https://goodworld.in A website by Madhav Bhope

A glimpse of Vedic knowledge-2

A Glimpse of vedas-2

A glimpse of Vedic knowledge-2

The story of Satyakam-Jabala

सत्यकाम जाबालाची गोष्ट

मागील लेखात आपण श्रुति, स्मृति याबद्दल थोडी माहिती घेतली. आणि प्रस्थानत्रयी म्हणजे काय हे पाहिले. आपल्याला चार वेदांबद्दल थोडी प्राथमिक माहिती घ्यायची आहे. पण त्याआधी आपण छान्दोग्योपनिषदा मधील एक रोचक कथा पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धति होती. मुलगा ७-८ वर्षाचा झाला की, उपनयन संस्कार करून त्याला गुरूंच्या घरी विद्या शिकायला पाठवले जात असे. विद्या शिकवणारे आचार्य, किंवा गुरू, अरण्यात आश्रम करून रहात. असे आचार्य हे विद्वान, निःस्पृह आणि ब्रहमविद्या पारंगत असत. विद्यार्थ्यांचे हित, कल्याण हाच त्यांचा एकमेव उद्देश असे. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार त्यांचे असत. योग्य वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची पूर्ण जबाबदारी गुरूंची असे. म्हणूनच येणाऱ्या विद्यार्थ्याची निवड करण्याचा अधिकारही गुरूंचा असे. गुरुकुलात नित्य यज्ञ याग चालत असे. यज्ञाला समिधा लागतात. येणाऱे  विद्यार्थी  येतांना, हातामध्ये प्रतिकात्मक म्हणून थोड्या समिधा (वाळलेली लाकडे) घेऊन येत आणि गुरूंना अर्पण करीत.

सत्यकाम हा जाबाला नांवाच्या स्त्रीचा मुलगा होता. ती अनेक घरांत काम करीत असे. सत्यकाम जेंव्हा ७ वर्षांचा झाला, तेंव्हा त्याने, त्यावेळच्या प्रथेनुसार, इतर मुलांप्रमाणे, गुरूच्या घरी जाऊन विद्या शिकण्याची इच्छा आपल्या आईजवळ व्यक्त केली. गुरूंना आपल्या वडिलांचे नांव आणि गोत्र सांगणे आवश्यक असे, तसे सत्यकामने आपल्या आईला विचारले. त्याची आई विवाहित नव्हती, आणि अनेक घरांमध्ये काम करीत असतांना तिला सत्यकाम झाला होता. तिने तिच्या मुलाला सांगितले, “ बाळा, तुझ्या जन्माच्या आधी मी अनेक घरांमध्ये काम करत होते, अनेक स्वामींची सेवा करत होते. त्यामुळे, तुझे वडील कोण आहेत, हे मी नक्की सांगू शकत नाही. तू फक्त सत्यकाम आहेस- सत्यकाम- जाबाला. तुझ्या गुरुजींनी तुझे गोत्र किंवा वडिलांचे नांव विचारले तर जे खरे आहे ते सांग.

आईचा निरोप घेऊन सत्यकाम निघाला आणि गुरू गौतम यांच्या आश्रमात आला. आपल्याला त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळावा अशी त्याने विनंती केली. गुरूंनी त्याला त्याचे कुळ आणि गोत्र विचारले. सत्यकाम म्हणाला, “मी माझ्या आईला हा प्रश्न विचारला, तेंव्हा तिने सांगितले की माझे वडील कोण हे तिला नक्की माहिती नाही. माझे नांव सत्यकाम- जाबाला.” त्याचे हे उत्तर ऐकून आश्रमात बसलेले विद्यार्थी हसू लागले आणि त्याची टिंगल करू लागले. पण गुरू गौतम त्याला म्हणाले, “ बाळा, तू खरा ब्राह्मण आहेस- कारण की जो खरे बोलतो तो ब्राह्मण. मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. आजपासून तू आश्रमात रहा.” सत्यकाम ने सोबत आणलेल्या समिधा गुरूंना अर्पण केल्या आणि आश्रमात राहू लागला.

सत्यकामचे शिक्षण सुरू झाले. त्याला गुरूंनी आश्रमातील दैनंदिन कामें करायला सांगितले. नंतर एके दिवशी गौतमांनी त्याला बोलावले. आणि सांगितले, “आज मी तुझ्याजवळ ४०० गायी देत आहे. तू यांना जंगलात चरायला घेऊन जा, तिकडेच राहा, आणि जेंव्हा या ४०० गायींच्या १००० गायी होतील, तेंव्हा परत ये.” असे म्हणून त्यांनी आश्रमातील अगदी दुबळ्या झालेल्या ४०० गायी त्याच्या हवाली केल्या.

गुरूंच्या आज्ञेनुसार, सत्यकामने त्या ४०० गायी घेतल्या आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. रोज तो त्या गायींना चरायला सोडत असे, त्यांच्यावर लक्ष ठेवत असे, आणि त्याचबरोबर जंगलाचे, निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे निरीक्षण करीत असे. त्याचबरोबर, तो नदीच्या काठी बसून, चिरंतन सत्य काय आहे याचा विचार करीत असे, चिंतन करीत असे. अशी वर्षांमागून वर्षें लोटली.

एके दिवशी एक पुष्ट दिसणारा बैल त्याच्याजवळ आला, आणि मनुष्यवाणीत म्हणाला, “मुला, आता आमची संख्या १००० झाली आहे. तू आता आम्हाला तुझ्या गुरूंकडे, आश्रमाकडे घेऊन चल.” तो बैल दुसरे तिसरे कोणी नसून वायूदेव होता. तो पुढे सत्यकामला म्हणाला, “ तू जी आमची सेवा केली आहेस, त्याने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू परब्रह्माचे- चिरंतन सत्याचे चिंतन करीत आहेस. मी तुला त्या ज्ञानाचा चौथा हिस्सा सांगतो- पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण- या सगळ्या दिशा या त्या ब्रह्माचा भाग आहेत. आता यापुढील ज्ञान तुला अग्नि देईल.”

सत्यकामने गुरूंच्या आश्रमाकडील आपला परतीचा प्रवास चालू ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, तेंव्हा, सत्यकाम शेकोटी पेटवत होता आणि तीत इंधन टाकीत होता, त्यावेळी अग्निदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, “वायूने तुला चिरंतन सत्याचे काही ज्ञान दिले. मी आता त्याच्या पुढील चौथा हिस्सा तुला सांगतो. पृथ्वी, आकाश, वायू आणि समुद्र, हे सुद्धा त्या परब्रह्माचाच हिस्सा आहेत. आता यापुढील ज्ञान तुला हंस देईल.”

पुढील दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, आणि जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा एक दिव्य हंस उडत त्याच्यापाशी आला. तो हंस म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव होता. तो सत्यकामला म्हणाला, “सत्यकाम, मी तुला आता परब्रह्माच्या ज्ञानाचा पुढील चतुर्थ भाग सांगतो- अग्नि, सूर्य, चंद्र, आणि विद्द्युल्लता या सर्वांना ‘ज्योतिष्मान’ असे नांव आहे. हे ही सगळे, त्या परब्रह्माचे भाग आहेत. यापुढील भाग तुला पाणपक्षी म्हणजेच बदक सांगेल.”

त्यापुढील दिवशी, पुन्हा संध्याकाळी गायी चरवून आल्यावर जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा पाणपक्षी त्याच्या जवळ आला आणि म्हणू लागला, “ सत्यकाम, मी आता तुला परब्रह्माच्या ज्ञानाचा चौथा आणि शेवटचा भाग सांगतो, ऐक. प्राण, डोळे (दृष्टी), कान (श्रवणेंद्रिय) आणि मानस (मन) ही त्याच पूर्ण परब्रह्माचा हिस्सा आहेत. हे चराचर त्याच परब्रह्माचे प्रकटीकरण आहे.”

जेंव्हा सत्यकाम आपल्या गुरूच्या आश्रमात १००० गायींसह  पोंचला, तेंव्हा त्याचा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळला होता. त्याला पाहून त्याचे गुरू, गौतम अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, “माझ्या प्रिय शिष्या, तुझा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळलेला दिसतो आहे.! तुला हे ज्ञान कोणी दिले?”

तेंव्हा सत्यकामने त्याच्या चार गुरूंबद्दल सांगितले आणि नम्रतेने म्हणाला, “गुरुजी, पण हे ज्ञान मला आपल्या मुखातून ऐकायचे आहे. त्याशिवाय त्याला पूर्णता येणार नाही.”

तेंव्हा गुरू गौतमांनी प्रसन्न होऊन त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ते म्हणाले, “ ब्रह्म सर्वत्र आणि सर्वव्यापी आहे. ब्रह्मच सर्व आहे. ते अनादि आहे आणि अनंत आहे. स्वतःला जाणल्यानेच ब्रह्म जाणले जाते. यालाच ब्रह्मविद्या म्हणतात.”sun

गुरूंकडून ज्ञान मिळून सत्यकाम धन्य झाला. पुढे चालून सत्यकामही एक उत्तम शिक्षक झाला.

आपण या लेखमालेची सुरुवात करतांना, पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतिकडे आकर्षित होतात, आणि नुसते तात्पुरते आकर्षित होत नाहीत, तर आपल्या संस्कृतिचा, वेदांचा, सखोल अभ्यास करतात, पण एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या गोष्टींबद्दल तितकी किंवा अगदी प्राथमिक माहितीही नसते अशी खंत व्यक्त करून झाली होती. वेदांचे ज्ञान हे फक्त काही उच्च वर्णीय लोकांपुरतेच मर्यादित ठेवले गेले होते, असे आपल्याला सांगितले गेले. पण छान्दोग्योपनिषदात आलेल्या या गोष्टीवरून असे दिसून येते, की जात किंवा कुळ याचा विचार न करता विद्यार्थ्याची योग्यता पाहून ज्ञान दिले जात असे. आणि योग्यता ठरविण्याचा अधिकार हा तितक्याच ज्ञानी, अधिकारी आणि निःस्वार्थ गुरूंकडे असे.

दुसरे असे, की शिक्षण देण्याची कोणती पद्धत अवलंबायची हे सुद्धा, कोणती पद्धत कोणाला सूट होईल हे ठरवून त्याप्रमाणे आचार्य highly individualized पद्धत वापरत.

आश्रमात वेदांचा अभ्यास करतांना घोकंपट्टी तर असेच, आणि ती आवश्यकही असे. पण त्याचबरोबर ‘प्रात्यक्षिक’ शिक्षणावर अधिक भर असे.

वरील गोष्टीमध्ये, अनेक वर्षे निसर्गाच्या सान्निध्यात राहून सत्यकामला जे ज्ञान मिळाले, ते कदाचित आश्रमात राहून मिळाले नसते. वरील गोष्टीतील- वायूदेव, अग्निदेव, सूर्यदेव यांनी येऊन सत्यकामला ज्ञान देण्याचे प्रसंग आपण जरी बाजूला ठेवले, तरी इतक्या दिवसांच्या निसर्गाच्या सान्निध्यानंतर आणि चिंतनानंतर सत्यकामला आतून ज्ञान ‘स्फुरले’ असे तर आपण मानूच शकतो. कारण ‘ज्ञान’ हे बाहेरून मिळवायचे नसते, तर ते आपल्या आतच असते हीच तर वेदांची शिकवण आहे. आजकाल आपण बाहेरून, पुस्तकांतून आणि गूगल मधून जे ‘ज्ञान’ मिळवितो, ते ‘ज्ञान’ नव्हे, तर ‘माहिती’ म्हणजेच information असते.

यापुढील लेखात आपण वेदातील काही संज्ञांची प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.

आपल्याला हा विषय आवडला असेल, त्यात रस येत असेल, तर अवश्य कळवा, म्हणजे अजून पुढे लिहायला उत्साह येईल.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic Knowledge-1

four vedas

A glimpse of Vedic Knowledge-1 

वेदांची झलक

काही वर्षांपूर्वी यू ट्यूब वर एक व्हीडिओ पाहण्यात आला- व्लादिमीर यातसेन्को (Vladimir Yatsenko) असे नांव असलेल्या, रशियन माणसाचा तो व्हीडिओ होता.

व्हीडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे. ( एप्रिल 2015 चा). त्याचे शीर्षक होते- Introduction to Vedas- Part-1. काही भागांमध्ये हा व्हीडिओ होता. सांगणारा माणूस इंग्लिश मध्ये बोलत होता. त्याचा वेष जरी पाश्चात्य असला, तरी तो एखादा  ऋषितुल्य भारतीय वाटत होता.

 या व्हीडिओमध्ये, एखाद्या भारतीयालाही नसेल, इतकी सखोल माहिती तो आपल्या वेदांबद्दल सांगत होता. व्हीडिओ ऐकल्यानंतर मला खूप नवीन गोष्टी कळल्या. मी भारतीय असून, आणि तथाकथित उच्च कुळात जन्म घेतलेला असूनही, मला त्यातील बहुतेक गोष्टींचे शून्य ज्ञान होते. त्यामुळे माझीच मला लाज वाटली. आपण स्वतःला भारतीय म्हणवतो, आणि वेद हे आपले धर्मग्रंथ आहेत, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसते.  आणि हा रशियन माणूसच नाही, तर अक्षरशः शेकडो, हजारो इतर देशांतील, इतर धर्मीय जिज्ञासू, तिथे राहून किंवा भारतात येऊन, आपल्या ज्ञानाचा अभ्यास करतात, आपले पूर्ण आयुष्य सनातन संस्कृतीला वाहून घेतात, असे मला त्यानंतर समजू लागले. आणि असे अनेक लोक- स्त्री, पुरुष, धांडोळा घेतांना दिसू लागले.

या सर्व गोष्टी आपण इतरांसोबत शेअर केल्या पाहिजेत असे प्रकर्षाने वाटू लागले. आता हा ब्लॉगिंगचा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे यातील काही गोष्टी, वाचकांसोबत शेअर करायचा विचार आहे.

हा विषय trending म्हणजे पटकन कोणाला आकर्षित करणारा नाही. त्यामुळे किती लोकांच्या वाचण्यात येईल हे माहित नाही. पण आपल्या आनंदासाठी, अशा  काही विषयांची मांडणी करतांना, आपलीच त्या विषयाची उजळणी होते आणि वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते, म्हणून हा लेखन प्रपंच करणार आहे.

या लेखांमध्ये आपल्याला काही गोष्टींची आणि काही शब्दांची तोंडओळख होणार आहे-

  1. वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत- श्रुति म्हणजे काय, स्मृति म्हणजे काय, वेदांचे भाग- संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि उपनिषद म्हणजे काय, त्रैविद्या म्हणजे काय, प्रस्थानत्रयी म्हणजे काय.
  1. पुरातन काळापासून आजपर्यंत वेद अत्यंत शुद्ध स्वरूपात कोणत्या पद्धतीने जतन केले गेले, भारताच्या कुठल्याही भागात गेले तरी वेदांचे शब्द आणि स्वर अगदी अचूक एकसारखे कसे येतात, याबद्दल माहिती
  2. द्याौ,  पृथ्वी, अंतरिक्ष या संकल्पना,
  3. अग्निहोत्र, किंवा यज्ञ करतांना निरनिराळे कर्म कर्ते – होतार, अध्वर्यू आणि उद्गातृ किंवा उद्गात्र आणि ब्राह्मण आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या.

प्रस्थानत्रयी –

वरील विषयाची चर्चा सुरू करण्याआधी प्रस्थानत्रयी म्हणजे काय याबद्दल थोडे समजून घेणे आवश्यक आहे.

या शब्दाचा अर्थ कुठल्या डिक्शनरीत मिळाला नाही. पण आपल्याला केंव्हा ना केंव्हा इथून ‘प्रस्थान’ करायचे आहे- म्हणजे जायचे आहे- तर ते- आपल्या ‘मूळ गावाला’   जाणे सुलभ व्हावे म्हणून जे ग्रंथ सहायक आहेत असे तीन ग्रंथ म्हणून प्रस्थानत्रयी म्हणत असावेत असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत होते.  पण मला एका ठिकाणी खालील अर्थ बघायला मिळाला-

प्रस्थानत्रयी

सनातन धर्मात असे मत आहे की कोणाला कुठला सिद्धांत सिद्ध करायचा असेल तर त्याला तीन प्रस्थानांमधून जावे लागेल. ते तीन प्रस्थान म्हणजे- श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान. तर आपल्याकडे उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या तीन रचना श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणून ओळखल्या जातात.

श्रुति म्हणजे आपल्या ऋषिंना त्यांच्या ध्यान अवस्थेत ज्या ज्ञानाची ‘जाणीव’ झाली, जो ‘शब्द’ त्यांना ध्यानाच्या अवस्थेत ऐकू आला- तो शब्द किंवा ते शब्द म्हणजे श्रुति. म्हणजेच ‘वेद’. वेद हे अपौरुषेय आहेत असे जे म्हणतात ते त्याचमुळे. वेद हे कोणी ‘रचले’ नाहीत किंवा बनवले नाहीत, तर ते ‘स्फुरले’. म्हणून ते अपौरुषेय. आणि त्या प्रत्येक वेदांतील शेवटचा आणि अत्यंत सारगर्भ असलेला भाग म्हणजे उपनिषद. उपनिषदें अनेक आहेत, पण आद्य शंकराचार्यांनी ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, बृहदारण्यक आणि  छान्दोग्योपनिषद् या १०   मुख्य उपनिषदांवर भाष्य लिहिले आहे.

तर उपनिषद हे प्रस्थानत्रयीमधील प्रथम म्हणजे ‘श्रुति प्रस्थान’ म्हणून ओळखले जातात.

स्मृति म्हणजे आठवणीतून लिहिलेले इतर साहित्य. मग त्यात भगवद्गीता आली, सगळे शास्त्र आले, दर्शन, योगसूत्र, सांख्य, रामायण, महाभारत इत्यादि रचना आल्या.

प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर कुठल्या तरी निष्कर्षाला पोंचणे, याला ‘न्याय’ म्हणतात. ब्रह्मसूत्र हे स्वतः वेदव्यास (बादरायण) यांनी रचलेले आहे. आणि ते ‘न्याय’ या संज्ञेत येते.    त्यात उपनिषदांतील इतस्ततः विखुरलेले ज्ञान एका ठिकाणी आणून, ५५५ ‘सूत्रां’ मध्ये क्रमवार आणि पद्धतशीर एकत्र केले आहे. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्राने त्याची सुरुवात होते, आणि प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर ‘ब्रह्म’ म्हणजे काय याचे विवेचन केलेले आढळते.

भारतवर्षात जेंव्हा कुठल्याही आचार्यांना आपले मत मांडायचे असेल, तेंव्हा त्यांनी प्रथम या प्रस्थानत्रयींवर भाष्य करून आपले मत मांडणे अपेक्षित असे. आद्य शंकराचार्य यांनी या तिन्हींवर आपले भाष्य लिहिले आहे. निम्बार्काचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादि आचार्यांनीही या प्रस्थानत्रयींवर भाष्य केले आहे.

यापुढील लेखात आपण वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतरच्या एका लेखात आपण छांदोग्योपनिषदात आलेली सत्यकाम जाबाल याची अत्यंत रोचक कथा पाहणार आहोत.

वरील सर्व विषयांवर मला मिळालेली माहिती आपल्यासोबत शेअर करणार आहे. या विषयात रस असणाऱ्या वाचकांनी येणारे लेख नक्की वाचावे.

माधव भोपे

A special bond

cat-5

Children have great creativity. They try to express their feelings effectively whenever there is an opportunity. My granddaughter Saumya, and her friend Sanvi, found a little cat while wandering in the society while playing. They were instantly attracted by her cuteness and went near the cat. They became friends in no time.

Nowadays Saumya and Sanvi are constantly talking of the cat, and they have together composed a little poem for their new friend!

I really liked the  poem composed by them. The poem is presented here for the readers of goodworld.in.

Saumya also has her youtube channel Saumyas corner. If you like the poem, you can subscribe to her youtube channel as well!

A Special Bond

We found a little cat

Walking on the road

We loved the the way she sat

Staring at the road

cat-4

We went a little near

But her face had fear

We called her to us

But she didn’t make a fuss

cat-1

She looked at us

with curious eyes

As though a friend

Would say hies and byes

We stroked her gently

She looked very friendly

She cuddled us with love

With her paws like a glove

cat-2

She had soft fur

My eyes felt blur

She was so cute

As relaxing as a flute

Flute

Then we thought of a name

Not one but three

Curo as she was

Full of curiosity

Biscuits ’cause that’s

What we had in our hand

Sunshine as she makes us

Feel very glad

sunshine

We put three biscuits

All in a row

And named those biscuits

Sunshine, Biscuits, Curo

cat-3

She chose two of them

Sunshine and Curo

Then we had a go again

And Sunshine ho ho ho

 

We had a lot of fun

But it’s time to go home

And then she said ‘meow!’

As though  ‘See you soon!’

cat-5

Poem by Saumya Bhope and Sanvi Ranade

Telangana Sankranti Dance

saumya-4

Telugu Sankrathi Dance

My granddaughter, Saumya is actively participating in the cultural activities of her school, and also whenever there is a cultural event in our housing society.

Recently, their school had organized a cultural program during the annual gathering. 

The girls and boys performed a dance celebrating Sankranthi, based on a Telugu song. 

The dance was aimed at depicting the rich cultural heritage in different parts of India.

She has uploaded this video on her youtube channel Saumyas corner.

I am posting this video here for the readers of goodworld.in. 

Sankranti Customized Greeting Card

Sankranti-2025-card (1)

Generate your own Greeting Card for Makar Sankranti

Greeting Card Generator

Makar Sankranti Greeting Card Generator

संक्रांतीच्या शुभेच्छा !

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

- Your Name

मकर संक्रांती हा एक आनंद आणि उत्साहाने भरलेला सण आहे. ऋतूमध्ये होणारा अनुकूल बदल, सूर्याचे उत्तरायण सुरू होण्याचा काळ, त्याच वेळी शेतीतील रब्बी हंगामाची महत्त्वाची कामें संपून थोडा निवांतपणा, या सगळ्यांना साजरा करण्यासाठी पूर्ण भारतात कुठल्या ना कुठल्या नांवाने आणि प्रकाराने हा उत्सव साजरा केला जातो. 

एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे अपेक्षित असले तरी, आजकाल आधुनिक जीवनाच्या व्यस्ततेमुळे जर असे भेटणे शक्य झाले नाही, तर आपण एकमेकांना शुभेच्छा देणारे ग्रीटिंग नक्की पाठवितो. असे ग्रीटिंग जर नेमक्या, योग्य त्या शब्दात, आणि आपल्या नांवासकट पाठविता आले तर किती चांगले! 

खाली दिलेल्या Greeting Card Generator चा वापर करून तुम्ही आपल्या स्नेही जनांना आणि मित्र परिवाराला असे शुभेच्छा कार्ड पाठवू शकता. 

  1. Select a Sankranti Message या मेन्यू मधून, दिलेल्या १० मेसेजेस पैकी, आपल्याला आवडणारा मेसेज select  करा. लगेच तो मेसेज खालील रंगीत कार्डावर दिसेल. 
  2. Your Name या मेन्यू वर गेल्यावर, तुमचे नांव टाइप करा. तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत. लगेच तुमचे नांवही त्या कार्डवर दिसू लागेल. 
  3. Download Card या बटन वर क्लिक करा. 
  4. तुमचे customized greeting कार्ड तुमच्या मोबाईल वर किंवा लॅपटॉप वर (तुम्ही लॅपटॉप वरून केले असल्यास) डाउनलोड होईल. 
  5. डाउनलोड झालेले कार्ड open करा. त्यात वर share चे बटन आले असेल. ते वापरून हे कार्ड तुम्ही whatsapp किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वर शेअर करू शकता !
Customized Greeting Card developed  specially for the readers of goodworld.in and goodlifehub.in.