांगितली. ते खूप लालची आहेत. थोड्याशा खंडणीच्या मोबदल्यात त्यांनी मला मोटारसायकल वापरण्याची परवानगी दिली. मात्र माझ्या खेरीज अन्य कुणीही ती वापरल्यास त्याला कठोर दंड केला जाईल असे त्यांनी बजावले.”

एवढं सांगून जनार्दन भाऊ म्हणाले..

“केवळ ह्याच कारणामुळे त्या दिवशी रात्री तुमच्या बँकेतील प्युन रमेशला मोटारसायकल देण्यास मी नकार दिला होता.”

एकंदरीत जनार्दन भाऊ उर्फ के. जनार्दन यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून त्यांच्या कर्ज खात्याच्या वसुलीची अजिबात शक्यता नाही याची जाणीव झाल्याने मी निराश झालो. तरी देखील एक शेवटची आशा म्हणून त्यांना म्हणालो..

“ठीक आहे, कर्ज परतफेड करण्याची तुमची ऐपत नाही हे जरी मान्य केलं तरी तुम्ही कर्जातून घेतलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचं काय ? ती तर बँकेचीच मालमत्ता आहे. त्यांच्या विक्रीतून आमची थोडी तरी कर्जवसुली होऊ शकेल. कुठे आहे सध्या तो ट्रॅक्टर व ती ट्रॉली..?”

माझ्या या प्रश्नावर मला हात धरून जवळच्या गुरांच्या गोठ्याकडे नेऊन त्यांनी तेथील कडब्याच्या पेंड्या किंचित बाजूला केल्या. त्या पेंड्यांच्या मागे पार गंजून गेलेल्या अवस्थेतील ट्रॅक्टर व ट्रॉली उभी होती. तिचा पत्रा एवढा गंजून सडून गेला होता की जरा हात लावला की त्याचे तुकडे गळून पडत होते. कुणी भंगार (स्क्रॅप) च्या भावाने देखील त्यांना विकत घेतले नसते.

old tractor

माझ्या शोध मोहिमेचा अंत असा अत्यंत निराशाजनक झाला होता. एवढा डोंगर पोखरूनही साधा मेलेला उंदिरही निघाला नव्हता. निराश, हतोत्साह मनानं मी उतनूर कडे निघालो.

(क्रमशः ४-ड)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

IFSC code search for Banks in India

IFSC featured image

IFSC Code Finder for Banks in India

goodworld.in
OR
0 results found
Enter search criteria and click Search

 

What is an IFSC code?

The full form of IFSC code is Indian Financial System Code. It is an 11 character alpha-numeric code  and is unique to each bank branch in India.

The IFSC code was introduced by the Reserve Bank of India (RBI) in 2008.  It was designed to modernize and streamline banking operations, particularly for electronic funds transfers.

The Indian Financial System Code (IFSC) has undergone a significant evolution since its inception. Over time, as the banking sector expanded and technological advancements took place, the IFSC system became an integral part of the National Electronic Funds Transfer (NEFT) and Real-Time Gross Settlement (RTGS) mechanisms. With the advent of Unified Payments Interface (UPI) and other digital payment platforms, IFSC codes have played a crucial role in ensuring secure and seamless transactions. Today, IFSC codes continue to be a fundamental component of India’s digital financial infrastructure, promoting efficient and standardized banking transactions. It is assigned by the Reserve bank of India to Banks in India.

IFSC Code Full Form and Its Components Explained

As mentioned above, the full form of IFSC means Indian Financial System Code. We will understand what each part of the code stands for:

IFSC example

First Four Characters (Alphabets) :

The initial four characters of the IFSC code represent the bank’s name. These characters are alphabetic and help identify the respective bank associated with the transaction.

Fifth Character (Zero) :

The fifth character of the IFSC code is always a zero. It has been reserved for future use and is currently static across all IFSC codes.

Last Six Characters (Alphanumeric) :

The final six characters of the IFSC code uniquely identify the specific branch of the bank. This alphanumeric combination is crucial for directing the funds accurately to the intended recipient.

These codes are allocated by the Reserve Bank of India (RBI) for identification purposes. This means that no two banks or their branches can have the same code.

Importance of IFSC Codes in Banking Transactions

Accurate Transfers :

The IFSC code plays a vital role in ensuring that funds are routed accurately to the intended recipient’s bank branch. With the unique alphanumeric combination, it eliminates the possibility of confusion and ensures that the funds reach the correct destination.

Electronic Transactions :

The IFSC code is particularly essential for transactions involving National Electronic Funds Transfer (NEFT), Real-Time Gross Settlement (RTGS), and Immediate Payment Service (IMPS). These electronic fund transfer mechanisms rely on the IFSC code to facilitate secure and efficient transactions.

Online Banking :

In the age of digital banking , where online transactions have become the norm, the IFSC code is a key component. Individuals conducting online transactions need to enter the IFSC code to initiate fund transfers, making it a crucial element in the digital banking ecosystem. It facilitates a plethora of online transactions such as paying bills, EMIs, insurance premiums, and taxes.

UPI Transactions :

Even in the case of Unified Payments Interface (UPI), which has gained immense popularity for its simplicity and speed, the IFSC code plays a role when transferring funds between different banks. While UPI transactions often use mobile numbers or virtual payment addresses, the IFSC code becomes relevant in cross-bank transfers.

International Transactions :

While the primary function of the IFSC code is for the domestic transactions, its concept aligns with the international standards of bank branch identification. For international transactions, SWIFT codes are used, serving a similar purpose to IFSC codes on a global scale.

Where to look for  Your Bank’s IFSC Code?

You can see your bank’s branch IFSC code at the following places:

On your  Cheque Book :

IFSC cheque-2

The IFSC code is usually printed on your bank’s cheque leaves. It is typically found at the top of each cheque leaf, either on the left or the right side.

Bank Account Passbook :

Check the front sheet of your bank passbook for account and branch details, including the IFSC. It is usually printed on the top right corner of the front sheet.

Your Account Statement

account statement

When you view or take a print out of your account statement online, you can see the IFSC code of your branch on the statement.

The need to search/ find the IFSC code of a bank branch:

When you want to transfer funds to someone either in the same Bank or another bank, you will need to first mention the IFSC code of the branch, and then the particular account number to which you want to transfer the funds. So when you know the name of the bank and branch, with the help of this tool, you can find the IFSC code and the full address of the branch immediately.

On the other hand, if you just know the IFSC code, you can find the full details of the bank, its branch and its address also with the help of this tool.

Although there are many tools available across the internet, including RBI own website, this tool has been developed by us with great efforts, taking into account the need of the common user as well as the Bankers and other financial agencies and is very convenient to use.

This tool uses list of 174898 IFSC codes provided by RBI  on its website updated as on 30.04.2025.

Precautions and disclaimer:

While going through the data available, we have found that in some cases, there are spelling mistakes- for example, the name of ‘AURANGABAD’ is mentioned as ‘AURANGABD’ in few places and AURANGABARD in one case. So you won’t get the results if you select ‘AURANGABAD’ in the drop down menu. The name of ‘BEED’ in Maharashtra is mentioned as “BID’ in some  places. The addresses of the branches have been jumbled up in case of merger of Banks.

However, we are sure, with the help of this tool, you will be able to find the information you are looking for very easily.

In case you find any anomalies, please inform us at goodworldmd@gmail.com so  that we can make necessary corrections.

Disclaimer

While we have made our best efforts to provide the user with  the latest data updated as available from RBI, users are requested to confirm the information with the respective bank before using the information provided. We accept no responsibility for the information provided on this platform and will not be responsible for any loss or damage suffered by any user, directly or indirectly by making use of the data provided on this website.

We expect you to use this website only for reference, and please confirm from the bank directly before performing any transaction.

Try these android apps

goodworld.in

Dear readers,

In the recent past, you have seen three quizzes developed by me-

  1. Geeta chapter 12 quiz
  2. Geeta chapter 15 quiz
  3. Hanuman Chalisa quiz.

These quizzes are useful for memorizing the above great spiritual hymns from Sanatan Dharma. They make learning a fun by presenting the hymns in the form of interesting, interactive and easy quizzes. You can give your mobile to your kids to solve these quizzes, so that they will also learn them by heart.

Now we bring to you the Android App versions of the above 3 quizzes.

We are providing 3 files with .apk extension for the above quizzes. You can download these files into your device, and easily install these three as games in your mobile. While downloading or installing, you may get a warning message from your mobile security system asking you whether you trust the source of this file. For this, you should give a permission for the system to go ahead and save the file and install the app. You can feel safe about the app as I have personally prepared this app and using on my mobile.

प्रिय पाठकों,

हाल ही में, आपने मेरे द्वारा विकसित तीन क्विज़ देखे होंगे-

गीता अध्याय 12 क्विज़

गीता अध्याय 15 क्विज़

हनुमान चालीसा क्विज़।

ये क्विज़ सनातन धर्म के उपरोक्त महान आध्यात्मिक भजनों को याद करने के लिए उपयोगी हैं। वे भजनों को रोचक, इंटरैक्टिव और आसान क्विज़ के रूप में प्रस्तुत करके सीखने को मज़ेदार बनाते हैं। आप अपने बच्चों को इन क्विज़ को हल करने के लिए अपना मोबाइल दे सकते हैं, ताकि वे भी इन्हें दिल से सीख सकें।

अब हम आपके लिए उपरोक्त 3 क्विज़ के Android ऐप संस्करण लेकर आए हैं।

हम उपरोक्त क्विज़ के लिए .apk एक्सटेंशन वाली 3 फ़ाइलें प्रदान कर रहे हैं। आप इन फ़ाइलों को अपने डिवाइस में डाउनलोड कर सकते हैं, और इन तीनों को अपने मोबाइल में गेम के रूप में आसानी से इंस्टॉल कर सकते हैं। डाउनलोड या इंस्टॉल करते समय, आपको अपने मोबाइल सुरक्षा सिस्टम से एक चेतावनी संदेश मिल सकता है जिसमें आपसे पूछा जाएगा कि क्या आप इस फ़ाइल के स्रोत पर भरोसा करते हैं। इसके लिए, आपको सिस्टम को फ़ाइल को सहेजने और ऐप इंस्टॉल करने की अनुमति देनी चाहिए। आप इस ऐप के बारे में सुरक्षित महसूस कर सकते हैं क्योंकि मैंने व्यक्तिगत रूप से इस ऐप को तैयार किया है और अपने मोबाइल पर इसका उपयोग कर रहा हूं।

 

प्रिय वाचक,

अलिकडच्या काळात, तुम्ही माझ्याद्वारे विकसित केलेल्या तीन क्विझ पाहिल्या असतील-

गीता अध्याय १२ क्विझ
गीता अध्याय १५ क्विझ
हनुमान चालीसा क्विझ.

सनातन धर्मातील वरील महान आध्यात्मिक स्तोत्रे लक्षात ठेवण्यासाठी या क्विझ उपयुक्त आहेत.  तुम्ही तुमच्या मुलांना या क्विझ सोडवण्यासाठी देऊ शकता, जेणेकरून ते देखील त्या तोंडपाठ करू शकतील.

आता आम्ही तुमच्यासाठी वरील ३ क्विझच्या अँड्रॉइड app  आवृत्त्या घेऊन आलो आहोत.

आम्ही वरील क्विझसाठी .apk एक्सटेंशनसह ३ फायली प्रदान करत आहोत. तुम्ही या फायली तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मोबाइलमध्ये या तीनही गेम म्हणून सहजपणे स्थापित करू शकता. डाउनलोड किंवा स्थापित करताना, तुम्हाला तुमच्या मोबाइल सुरक्षा प्रणालीकडून एक चेतावणी संदेश मिळू शकतो ज्यामध्ये तुम्हाला या फाइलच्या स्त्रोतावर विश्वास आहे का असे विचारले जाईल. यासाठी, तुम्ही सिस्टमला पुढे जाऊन फाइल सेव्ह करण्याची आणि अॅप स्थापित करण्याची परवानगी द्यावी. मी स्वतः हे अॅप तयार केले आहे आणि माझ्या मोबाईलवर वापरत आहे, त्यामुळे तुम्ही अॅपबद्दल खात्री बाळगू  शकता.

माधव भोपे

geeta 12
Geeta Chapter 12 App- Click to download the App
geeta 15
Geeta Chapter 15 App- Click to download the App
hanuman compressed png e1744022539415
Click to download Hanuman Chalisa App

Memories of SBH on foundation day माँ का आँचल

sbh

Memories of SBH on foundation day माँ का आँचल

 

आज जब कि सब लोग मश्गुल है जश्न मनाने में

कुछ लोग है खोए खोए से अपने मन में ॥१॥

जिन्हे यकीन था कि माँ का आँचल कभी दूर नही होगा उनसे

आज अचानक लग रहे है मेले में माँ से बिछडे हुए बच्चे से ॥२॥

याद आ रहे है वो बचपन के दिन सुहानेसे

जब माँ कि गोदी में खेलते थे खतरोंसे अनजानसे ॥३॥

एक सुहानीसी दुनिया थी हमारी भाईचारेकी

जहाँ खुशी और दर्द बांटा जाता था आपसमें प्यारसे ॥४॥

एक साथ पले, बढे, खेले, कूदे इस माँ कि आँचल कि छायामें

आज उस माँ का आँचल ही बिछड गया इस मेले में ॥५॥

बेशक़ हमें मिल रही है एक पह्चान नई

हमारी माँ से भी खूबसूरत एक माँ नई ॥६॥

लेकिन अनजानेसे चेहरोमे कहाँ खो जाएंगे हम

अपने अस्तित्व को न जाने कहाँ ढूंढेगे हम ॥७॥

उस चकाचौंध की दुनिया में ऐ माँ

तेरी यादो के सहारे जी लेंगे हम!! ॥८॥

 

माधव भोपे in April 2017